Saturday, September 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedदौंड विधानसभा मतदारसंघात ८३ मतदारांनी बजावला घरातूनच मतदानाचा हक्क*

दौंड विधानसभा मतदारसंघात ८३ मतदारांनी बजावला घरातूनच मतदानाचा हक्क*

*

पुणे, दि. १५: दौंड विधानसभा मतदारसंघात भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मतदान केंद्रावर उपस्थित राहू शकत नसलेल्या व नमुना १२ ड भरून दिलेल्या ८५ वर्षावरील ६२ ज्येष्ठ नागरिक आणि २१ दिव्यांग मतदार असे एकूण ८३ मतदारांनी घरातूनच मतदानाचा हक्क बजावला,

विधानसभा मतदारसंघात गृह मतदानाकरीता एकूण चार पथके नियुक्त करण्यात आली होती. पथकात एक मतदान अधिकारी, एक इतर अधिकारी, पोलिस कर्मचारी, शिपाई, व्हिडीओग्राफर व सूक्ष्म निरीक्षक यांचा समावेश आहे. या पथकाच्यावतीने गृहमतदान प्रक्रियेचे व्यवस्थितपणे नियोजन करुन १२ ड अर्ज भरून दिलेल्या सर्व ८३ मतदारांच्या घरी जाऊन मतदान नोंदविण्यात आले. संपूर्ण प्रक्रिया वेळत पार पाडून १०० टक्के मतदान नोंदिवण्यात आले, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गणेश मरकड यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments