Friday, September 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedग्योथं - इन्स्टिट्युट मॅक्स म्यूलर भवन, पुणे व एमईएस सिनियर कॉलेज पुणे...

ग्योथं – इन्स्टिट्युट मॅक्स म्यूलर भवन, पुणे व एमईएस सिनियर कॉलेज पुणे तर्फे आयोजित जर्मन नाट्य स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद * शाळा व कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी दर्शविली सर्जनशीलता व भाषा कौशल्य

पुणे,9 डिसेंबर 2024 : ग्योथं – इन्स्टिट्युट मॅक्स म्यूलर भवन, पुणे व एमईएस सिनियर कॉलेज पुणे यांच्या तर्फे नुकतेच एमईएस सभागृह,कोथरूड येथे जर्मन नाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत पुणे, कोल्हापूर आणि आष्टा येथून 9 शाळा आणि 3 कॉलेजेस यांसह एकूण 150 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेचा विषय शाश्वतता आणि वैविध्यता हा होता.

या स्पर्धेत शालेय गटात सूस येथील ध्रुव इंग्लिश मिडियम स्कूल यांनी पहिले स्थान पटकावले.तसेच सिटी प्राईड स्कुल,निगडी आणि एसपीएम पब्लिक इंग्लिश मिडियम स्कुल यांनी अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान पटकावले.क्लेअरमाँट इंटरनॅशनल स्कुल,आष्टा ला उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आला.

महाविद्यालयीन गटात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील जर्मन भाषा विभागाने पहिले स्थान पटकावले.

ग्योथं – इन्स्टिट्युट मॅक्स म्यूलर भवन पुणेच्या उपसंचालक व भाषा विभाग प्रमुख अलिसिया पॅद्रोस,एमईएस सिनियर कॉलेजच्या उपप्राचार्य डॉ.पूनम राऊत आणि एमईएस सिनियर कॉलेजमधील बीबीए – आयबी विभागाच्या प्रमुख डॉ.सुरेखा वैद्य यांच्या हस्ते विजेत्या टीम्सना पारितोषिके देण्यात आली.परीक्षक मंडळामध्ये ग्योथं – इन्स्टिट्युट मॅक्स म्यूलर भवन पुणेचे शिवप्रसाद जोशी आणि संयोगिता पेंडसे यांचा समावेश होता.

कला जोपासा कारण हा आपल्याला समृध्द करणारा पैलू आहे,असे मत अलिसिया पॅद्रोस यांनी यावेळी व्यक्त केले.

युवा विद्यार्थ्यांच्या संघाने संकल्पनेचे वैविध्यपूर्ण सादरीकरण करत सर्जनशीलता,आत्मविश्वास आणि भाषा कौशल्य दर्शविले.
ग्योथं – इन्स्टिट्युट मॅक्स म्यूलर भवन, पुणे आणि एमईएस सिनियर कॉलेज यांच्यातील समन्वय आणि सहकार्य तसेच एमईएस सिनियर कॉलेजचे प्राचार्य डॉ.रविंद्र वैद्य आणि ग्योथं – इन्स्टिट्युटमधील शिक्षण सेवा विभागाच्या प्रकल्प व्यवस्थापक वैशाली दाबके यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला.

वैशाली दाबके यांनी आभार प्रदर्शन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments