पुणे : महाराष्ट्रातील अविस्मरणीय व अद्वितीय मंदिरे व मूर्तीच्या फोटोंचे प्रदर्शन पुण्यात आयोजित करण्यात आले आहे. ‘देवाचे हात’ या प्रदर्शनात २ हातांपासून ते ४२ हातांपर्यानतच्या मूर्तीच्या फोटो हे प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे. बालगंधर्व रंगमंदिर येथील दि. २८ ते ३० नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते रात्री ८. ३० यावेळेत हे प्रदर्शन होणार असून विनामूल्य प्रवेश आहे.
प्रदर्शनाचे उद्घाटन तालयोगी पद्मश्री पं. सुरेश तळवलकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा उद्योजक पुनीत बालन असणार आहेत. तसेच पद्मश्री पं. विजया घाटे, पद्मश्री गिरीश प्रभुणे, ज्येष्ठ मूर्तिशास्त्र अभ्यासक डॉ.गो. बं. देगलूरकर, विलास जावडेकर, दीपक मानकर, मिलिंद तुळाणकर, दिपक नागपुरे, प्रसन्न जगताप आदी मान्यवर देखील उपस्थित राहणार आहेत.
कै. मोरेश्वर कुंटे व विजया कुंटे यांनी दुचाकी वरून प्रवास करीत संकलित केलेल्या महाराष्ट्रातील १८ हजार मंदिरांपैकी काही अविस्मरणीय व अद्वितीय मंदिरे यानिमित्ताने पुणेकरांना फोटोंच्या माध्यमातून पाहता येणार आहेत. तसेच मूतींमधील विविध वैशिष्ट्ये व माहिती देखील यानिमित्ताने मिळणार आहे. तरी पुणेकरांनी मोठ्या संख्येने प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
—


