पुणे,25 नोव्हेंबर 2024 : अलायन्स इन्शुरन्स ब्रोकर्स प्रा.लि.ने पुण्यात आपल्या व्यवसायाचा विस्तार केला असून नवीन कार्यालय सुरू केले आहे.याप्रसंगी कंपनीचे सहसंस्थापक व संचालक अतुर ठक्कर,सीएसजीचे संचालक जी.एन.साथपती,प्लेसमेंट ॲन्ड अंडररायटिंगचे संचालक प्रांतिक मित्रा,क्षेत्रीय संचालक व हेड ऑफ इमर्जिंग मार्केट सीएसजी बाप्पादित रॉय व अलायन्स इन्शुरन्स ब्रोकर्सच्या मुख्य कार्यालयातील अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.या नवीन केंद्राद्वारे प्रॉपर्टी,मरिन,लायब्लिटी आणि आरोग्य विम्यासारखी पारंपरिक विमा उत्पादने अलायन्स तर्फे प्रदान केली जातील.त्याशिवाय ओपीडी आणि ॲफिनिटी इन्शुरन्स ,पुणे व नाशिक,छत्रपती संभाजीनगर,कोल्हापूर,फलटण इत्यादी आसपासच्या औद्योगिक शहरातील ग्राहक आणि व्यावसायिक संस्थांसाठी श्युरिटी बाँडस यासारखे नवीन काळातील व अभिनव उत्पादने प्रदान केली जातील.भविष्यात विस्तारासाठी आणखी विमा उत्पादने प्रदान केली जातील.सध्या पुण्यातील कार्यालयामध्ये 25 लोकं कार्यरत असून पुढील वित्तीय वर्षाच्या सुरूवातीला आणखी विस्तार होईल.कोरेगाव पार्क ॲनेक्स येथील मोठ्या कार्यालयातील विस्ताराचे उद्दिष्ट हे मोठ्या कंपन्यांशी नाते अधिक दृढ करणे हे आहे.
अलायन्स इन्शुरन्स ब्रोकर्सचा पुण्यात नवीन कार्यालयासह विस्तार
RELATED ARTICLES


