Friday, September 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedएअरबीएनबी आणि गोवा पर्यटन खात्याकडून गोव्यात भारतातील पहिल्या एअरबीएनबी उद्योजकता अकादमीचा शुभारंभ

एअरबीएनबी आणि गोवा पर्यटन खात्याकडून गोव्यात भारतातील पहिल्या एअरबीएनबी उद्योजकता अकादमीचा शुभारंभ

गोवा, ५ डिसेंबर, २०२४ – गोवा सरकारच्या पर्यटन खात्याच्या सहकार्याने एअरबीएनबीला, गोवा सरकारचे पर्यटन मंत्री श्री रोहन खंवटे आणि अमनप्रीत बजाज, महाव्यवस्थापक, एअरबीएनबी इंडिया, दक्षिणपूर्व आशिया, हाँगकाँग आणि तैवान यांच्या उपस्थितीत, गोव्यात भारतातील पहिली वहिली एअरबीएनबी उद्योजकता अकादमी सुरू करताना अभिमान वाटतो. हा ऐतिहासिक उपक्रम एअरबीएनबी आणि गोवा पर्यटन खाते (डीओटी) यांच्यातील विद्यमान सामंजस्य कराराचा एक भाग म्हणून सुरू करण्यात आला आहे. हा उपक्रम होमस्टे पर्यटनाला प्रोत्साहन व चालना देण्यासाठी, राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागात आदरातिथ्य उद्योजकांमध्ये क्षमता निर्माण करण्यासाठी आहे.

एअरबीएनबी उद्योजकता अकादमीचे उद्दिष्ट विविध आणि कमी प्रतिनिधित्व असलेल्या समुदायातील व्यक्तींना एअरबीएनबीवर होस्टिंगच्या (आदरातिथ्याच्या) जगाशी ओळख करून देऊन, सर्वसमावेशकतेला चालना देणे हे आहे. हा उपक्रम सहभागींना त्यांचा होस्टिंग प्रवास सुरू करण्यासाठी साधने आणि संबंधित ज्ञान देऊन, त्यांना सक्षम करण्यासाठी त्यानुसार तयार केला आहे. आत्तापर्यंत, अकादमी, एअरबीएनबी आणि गोवा पर्यटन खाते (डीओटी) यांनी २५ होमस्टे मालकांना ग्लोबल हिमालयन एक्स्पिडिशन (जीएचई) इम्पॅक्ट व्हेंचर्सच्या भागीदारीसह आयोजित संवादात्मक कार्यशाळेद्वारे प्रशिक्षण दिले आहे. उत्तर गोव्यातील सहभागींसाठी मिरामार रेसिडेन्सी येथे कार्यशाळेची पहिली फेरी पार पडली. प्रशिक्षणाची पुढील फेरी मडगाव येथे आयोजित केली जाईल, ज्यामध्ये दक्षिण गोव्यातील आणखी २५ प्रशिक्षणार्थींना सहभागी केले जाईल.

गोवा सरकारचे माननीय पर्यटन मंत्री श्री रोहन खंवटे म्हणाले, कि “गोव्यासाठी होमस्टे हा विभाग गोव्याच्या प्रख्यात आदरातिथ्यासह, समृद्ध अश्या गोमंतकीय संस्कृतीचे जतन करून, पुनरुत्पादक पर्यटनाला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. विशेषत: ग्रामीण गोव्याच्या फायद्यासाठी तयार केलेले आमचे होमस्टे धोरण, आमच्या ‘गोवा बियॉन्ड बीचेस’ दृष्टीशी अखंडपणे संरेखित होते. महिला, बहुतेकदा होमस्टेमध्ये पुढे असतात, या उपक्रमांतर्गत विविध वित्तीय आणि बिगर – वित्तीय प्रोत्साहनांद्वारे महिला लक्षणीय लाभ घेतील. एअरबीएनबी सोबत असलेल्या आमच्या सामंजस्य करारानुसार, गोव्यात एअरबीएनबी उद्योजकता अकादमीच्या शुभारंभाचे स्वागत करताना, आम्हाला आनंद होत आहे. हा उपक्रम गोव्यासाठी स्थानिक समुदायांना सशक्त बनवताना, त्यांच्या अद्वितीय सांस्कृतिक आणि नैसर्गिक मालमत्तेचा लाभ घेण्याची एक उत्तम संधी प्रदान करतो. रहिवाशांना होमस्टे चालवण्याच्या कौशल्याने सुसज्ज करून, आम्ही केवळ आर्थिक विकासाला चालना देत नाही तर पुनरुत्पादक पर्यटन आणि महिला सशक्तीकरण देखील वाढवत आहोत. हा कार्यक्रम आम्हाला गोव्याचे वैविध्यपूर्ण आणि अस्सल अनुभव प्रदर्शित करण्यास सक्षम करेल तसेच अभ्यागतांना पारंपारिक पर्यटन हॉटस्पॉट्सच्या पलीकडे जाण्यासाठी व जबाबदार, समावेशक असा प्रवास स्वीकारण्यास देखील प्रेरणा देईल.”

गोवा सरकारच्या पर्यटन विभागाचे संचालक श्री. सुनील अंचिपाका, आयएएस म्हणाले, कि “एअरबीएनबी उद्योजकता अकादमी हे पर्यटन उद्योगाच्या माध्यमातून गोव्याच्या समुदायाना सक्षम बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. स्थानिकांना आवश्यक कौशल्यांनी सुसज्ज करून, हा उपक्रम सर्वसमावेशक विकासाला चालना देण्याच्या आणि गोव्याचे अस्सल अनुभव जगाला दाखविण्याच्या आमच्या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे.”

गोव्याच्या दोलायमान पर्यटन क्षेत्रामधील विशिष्ट गरजा आणि वाढीच्या संधींवर लक्ष केंद्रित करून, अकादमीचा अभ्यासक्रम उद्योजकता, अनुभवात्मक शिक्षण आणि समुदाय सक्षमतेवर भर देतो. सहभागींना एअरबीएनबी होस्ट असण्याची गरज नाही, त्यांनी फक्त त्यांची होस्टिंग कौशल्ये सुधारण्याची आणि प्रवाशांशी प्रामाणिकपणे जोडण्याची आवड सामायिक करणे आवश्यक आहे. अकादमीमध्ये सामील होऊन सहभागी, आर्थिक स्वातंत्र्य मिळवू शकतात आणि त्यांच्या घरातील किंवा मालमत्तेतील अतिरिक्त खोल्यांचे रूपांतर उत्पन्न वाढवणाऱ्या मालमत्तेत करून, स्थानिक अर्थव्यवस्थेत देखील योगदान देऊ शकतात.

एअरबीएनबी इंडिया, दक्षिणपूर्व आशिया, हाँगकाँग आणि तैवानचे महाव्यवस्थापक श्री. अमनप्रीत बजाज म्हणाले, कि “गोव्यात एअरबीएनबी उद्योजकता अकादमी सुरू करून आम्ही पर्यटन उद्योगाद्वारे जीवन बदलण्यासाठी समर्पित आहोत. स्थानिक समुदायाना त्यांच्या घराचे, फायदेशीर उपक्रमांमध्ये रूपांतर करण्यात मदत करण्यास योग्य शिक्षण आणि कौशल्याने सक्षम करण्यासाठी, हा कार्यक्रम धोरणात्मकरीत्या आणि काळजीपूर्वक तयार करण्यात आला आहे. अकादमीच्या शुभारंभासह, आम्ही एक दोलायमान अशी स्थानिक पर्यटन अर्थव्यवस्था जोपासण्यासाठी कटिबद्ध आहोत, ज्यामुळे सर्वांना फायदा होईल व गोव्यातील सर्व पाहुण्यांचा अनुभव वाढवून सहभागींसाठी शाश्वत संधी निर्माण होतील.”

एअरबीएनबी उद्योजकता अकादमीची सुरुवात ही गोव्याच्या पर्यटन क्षेत्रामध्ये एक नवीन अध्याय चिन्हांकित करून, सर्वसमावेशक वाढ आणि शाश्वत विकासाला चालना देत आहे. स्थानिक समुदायाचे सक्षमीकरण करून आणि जबाबदार पर्यटनाला चालना देऊन, एअरबीएनबी व गोवा पर्यटन खाते गोव्यातील समृद्ध आणि लवचिक पर्यटन परिसंस्थेचा मार्ग मोकळा करत आहेत.

एअरबीएनबी बद्दल :
एअरबीएनबीचा जन्म २००७ मध्ये झाला, जेव्हा दोन यजमानांनी त्यांच्या सॅन फ्रान्सिस्कोच्या घरी, तीन पाहुण्यांचे स्वागत केले आणि तेव्हापासून ५ दशलक्षाहून अधिक होस्ट झाले आहेत. ज्यांनी जगभरातील जवळजवळ प्रत्येक देशात १.५ अब्ज अतिथींचे स्वागत केले आहे. दररोज, यजमान (होस्ट) अद्वितीय मुक्काम आणि अनुभव देतात, जे अतिथींना अधिक प्रामाणिक मार्गाने समुदायाशी जोडणे शक्य करतात.

एअरबीएनबी उद्योजकता अकादमीबद्दल :
जगभरातील समुदायाना पर्यटनाचा लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने, एअरबीएनबीने २०१७ मध्ये एअरबीएनबी उद्योजकता अकादमी सुरू केली. हा उपक्रम आमच्या माध्यमातून एअरबीएनबी वर होस्टिंगसाठी वैविध्यपूर्ण आणि ऐतिहासिकदृष्ट्या कमी प्रतिनिधित्व असलेल्या समुदायातील लोकांची, ओळख करून देतो. अकादमीच्या माध्यमातून, एअरबीएनबी स्थानिक संस्थांसोबत तयार केलेले शैक्षणिक कार्यक्रम विकसित करण्यासाठी कार्य करते, जे सहभागींना त्यांच्या वापरात नसलेली खोली किंवा मालमत्तेला एअरबीएनबीवरील ट्रॅव्हल प्लॅटफॉर्मवर, अतिरिक्त पैशाच्या स्रोतामध्ये बदलून उद्योजक कसे बनायचे, हे शिकण्यास मदत करते.

ही अकादमी होस्टिंगद्वारे आर्थिक संधींचा मार्ग प्रदान करते. २०१७ मध्ये सुरु झाल्यापासून, या कार्यक्रमाने जागतिक स्तरावर विविध पार्श्वभूमीतील ४,५०० पेक्षा जास्त व्यक्तींना, एअरबीएनबी होस्टिंगची ओळख करून दिली आहे आणि स्थानिक संस्थांशी सहयोग करून, अनुरूप शैक्षणिक कार्यक्रम देखील तयार केले आहेत.

या कार्यक्रमाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, कृपया एअरबीएनबी उद्योजकता अकादमीला भेट द्या

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments