Saturday, September 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedस्टेट बँक ऑफ इंडिया साजरा करतेय प्रतिष्ठित शाखेचा शतकोत्तर वारसा आणि उत्कृष्टता...

स्टेट बँक ऑफ इंडिया साजरा करतेय प्रतिष्ठित शाखेचा शतकोत्तर वारसा आणि उत्कृष्टता ● वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी एसबीआयच्या प्रतिष्ठित हॉर्निमन सर्कल शाखा, ग्रेड 2A वारसा रचना आणि दक्षिण मुंबईतील सर्वात जुनी वास्तू यांचा शताब्दी म्हणून ₹100 चे स्मारक नाण्याचे केले अनावरण ● ‘द इव्होल्युशन ऑफ स्टेट बँक ऑफ इंडिया’ मालिकेच्या पाचव्या आवृत्तीचे उद्घाटन करत एसबीआय आपला वारसा साजरा करत आहे. या मालिकेत 1981 ते 1996 दरम्यानचा बँकेचा प्रवास असेल.

मुंबई, 19 नोव्हेंबर 2024: स्टेट बँक ऑफ इंडियाच्या समृद्ध वारशाचा गौरव करून, भारताच्या माननीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहारमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी एसबीआयच्या प्रतिष्ठित हॉर्निमन सर्कल शाखेच्या शताब्दीनिमित्त खास ₹100 च्या स्मृती नाण्याचे अनावरण केले. नाण्याचे अनावरण करत असतानाच वित्तमंत्र्यांनी ‘द इव्होल्युशन ऑफ स्टेट बँक ऑफ इंडिया’ मालिकेच्या पाचव्या आवृत्तीचे उद्घाटनही केले. यात 1981 ते 1996 मधील बँकेच्या प्रवासातील एका परिवर्तनीय युगाचे वर्णन आहे. वित्तीय सेवा विभागाचे (DFS) सचिव श्री. एम. नागराजू यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

यावेळी बोलताना केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहारमंत्री Smt. Nirmala Sitharaman म्हणाल्या, “एसबीआयचा उल्लेखनीय प्रवास हा त्यांच्या प्रतिष्ठित शाखेच्या शताब्दी सोहळ्याच्या समारंभात, वाढ आणि सेवेचा असाधारण वारसा प्रतिबिंबित करतो. 1920 च्या विलीनीकरणाच्या वेळी 100 शाखांवरून आज 22,640+ शाखांपर्यंत, आर्थिक वर्ष 2025 मध्ये आणखी 500 जोडण्याच्या योजनांसह, एसबीआयने आपली पोहोच वाढविणे सुरूच ठेवले आहे. एसबीआयचे योगदान आकडेवारीच्या पलीकडे आहे. एसबीआयने अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब करून आणि आर्थिक समावेशन सुनिश्चित करून भारताच्या बँकिंग लँडस्केपमध्ये परिवर्तन घडविले आहे. परंपरेला आधुनिकतेशी जोडण्याचा बँकेचा प्रवास हेरिटेज शाखांच्या जतनातून दिसून येतो, तर बँकेचे YONO सारखे प्रमुख डिजिटल प्लॅटफॉर्म जागतिक स्तरावर भारताच्या फिनटेक क्षमतांचे प्रदर्शन करतात.”

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments