Friday, September 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedपाचव्या वार्षिक एएमसी हाफ मॅरेथॉनचे 8 डिसेंबर रोजी आयोजन * असोसिएशन...

पाचव्या वार्षिक एएमसी हाफ मॅरेथॉनचे 8 डिसेंबर रोजी आयोजन * असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंटस्‌‍ पुणे तर्फे मगरपट्टा सिटी व नोबल हॉस्पिटलच्या सहकार्याने आयोजन

पुणे,22 नोव्हेंबर 2024 : असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंटस्‌‍ पुणे (एएमसी) तर्फे मगरपट्टा सिटी व नोबल हॉस्पिटलच्या सहकार्याने 8 डिसेंबर रोजी मगरपट्टा सिटी येथे पाचव्या वार्षिक एएमसी हाफ मॅरेथॉन 2024 चे आयोजन करण्यात आले आहे.या उपक्रमात महत्त्वाच्या आरोग्य समस्यांवर जागरूकता निर्माण केली जाते,तसेच लोकांमध्ये तंदुरूस्तीसाठी धावण्याला प्रोत्साहन मिळावे यासाठी प्रयत्न केला जातो. या वर्षाची संकल्पना हेल्दी बोन्स हेल्दी यू ही आहे.सहयोगी प्रायोजक म्हणून विश्वराज हॉस्पिटल आणि सहप्रायोजक म्हणून सह्याद्रि हॉस्पिटल,हडपसर आणि डॉ.धर्माधिकारी सिलव्हर लायनिंग आयव्हीएफ सेंटर या संस्थांचे उपक्रमाला पाठबळ मिळाले आहे.

एएमसी पुणेचे अध्यक्ष डॉ.हणमंत साळे यांनी अधिक माहिती देताना सांगितले की,ही केवळ धावण्यासाठीची शर्यत असा हा उपक्रम नसून ऑस्टिओपोरोसिस या समस्येविषयी जनजागृती करणे हा आमचा मुख्य हेतू आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या 40 वर्षांवरील सर्व धावपटूंची मॅरेथॉनच्या दिवशी विनामूल्य बोन मिनरल डेन्सिटी स्क्रीनिंग टेस्ट करण्यात येणार आहे. तसेच सर्व सहभागी धावपटूंना ऑस्टिओपोरोसिस विषयी सर्व माहिती देण्यात येणार आहे. इतकेच नव्हे तर प्रत्येक धावपटूला पुण्यातील नामवंत रुग्णालयांची 5000 रुपयांहून अधिक किंमतीची हेल्थ पॅकेजेस डिस्काऊंट कूपन व्हाऊचर्स देण्यात येणार आहे.

असोसिएशन ऑफ इंटरनॅशनल मॅरेथॉन अँड डिस्टंस रनर यांच्याकडून प्रमाणपत्र मिळालेली दक्षिण पूर्व पुणे परिसरातील एएमसी हाफ मॅरेथॉन ही पहिली स्पर्धा आहे. तसेच, मगरपट्टा सिटी परिसरातील वाहतूक मुक्त व सपाट रस्त्यांवर ही स्पर्धा होणार असल्याचे सांगून मगरपट्टा सिटीचे व्यवस्थापकीय संचालक सतीश मगर म्हणाले की, महत्त्वाच्या विषयावर जागरूकता निर्माण करणाऱ्या स्पर्धेशी जोडले गेल्याचा आम्हांला अभिमान वाटतो.

प्रसिद्ध रेडिओलोगिस्ट व एएमसी पुणेच्या सचिव डॉ.रोशनी कावळे म्हणाल्या की, ही स्पर्धा 21 किमी,10किमी,5 किमी व 3किमी अशा चार प्रकारात होणार आहे.यामध्ये पुरूष आणि स्त्रियांसाठी वेगवेगळ्या तीन वयोगटांचा समावेश असून विजेत्यांना आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहेत.त्यामुळे आपला सराव व तंदरुस्ती नुसार योग्य तो गट निवडण्याची मुभा प्रत्येक स्पर्धकाला असणार आहे. याशिवाय धावपटूंना प्रशस्तिपत्रक देण्यात येणार असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. तसेच, हौशी धावपटू ते व्यावसायिक धावपटू या सर्वांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळेल अशी आमची अपेक्षा आहे.

प्रसिद्ध शल्यचिकिस्तक आणि ए एम सी पुणे चे खजिनदार डॉ चेतन म्हस्के म्हणाले की, आम्ही हा उपक्रम ना नफा तत्त्वावर आयोजित करतो.आमच्याकडे काही निधी शिल्लक राहिल्यास त्याचा अन्य सामाजिक उपक्रमांसाठी वापर केला जातो.

स्पर्धा संचालक व प्रख्यात अस्थिरोग शल्यविशारद डॉ.हृषिकेश मेहता म्हणाले की, भारतातील 50 वर्षांवरील दर तीन पैकी एका महिलेला व 60 वर्षावरील दर पाच पैकी एका पुरुषाला ऑस्टिओपोरोटिक फ्रॅक्चरचा धोका असतो. उच्च रक्तदाब हा ज्याप्रमाणे स्ट्रोकसाठी एक जोखमीचा घटक असतो त्याचप्रमाणे ऑस्टिओपोरोसिस हा फ्रॅक्चर्ससाठी जोखमीचा घटक असतो. ऑस्टिओपोरोटिक फ्रॅक्चर्स ही एक गंभीर आरोग्य समस्या असून चिकित्सा खर्च आणि जीवनमान यावर याचा परिणाम होतो.ऑस्टिओपोरोसिसचे लवकर निदान झाल्यास व त्यावर योग्य वेळेस उपचार सुरू केल्यास फ्रॅक्चर्स टाळता येऊ शकतात. जागरूकतेच्या अभावी हाडांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते. या मॅरेथॉन द्वारे सामान्य लोकांमध्ये हाडांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

या हाफ मॅरेथॉनचे संपूर्ण व्यवस्थापन भव्य स्पर्धांच्या आयोजनाचा अनुभव असलेल्या ब्लु ब्रिगेड टीम या व्यावसायिक संस्थेकडे सोपविण्यात आला आहे. या स्पर्धेपूर्वी सर्व स्पर्धकांना दर विकेंडला ब्लु ब्रिगेड फाउंडेशनच्या सर्व सराव ठिकाणांवर विनामूल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

एएमसी हाफ मॅरेथॉन स्पर्धेसाठी नावनोंदणी सुरु झाली असून 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत नावनोंदणी करणाऱ्या स्पर्धकांना 10 टक्के सवलत देण्यात येणार आहे.

जास्तीत जास्त धावपटूंनी या स्पर्धेत सहभागी व्हावे व याबाबत जागरूकता निर्माण करावी असे आवाहन आयोजन सचिव डॉ. हरिदास ओंकार यांनी केले आहे. तसेच सर्व धावपटूंसाठी ही स्पर्धा एक अविस्मरणीय अनुभव ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नावनोंदणीसाठी खालील क्यूआर कोड स्कॅन करा.

image.png

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments