Saturday, September 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedविदुषी संगीत पंडा उलगडणार ओडिसी संगीताचे विविध पैलू रूप बंदिश...

विदुषी संगीत पंडा उलगडणार ओडिसी संगीताचे विविध पैलू रूप बंदिश फाउंडेशन आणि भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स यांच्या वतीने आयोजन : प्रसिद्ध ओडिसी शास्त्रीय गायिका संगीता पंडा यांची मुलाखत

पुणे : रूप बंदिश फाउंडेशन आणि भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स यांच्या वतीने ओडिसी संगीतातील विविध पैलू आणि बारकावे जाणून घेण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिद्ध ओडिसी शास्त्रीय गायिका विदुषी संगीता पंडा या कार्यक्रमात ओडिसी संगीताचे बारकावे उलगडणार आहेत. शनिवार दिनांक २३ नोव्हेंबर रोजी एरंडवणे येथील भारती विद्यापीठाच्या सेमिनार हॉलमध्ये कार्यक्रम होणार आहे. अशी माहिती संचालक प्रा. शारंगधर साठे यांनी दिली.

हिंदुस्तानी शास्त्रीय गायिका अंजली मालकर यावेळी मुलाखत घेणार आहेत.

निरंजन साहू (मर्दल), केदार टिकेकर (तबला), ऋषित होनावरकर (हार्मोनियम) साथसंगत करणार आहेत.

प्रवंध गायन, आलाप, बोल आलाप, तान, बोल तान वेगवेगळ्या लयबद्ध चक्रांमध्ये (विलंबित व द्रुत) तसेच नाट्यांगेस/भावांगेस, भजने, जनाने आणि जयदेवांच्या श्री गीतगोविंदातील अष्टपदी गायनातही त्यांनी निपुणता साधली आहे. त्यामुळे ओडिसी संगीताच्या क्षेत्रात त्यांनी एक विशेष शैली प्रस्थापित केली आहे. त्यांच्या सादरीकरणाच्या शैलीला केवळ ओडिशामध्येच नव्हे तर संपूर्ण देशभरात मनापासून दाद मिळते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments