Friday, September 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedएकरकमी परतावा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

एकरकमी परतावा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

पुणे, दि. 2: महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि महामंडळाकडील कर्जप्रकरणात संपूर्ण थकीत कर्ज रकमेचा एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थ्यांस थकीत व्याज रकमेत 50 टक्के सवलत देण्याबाबतची योजना 31 मार्च 2025 पर्यंत राबविण्यात येत असून थकबाकीदार लाभार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक रवींद्र दरेकर यांनी केले आहे.

इतर मागासवर्ग प्रवर्गातील व्यक्तींना स्वयंरोजगाराकरीता महामंडळामार्फत थेट कर्ज योजना, वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना व गट कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात येत आहेत. या योजनेअंतर्गत थकीत कर्ज एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थीस थकीत व्याज रक्कमेत 50 टक्के सवलतीची एकरकमी परतावा योजनेस महामंडळाच्या संचालक मंडळाने मंजूरी दिलेली आहे, अशी माहिती श्री. दरेकर यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments