Friday, September 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedभारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन ‘किसान’ ११ ते १५ डिसेंबर...

भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन ‘किसान’ ११ ते १५ डिसेंबर २०२४ पीआयईसीसी, मोशी ~ पुणे येथे + किसान मालिकेतील ३३ वे कृषी प्रदर्शन + प्रदर्शन वेळ: सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत + ५०० पेक्षा अधिक प्रदर्शक + भारतभरातून एक लाखाहून अधिक शेतकरी व उद्योजक + ऑनलाईन पूर्वनोंदणीला प्रचंड प्रतिसाद + प्रदर्शक, त्यांची उत्पादने व सेवांची माहिती मोबाईल ॲपवर

भारतातील सर्वात मोठे कृषि प्रदर्शन ‘किसान’ दिनांक ११ ते १५ डिसेंबर २०२४ दरम्यान पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व संमेलन केंद्र, मोशी, भोसरीजवळ, पुणे येथे आयोजित होत आहे.

१५ एकर पसरलेल्या प्रदर्शनात ५०० हून अधिक कंपन्या, संशोधन संस्था व नवउद्योजक शेतीतील नवीन तंत्रज्ञान व उत्पादने सादर करतील. प्रदर्शनाच्या ५ दिवसांमध्ये देशभरातून एक लाखाहून अधिक शेतकरी भेट देतील असा अंदाज आहे. आधुनिक तंत्रज्ञान व नवे विचार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे हे किसान प्रदर्शनाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

किसान प्रदर्शनाला शेती क्षेत्रातील मान्यवर संस्थांचा सहभाग व सहकार्य लाभले आहे.

यंदा किसान प्रदर्शनात संरक्षित शेती, पाणी नियोजन, कृषी निविष्ठा, यंत्रसामुग्री, पशुधन, जैव, ऊर्जा, वाटिका व शेती लघु उद्योग अशी विभागवार दालने उभी करण्यात आलेली आहेत. प्रत्येक दालनात त्या विशिष्ठ उद्योगातील कंपन्यांचे स्टॉल शेतकऱ्यांना पाहायला मिळतील. शेतीसाठी लागणारी यंत्रे व उपकरणांचे प्रदर्शन खुल्या जागेत आयोजित केले आहे.

पूर्वनोंदणी : प्रदर्शनाच्या प्रवेशव्दारावर मोबाईल ॲपद्वारे आगाऊ नावनोंदणीची सोय केली आहे. ३०,००० हुन अधिक शेतकऱ्यांनी पूर्वनोंदणी केली असून ही संख्या १००,००० ओलांडण्याची अपेक्षा आहे.
किसान आता मोबाईलवरसुद्धा – प्रत्यक्ष प्रदर्शनातील सहभागासोबतच प्रदर्शक कंपन्या किसान ॲपवर त्यांच्या उत्पादनांची डिजिटल यादी देखील प्रसिद्ध करू शकतात. शेतकरी घरबसल्या विविध उत्पादनांविषयी माहिती मिळवू शकतात आणि त्यांच्या मोबाईलवर संबंधित व्हिडिओ पाहू शकतात. प्रदर्शक आणि अभ्यागत प्रत्यक्ष प्रदर्शनात भेटण्यापूर्वीच किसान ॲपच्या माध्यमातून परस्परांशी संवाद सुरू करू शकतात.

मातीमोल : या वर्षी किसानमध्ये मातीमोल हा मातीच्या आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करणारा उपक्रम साजरा केला जात आहे. आपली माती जिवंत आहे की नाही? यावर चर्चा सुरू करणे, मातीच्या आरोग्याविषयी शेतकरी समुदायामध्ये जागरूकता वाढवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. चला आपल्या मातीची स्थिती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊया, अर्थात मातीमोल जाणूया. हा उपक्रम जैवतंत्रज्ञान विभाग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरेखित विभागांसोबत संयुक्तपणे आयोजित करण्यात येत आहे.

बिझनेस लाउंज: प्रदर्शकांना आणि अभ्यागतांना व्यावसायिक चर्चा करण्यासाठी बिझनेस लाउंजची योजना करण्यात आली आहे. लाउंजच्या माध्यमातून शेतीशी संबंधित व्यावसायिकांना एकत्र येऊन परस्परसंवाद, सहयोग, किंवा भागीदारींसाठी प्रोत्साहन मिळेल.

स्थळ: किसान प्रदर्शनाचे आयोजन पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व संमेलन केंद्र येथे करण्यात आले असून प्रदर्शन मैदानाची देखभाल पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाद्वारे (पीएमआरडीए) करण्यात आली आहे.

किसान प्रदर्शनाचे उदघाटन बुधवार दिनांक ११ रोजी सकाळी ९ वाजता प्रदर्शन स्थळी येणाऱ्या शेतकऱ्यांच्या पहिल्या गटाच्या हस्ते करण्यात येणार आहे.

किसान प्रदर्शनाविषयी अधिक माहितीसाठी संकेतस्थळाला भेट द्या: pune.kisan.in

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments