पुणे, दि.7 डिसेंबर 2024- पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित पहिल्या पीवायसी- स्वोजस एंटरप्रायझेस टेनिस साखळी स्पर्धेत स्पिअर्स, काराज कार्डिनल्स या संघांनी आपली विजयी मालिका कायम ठेवत दुसरा विजय नोंदवला.
पीवायसी हिंदू जिमखाना येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत काराज कार्डिनल्स संघाने ब्लॅक हॉक्स संघाचा 4-3 असा संघर्षपूर्ण पराभव केला. काराज कार्डिनल्स संघाकडून रोहन छाजेड, अंकुश मोघे, रणजित पांडे, आधीरित गुप्ता, निनाद देशमुख, मधुरा टेंभे, ध्रुव देशपांडे, निखिल चितळे यांनी अफलातून कामगिरी केली. दुसऱ्या सामन्यात स्पिअर्स संघाने राफा बुल्स संघावर 6-1 असा एकतर्फी विजय मिळवला. स्पिअर्स संघाकडून तन्मय चोभे, मिहिर दिवेकर, रिया वाशिमकर, केदार नाडगोंडे, समीहन मेहेंदळे, अनुज मेहता, सोहिल गाला, राहुल गांगल, आरिन माळी, आर्य देवधर, साकेत गोडबोले, मिहीर ठोंबरे यांनी संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
अन्य लढतीत सालसा आहेर, जयदीप वाकणकर, पराग चोपडा, संग्राम पाटील, प्रियदर्शन डुंबरे ,अभिजीत खानविलकर, समीर सावला, भाग्यश्री देशपांडे, प्रीती मराठे, राहुल पाठक, सौरभ प्रभुदेसाई, नरेंद्र बापट यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर पायरेट्स संघाने बेल्फिन्स टायगर्स संघावर 6-1 असा विजय मिळवला.
निकाल: साखळी फेरी:
काराज कार्डिनल्स वि.वि.ब्लॅक हॉक्स 4-3 (गोल्ड खुला दुहेरी 1: आदित्य अभ्यंकर/रोहन ए पराभुत वि.सन्मय तेलंग/रोनित मुथा 3-5; सिल्व्हर खुला दुहेरी 1: रोहन छाजेड/अंकुश मोघे वि.वि.संतोष शहा/मधुर इंगहळीकर 4-0; सिल्व्हर खुला दुहेरी 2: रणजित पांडे/आधीरित गुप्ता वि.वि.शिरीष साठे/बिपिन देव 4-2; सिल्व्हर खुला दुहेरी 3: निनाद देशमुख/मधुरा टेंभे वि.वि.आलोक तेलंग/सौरभ चिंचणकर 4-2: सिल्व्हर खुला दुहेरी 4: प्रशांत वैद्य/सान्वी जोग पराभुत वि.चिन्मय चिरपुटकर/मंदार चितळे 1-4; ब्रॉन्झ खुला दुहेरी 1: सुधांशू मेडसीकर/राहुल कुलकर्णी पराभुत वि.तन्मय आगाशे/हर्षद जोगाईकर 0-3; ब्रॉन्झ खुला दुहेरी 2: ध्रुव देशपांडे/निखिल चितळे वि.वि.समीर जालन/शारदा बापट 3-2(7-3));
स्पिअर्स वि.वि.राफा बुल्स 6-1 (गोल्ड खुला दुहेरी 1: तन्मय चोभे/मिहिर दिवेकर वि.वि.सारंग देवी/अजिंक्य मुठे 5-1; सिल्व्हर खुला दुहेरी 1: रिया वाशिमकर/केदार नाडगोंडे वि.वि. करण बापट/क्षितिज कोतवाल 4-3(7-4); सिल्व्हर खुला दुहेरी 2: समीहन मेहेंदळे/अनुज मेहता वि.वि.वैजयंती मराठे/अमेय वाकणकर 4-2; सिल्व्हर खुला दुहेरी 3: सोहिल गाला/राहुल गांगल वि.वि.विराज खानविलकर/श्रेया देशपांडे 4-1; सिल्व्हर खुला दुहेरी 4: आरिन माळी/आर्य देवधर वि.वि.यश बाहुलीकर/अयान जमेनीस 4-2; ब्रॉन्झ खुला दुहेरी 1: राहुल रोडे/नितीन पेंडसे पराभूत वि. कनाका आपटे/देव मुठे 2-3(3-7);ब्रॉन्झ खुला दुहेरी 2: साकेत गोडबोले/मिहीर ठोंबरे वि.वि.रोहित कर्णिक/सुदर्शन बिहाणी 3-0);
पायरेट्स वि.वि.बेल्फिन्स टायगर्स 6-1 (गोल्ड खुला दुहेरी 1: सालसा आहेर/जयदीप वाकणकर वि.वि.तनिश बेलगलकर/केदार देशपांडे 5-1; सिल्व्हर खुला दुहेरी 1: पराग चोपडा/संग्राम पाटील वि.वि.कल्पक पत्की/तुषार नगरकर 4-1; सिल्व्हर खुल दुहेरी 2: प्रियदर्शन डुंबरे/अभिजीत खानविलकर वि.वि.नकुल ओगले/नेहा ताम्हाणे 4-; सिल्व्हर खुल दुहेरी 3: समीर सावला/भाग्यश्री देशपांडे वि.वि.पराग टेपण/अनिश राणे 4-2; सिल्व्हर खुला दुहेरी 4: समीर जोग/यश शहा पराभुत वि.अन्विता टेपण/कर्णा मेहता 1-4; ब्रॉन्झ खुला दुहेरी 1: प्रीती मराठे/राहुल पाठक वि.वि.अरिका ताम्हाणे/नंदन डोंगरे 3-0; ब्रॉन्झ खुला दुहेरी 2: सौरभ प्रभुदेसाई/नरेंद्र बापट वि.वि.सचिन बेलगलकर/ऋषभ बेहारे 3-1).


