पुणे,18 नोव्हेंबर 2024 : वर्ल्ड ऑफ परफॉर्मिंग आर्टस (डब्ल्यूओपीए) चा रविवार,24 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 7 वाजता क्रिएटिसिटी ॲम्फीथिएटर येथे भव्य उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. या प्रसंगी प्रसिध्द कलाकार दानिश हुसेन यांचे सादरीकरण असणारे व दिग्गज कवी आणि गीतकार साहिर लुधियानवी यांच्या आठवणींना उजाळा देणारे ‘ मैं पल दो पल का शायर हूँ’ हे नाटक पाहता येणार आहे. हे वर्ल्ड ऑफ परफॉर्मिंग आर्टस तर्फे आयोजित विंटर थिएटर फेस्टिवल चा एक भाग असून हा मोहत्सव पुढील चार महिने सुरु राहणार आहे .
नव्या पिढीच्या रंगभूमीवर आपल्या सखोल प्रभावासाठी प्रसिध्द असलेले दानिश हुसेन हे साहिर लुधियानवी यांच्या गीतांना उजाळा देणार आहे. यावेळी उपस्थितांना हुसेन यांच्या उत्कृष्ट स्टोरी टेलिंग व नाट्य कौशल्यातून लुधियानवी यांच्या गाण्यांच्या दुनियेत मग्न होण्याची संधी मिळणार आहे.
या कार्यक्रमाच्या तिकीटांबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी बुकमायशोच्या


