प्रत्येकी 10 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी (“इक्विटी शेअर”) 140 रुपये ते 148 रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित.
· कर्मचारी आरक्षण भागात बोली लावलेल्या पात्र कर्मचाऱ्यांना प्रति इक्विटी शेअरसाठी 13 रु. ची सवलत
· बोली/ऑफर शुक्रवार 22 नोव्हेंबर 2024 रोजी खुली होईल आणि मंगळवार 26 नोव्हेंबर 2024 रोजी बंद होईल. प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीची तारीख गुरूवार 21 नोव्हेंबर 2024 असणार आहे.
· बोली किमान 101 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 101 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल
राष्ट्रीय, 18 नोव्हेंबर 2024: एनव्हीरो इन्फ्रा इंजिनीअर्स लिमिटेड (“एनव्हीरो इंजिनीअर्स” किंवा “कंपनी”) इक्विटी शेअर्सची प्राथमिक समभाग विक्री शुक्रवार 22 नोव्हेंबर 2024 पासून सुरू करत आहे.
इक्विटी शेअर्सच्या एकूण ऑफर साईज मध्ये (प्रत्येकी 10 रुपये दर्शनी मूल्य) 3,86,80,000 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सचे फ्रेश इश्यू (“फ्रेश इश्यू”) आणि 52,68,000 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सची (“ऑफर केलेले शेअर्स”) ऑफर फॉर सेल आहे.
या ऑफर मध्ये सबस्क्रीब्शनसाठी पात्र कर्मचाऱ्यांकडून 1,00,000 पर्यंतचे राखीव इक्विटी शेअर्स समाविष्ट आहेत. (“कर्मचारी आरक्षण भाग”)
प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीची तारीख गुरूवार 21 नोव्हेंबर 2024 असणार आहे. बोली/ऑफर शुक्रवार 22 नोव्हेंबर 2024 रोजी खुली होईल आणि मंगळवार 26 नोव्हेंबर 2024 रोजी बंद होईल. (“Bid Details”)
प्रति इक्विटी शेअरसाठी 140 रुपये ते 148 रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. बोली किमान 101 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 101 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल. (“किंमतपट्टा”)
कंपनीने इक्विटी शेअर्सच्या फ्रेश इश्यूतून मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाचा उपयोग खालील उद्दिष्टांसाठी करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे:
(i) खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी;
(ii) आपली उपकंपनी EIEL Mathura Infra Engineers Private Limited (“EIEL Mathura”) मध्ये निधीची गुंतवणूक करण्यासाठी. उत्तर प्रदेशातील मथुरामध्ये हायब्रिड अॅन्युइटी-आधारित पीपीपी मोडद्वारे ‘मथुरा सीवरेज योजना’ अंतर्गत 60 MLD STP बांधण्यासाठी हा निधी वापरला जाईल;
(iii) आमच्या काही विद्यमान कर्जाची पूर्णतः किंवा अंशतः परतफेड/पूर्व-परतफेड करण्यासाठी;
(iv) अज्ञात अधिग्रहण याद्वारे इनऑर्गनिक वाढीसाठी निधी पुरवणे आणि सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी (“इश्यूचे उद्दिष्ट”).
52,68,000 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सच्या ऑफर फॉर सेल (“ऑफर्ड शेअर्स”) मध्ये संजय जैन यांच्या कडून 21,34,000 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, मनीष जैन यांच्या कडून 21,34,000 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, ऋतु जैन यांच्या कडून 5,00,000 पर्यंतचे इक्विटी शेअर्स आणि शची जैन यांच्या कडून 5,00,000 पर्यंतचे इक्विटी शेअर्स ( एकत्रितपणे प्रमोटर सेलिंग शेअरहोल्डर्स) समाविष्ट आहेत तसेच विक्री समभागधारकांकडून इक्विटी शेअर्सची ही ऑफर फॉर सेल (“the Offer for Sale”) आहे.
हे इक्विटी शेअर्स कंपनीच्या 16 नोव्हेंबर 2024 रोजी दिल्लीच्या रजिस्ट्रार ऑफ कंपनीजकडे (“RHP”) दाखल केलेल्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसद्वारे सादर केले जात आहेत.
रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसद्वारे सादर करण्यात येणारे इक्विटी शेअर्स स्टॉक एक्स्चेंजेसवर सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे, ज्यामध्ये बीएसई लिमिटेड (“BSE”) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“NSE”, BSE सह मिळून “स्टॉक एक्सचेंजेस”) यांचा समावेश आहे. या ऑफरच्या संदर्भात, NSE हे नियोजित स्टॉक एक्सचेंज आहे. (“लिस्टिंग तपशील”)
सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया – सेबी (इश्यू ऑफ कॅपिटल अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) 1957 च्या (“SEBI ICDR Regulations”) नियम 31 च्या 19(2)(ब) सुधारित नियमावलीनुसार ही ऑफर खुली करण्यात आली आहे. सेबी आयसीडीआर नियामकांच्या 6(1) निर्देशांनुसार ही ऑफर बुक बिल्डींग प्रक्रीयेद्वारे जाहीर करण्यात आली असून त्याअंतर्गत प्रमाणित तत्त्वावर पात्र संस्थात्मक खरेदीदारांना (“QIBs”) वाटपासाठी ऑफरच्या 50 % पेक्षा जास्त नसलेले समभाग उपलब्ध होतील. बुक रनिंग लीड मॅनेजर्सशी सल्लामसलत करून कंपनी पात्र संस्थात्मक खरेदीदारांच्या हिश्शातील 60 टक्क्यांपर्यंत समभाग प्रमाणित तत्वावर प्रमुख गुंतवणूकदारांना (“Anchor Investor Portion”) वाटपासाठी उपलब्ध करू देईल. त्यापैकी एक तृतीयांश समभाग स्थानिक म्युचुअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. सेबी आयसीडीआर नियामकांच्या निर्देशांनुसार स्थानिक म्युचुअल फंडांकडून प्रमुख गुंतवणूकदारांसाठी (“प्रमुख गुंतवणूकदार वाटप किंमत”) राखीव करण्यात आलेल्या वाटप किंमतीइतक्या किंवा अधिक किंमतीसाठी ऑफर मिळाल्यासच त्यांना हा एक तृतीयांश हिस्सा मिळू शकेल. वाटप कमी झाल्यास किंवा मुख्य गुंतवणूकदार भागात नॉन-अलोकेशन भाग असल्यास शिल्लक इक्विटी शेअर्सची नेट QIB भागात भर पडेल (मुख्य गुंतवणूकदार भाग वगळून). (the “Net QIB Portion”).
ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास QIB च्या एकूण हिश्शापैकी 5 % (मुख्य गुंतवणूकदार भाग वगळून) फक्त म्युच्युअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध असतील आणि QIBचा उर्वरित हिस्सा म्युच्युअल फंडांसह अन्य सर्व QIB बोलीधारकांसाठी उपलब्ध करून दिला जाईल. तथापि, म्युच्युअल फंडांची एकूण मागणी निव्वळ QIB भागाच्या 5% पेक्षा कमी असल्यास, म्युच्युअल फंड भागामध्ये वाटपासाठी उपलब्ध शिल्लक इक्विटी समभाग QIBs च्या उर्वरित QIB भागाच्या प्रमाणात वाटपामध्ये जोडले जातील.
तसेच, ऑफरच्या 15 टक्क्यांपेक्षा कमी नसलेला हिस्सा बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असेल. त्यापैकी बिगर संस्थात्मक विभागाच्या एक तृतीयांश भाग 200,000 रु. पेक्षा जास्त आणि 1,000,000 रु. पर्यंत अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल आणि बिगर संस्थात्मक विभागाच्या दोन तृतीयांश भाग 1,000,000 रु.पेक्षा अधिक अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल. ऑफर प्राइस इतक्या किंवा त्यापेक्षा जास्त रकमेच्या बोलीवर हे लागू असेल. पुढे, सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार ऑफरच्या 35% पेक्षा कमी नसलेला भाग रिटेल वैयक्तिक गुंतवणूकदारांना (“Retail Portion”) उपलब्ध होईल. पुढे, कर्मचारी आरक्षण भागांतर्गत अर्ज करणार्या पात्र कर्मचार्यांना त्यांच्याकडून प्राप्त झालेल्या वैध बोलींच्या अधीन किंवा ऑफर किमतीच्या वर इक्विटी समभागांचे वाटप प्रमाणानुसार केले जाईल. प्रमुख गुंतवणूकदारांखेरीज (Anchor Investors) सर्व संभाव्य गुंतवणूकदारांनी आपापल्या ASBA खात्यांचा तपशील आणि यूपीआय अर्जदारांसाठी यूपीआय आयडीसह जाहीर करून अर्जाची विहित रक्कम अॅप्लीकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक अमाऊंट (“ASBA”) प्रक्रियेद्वारे करून ठेवणे बंधनकारक आहे. त्यानुसार योजनेत सहभागी करून घेण्यासाठी सर्व बोली रकमा या सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँक्स एससीएसबीतर्फे किंवा यूपीआय यंत्रणे अंतर्गत स्पॉन्सर बँकेतर्फे ब्लॉक करून ठेवण्यात येतील. प्रमुख गुंतवणूकदारांना त्यांच्यासाठीच्या हिश्शात “ASBA” प्रक्रीयेनुसार सहभागी होण्याची परवानगी नाही. तपशीलांसाठी, आरएचपीचे पृष्ठ 466 वरील “ऑफर प्रक्रिया” पहा.
हेम सिक्युरिटीज लिमिटेड हे या ऑफरचे एकमेव बुक रनिंग लीड मॅनेजर्स (“BRLMs”) आहेत.
येथे वापरल्या गेलेल्या परंतु परिभाषित न केलेल्या सर्व कॅपिटलाइज्ड संकल्पनांचा अर्थ आरएचपी मध्ये नमूद केल्यासारखाच असेल


