Friday, September 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedसहकार भारतीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी डॉ. उदय जोशी आणि राष्ट्रीय महामंत्रीपदी दीपक चौरसिया...

सहकार भारतीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी डॉ. उदय जोशी आणि राष्ट्रीय महामंत्रीपदी दीपक चौरसिया यांची निवड*

अमृतसर (पंजाब), दि. ८ डिसें.- सहकार भारतीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी डॉ. उदयराव जोशी यांची तर राष्ट्रीय महामंत्रीपदी श्री. दीपक चौरसिया यांची आज अमृतसर येथील 8 व्या राष्ट्रीय अधिवेशनात एकमताने निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकार भारतीचे संरक्षक श्री. रमेश वैद्य यांनी कामकाज पाहिले. सदरची निवड पुढील ३ वर्षांसाठी आहे.
यापूर्वी डॉ. उदय जोशी राष्ट्रीय महामंत्री म्हणून २०१५ पासून काम पाहत होते तर चौरसिया हे राष्ट्रीय मंत्री म्हणून कार्यरत होते. सहकार भारती १९७८ पासून “बिना संस्कार, नहीं सहकार” हे ब्रीद घेऊन सहकार चळवळीत कार्यरत आहे. अखिल भारतीय स्तरावर २८ राज्यात सहकार भारती अविरतपणे काम करीत आहे. अमृतसर येथे सुरू असलेल्या या ८ व्या अधिवेशनासाठी उभारलेल्या “महाराजा रणजितसिंह सभागृहात” संपूर्ण भारतातून २५०० पेक्षा अधिक कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित आहेत. या अधिवेशनात स्व. लक्ष्मणराव इनामदार स्मृती पुरस्कार गुजरात विधानसभेचे अध्यक्ष शंकर चौधरी यांना तर स्व. अण्णासाहेब गोडबोले स्मृती पुरस्कार मुलकनुर ग्रामीण पतसंस्था आणि विपणन सोसायटी (तेलंगणा) यांना पंजाबचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्याचसोबत इफ्कोचे एमडी उदय शंकर अवस्थी यांना “फर्टिलायझर मॅन ऑफ इंडिया” या विशेष पुरस्काराने गौरवण्यात आले. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबले यांचे प्रमुख भाषण झाले. अधिवेशनाचा समारोप आज (रविवार, ८ डिसेंबर) केंद्रिय रस्ते, जलमार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे.
—–

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments