Saturday, September 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedलीडग्रुपकडून नॅशनल चॅम्पियन २०२४ प्रदर्शनाचे आयोजन विद्यार्थ्यांमधील कलागुण सादर करण्याची संधी...

लीडग्रुपकडून नॅशनल चॅम्पियन २०२४ प्रदर्शनाचे आयोजन विद्यार्थ्यांमधील कलागुण सादर करण्याची संधी देणारे हक्काचे व्यासपीठ

लीडग्रुप आयोजित नॅशनल चॅम्पियनशिप २०२४ मध्ये सहभागी प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतःमधील चुणूक दाखविण्याची संधी मिळणार

– १.५ दशलक्ष विद्यार्थ्यांना प्रदर्शनातील ५ वर्गवारीतील उपक्रमात सहभाग घेता येणार. या निमित्ताने देशातील युवकांमध्ये आत्मविश्वास वाढविण्याची संधी मिळणार.

मुंबई, २1 नोव्हेंबर २०२४

देशातील सर्वात मोठी शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लीडग्रुपने यंदाच्या नॅशनल चॅम्पियनशिप २०२४ प्रदर्शनाची घोषणा केली आहे. गेल्या काही वर्षांपासून लीडग्रुपच्या वतीने नॅशनल चॅम्पियनशिप प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. यंदा नॅशनल चॅम्पियनशिप प्रदर्शनाचे हे सहावे वर्ष आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांचा विकास व्हावा, यासाठी नॅशनल प्रदर्शन २०२४ स्पर्धेची घोषणा केली गेली. लीडग्रुपशी संलग्न असलेल्या ३ हजार शाळांतील १.५ दशलक्ष विद्यार्थी या स्पर्धेत सहभाग घेतील.

ही स्पर्धा सर्वांसाठी स्पर्धा नसून, चॅम्पियनशिप ठरेल. प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना भविष्यात चांगला नेता, विचारवंत आणि नवकलाकारांना त्यांची खरी क्षमता शोधण्यास मदत करणारे व्यासपीठ ठरेल, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.

या वर्षी नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये विद्यार्थ्यांच्या विकासासाठी संवाद कौशल्य, सखोल विचार, आत्मविश्वास या व्यक्तिमत्त्व विकासासाठी आवश्यक स्वभाव गुणांना वृद्धिंगत करणा-या, कोडिंग शिकविणाऱ्या उपक्रमांवर भर देईल. २१व्या शतकातील तरुणपिढीच्या सर्वांगीण विकासासाठी हे स्वभावगुण आवश्यक ठरतात, असे आयोजकांकडून सांगण्यात आले. राष्ट्रीय चॅम्पियनशिप २०२४ प्रदर्शन पूर्व प्राथमिक ते इयत्ता नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. यंदाची राष्ट्रीय चॅम्पियनशिप राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २०२३ द्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिफारस केलेल्या सर्व घटकांवर आधारित असेल.

हे प्रदर्शन पाच विभागांत होईल. या वर्गवारीतील स्पर्धा विद्यार्थ्यांना जीवनावश्यक कौशल्यांचे ज्ञान देईल, शिवाय प्रदर्शनात सहभाग घेतल्याने विद्यार्थ्यांना भविष्यात आत्मविश्वासाने पाऊल टाकण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. पाचही विभागवारीतील स्पर्धा कल्पकता, स्पेस एक्सप्लोरेशन, तंत्रज्ञान आणि पर्यावरणीय शाश्वतता यांवर आधारलेल्या असतील. या संदर्भातील तपशील खालीलप्रमाणे –

लिटिल चॅम्पस (नर्सरी – वर्ग २) – आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि बोलण्याचे कौशल्य निर्माण करणे.

स्पीच चॅम्प्स (ज्युनियर वर्ग ३-५; सीनियर वर्ग ६-९) – व्यक्तिकेंद्रित विषय, उच्चार आणि वक्तृत्वावर लक्ष केंद्रित करणे.

कोडिंग चॅम्प्स (ज्युनियर: इयत्ता ३री – ५वी ) – दोन जणांची टीम: तांत्रिक कौशल्ये, सर्जनशीलता आणि सहयोग वाढविणे.

स्पेलिंग चॅम्प्स (ज्युनियर वर्ग ३-५; सीनियर वर्ग ६-९) – सर्व विद्यार्थ्यांचे इंग्रजी भाषेचे ज्ञान वृद्धिंगत करणे.

इंग्रजी क्विझ चॅम्प्स (ज्युनियर वर्ग ३-५; सीनियर वर्ग:६-९) – वैयक्तिक: संप्रेषण, सखोल विचार आणि ज्ञानाचा प्रचार करणे.

नॅशनल चॅम्पियनशिप २०२४ बद्दल बोलताना लीडग्रुपच्या वतीने सांगितले की, “कल्पना करा की, एक नर्सरीचा विद्यार्थी मुख्य वक्त्याप्रमाणे आत्मविश्वासाने कल्पना सादर करत आहे किंवा पाचवीमधील विद्यार्थी टेक सोल्युशन विकसित करत विकास घडविण्यास तत्पर आहे. या कृतीसाठी विदयार्थ्यांना संधी मिळायला हवी. ब-याचदा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ही संधी मिळत नाही. नॅशनल चॅम्पियनशिप २०२४ ने १.५ दशलक्ष विद्यार्थ्यांना हे प्रदर्शन घडवून आणले आहे!”

या प्रदर्शनाची अंतिम फेरी नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच जानेवारी महिन्यात पार पडेल. या फेरीत जिंकलेल्या विद्यार्थ्यांना १० लाखांपर्यंत आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी आहे. यात लॅपटॉप, टॅब्लेट, किंडल, ट्रॉफी आणि वस्तूंचा समावेश आहे. यासह विभागीय विजेते घोषित केले जातील. हा उपक्रम लीडग्रुपने नवकल्पनांद्वारे शिक्षणात क्रांती घडवून आणण्यासाठी निर्मित केलेल्या टेकबुकसारख्या ध्येयाशी संलग्न आहे. बुद्धीप्रामाण्याचे द्योतक असलेले हे टेकबुक देशातील शाळांमधील प्रत्येक विद्यार्थ्याला आवश्यक असलेले वैयक्तिक, तपशीलवार अनुकूल शिक्षण उपलब्ध करून देते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments