Saturday, September 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedउमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची तिसरी तपासणी संपन्न*

उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची तिसरी तपासणी संपन्न*

*

पुणे,दि.१९:- भारत निवडणुक आयोगाच्या निवडणुक खर्च संनियंत्रण संदर्भातील मार्गदर्शक सूचनेनुसार चिंचवड विधानसभा मतदारसंघ निवडणूक रिंगणातील उमेदवारांची दैनंदिन तिसरी खर्च तपासणी निवडणूक खर्च निरीक्षक प्रेम प्रकाश मीना यांच्या उपस्थितीत तसेच खर्च तपासणी समन्वयक अश्विनी मुसळे, सहाय्यक निवडणूक खर्च निरीक्षक पवन यादव, रमेश फडतरे आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघ खर्च तपासणी कक्ष प्रमुख शिवाजी ठोंबरे यांच्या उपस्थितीत १८ नोव्हेंबर, २०२४ रोजी थेरगाव येथील पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘ग क्षेत्रीय कार्यालयात पार पडली .

तिसऱ्या खर्च तपासणीवेळी खर्च अहवाल सादर न करणाऱ्या उमेदवारांना नियमानुसार नोटीस बजावण्यात आली आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील २१ उमेदवारांपैकी २० उमेदवारांनी निवडणूक खर्च सादर केला असून विनायक सोपान ओव्हाळ (अपक्ष) उमेदवाराने तीनही वेळा झालेल्या खर्च तपासणीवेळी निवडणूक खर्च सादर केला नाही. त्यामुळे या उमेदवाराला निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी नोटीस बजावली आहे.

ज्या उमेदवारांच्या दैनंदिन खर्चामध्ये तफावत आढळली त्यांना देखील नोटीस बजावण्यात आली आहे. राजेंद्र कुंडलिक गायकवाड (बहुजन समाज पार्टी) आणि जावेद रशीद शेख या उमेदवारांच्या खर्चात तफावत आढळली आहे. अनिल बाबू सोनवणे (अपक्ष)या उमेदवाराच्या दैनंदिन खर्चाचे बँक खाते व रोकड खाते यात तफावत आढळली आहे. तसेच मारुती साहेबराव भापकर (महाराष्ट्र स्वराज्य पक्ष) आणि रुपेश रमेश शिंदे (अपक्ष)या उमेदवारांनी गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबत प्रसारमाध्यमांवर जाहिरात प्रसिद्ध केली नाही. या सर्व उमेदवारांना देखील नोटीस बजावली आहे.

लोकप्रतिनिधित्व अधिनियम,१९५१ कलम ७८ अन्वये रिंगणात उभ्या असलेल्या सर्व उमेदवारांनी निवडणुकीच्या निकालाच्या दिवसापासून ३० दिवसाच्या आत निवडणुकीबाबतचा हिशोब निवडणूक आयोगास सादर करणे आवश्यक आहे.
०००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments