Saturday, September 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedआदिश्री, आलोक इलेव्हन उपांत्य फेरीत एन. बी. ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा – निलेश...

आदिश्री, आलोक इलेव्हन उपांत्य फेरीत एन. बी. ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा – निलेश भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने आयोजन

पुणे : आदिश्री इंटरप्राइजेस, आलोक इलेव्हन या संघांनी निलेश भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने आयोजित पुणे जिल्हा टेनिस प्रीमियर एन. बी. ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

वडगाव बुद्रुक येथील सिंहगड रोडवरील मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. पहिल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत आदिश्री संघाने मातोश्री इलेव्हन संघावर तीन गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना मातोश्री इलेव्हन संघाने निर्धारित ८ षटकांत ५ बाद ८७ धावा केल्या. यात दिलीप वर्माने २१ चेंडूंत चार षटकार व तीन चौकारांसाह ५१ धावा केल्या. मात्र, त्याला दुसऱ्या बाजूने अपेक्षित साथ मिळाली नाही. आदिश्रीने विजयी लक्ष्य सात गडी गमावून ७.३ षटकांत पूर्ण केले. आदिश्री संघाची सुरुवात निराशाजनक झाली होती. त्यांचा निम्मा संघ ४ षटकांत २८ धावांत माघारी परतला होता. आकाश काळेने १२ चेंडूंत दोन चौकार व दोन षटकारांसह नाबाद २६, तर विजय खडकेने चार चेंडूंत दोन षटकारांसह नाबाद १५ धावा करून संघाला विजय मिळवून दिला.

दुसऱ्या लढतीत कर्णधार राहुल सातवच्या आक्रमक अर्धशतकानंतर गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्याच्या जोरावर अलोक इलेव्हन संघाने प्रहार संघावर ६० धावांनी विजय मिळवला. आलोक इलेव्हन संघाने प्रथम फलंदाजी करताना २ बाद ११५ धावांपर्यंत मजल मारली. यात राहुलने २३ चेंडूंत पाच षटकार व तीन चौकारांसह नाबाद ५६ धावांची खेळी केली. यानंतर आलोक इलेव्हनच्या गोलंदाजांनी प्रहार संघाला ७.५ षटकांत ५५ धावांत गुंडाळले.

उपांत्यपूर्व फेरी – संक्षिप्त धावफलक – मातोश्री इलेव्हन – ८ षटकांत ५ बाद ८७ (दिलीप वर्मा ५१, अविष्कार दाते १३, राजेश पवार ११, अरिफ संगम १०, विजय खडके २-२८, प्रशांत शुक्ला १-१६, राजू पेरुमल १-७) पराभूत वि. आदिश्री इंटरप्राइजेस – ७.३ षटकांत ७ बाद ८८ (आकाश काळे नाबाद २६, आदित्य जाधव १९, उमेश नायडू १२, विजय खडके नाबाद १५, कशिफ संगम २-४, धीरज गच्चे २-३४).

आलोक इलेव्हन – ८ षटकांत २ बाद ११५ (राहुल सातव नाबाद ५६, राजू पाटे ११, क्षीतिज दिवेकर नाबाद २३, अज्जू बेपारी १८, रोहन खरात १-११, चेतन भाटे १-१५) वि. वि. सचिन धावळे प्रहार इलेव्हन – ७.५ षटकांत सर्व बाद ५५ (रोहित खरात ११, अभिषेक कुजुर ३-१७, क्षीतिज दिवेकर २-१६, राहुल सातव १-१४, सचिन कुंभार २-४).

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments