Friday, September 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedवेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी रायझिंग राजस्थान समिटमध्ये राजस्थानमधील गुंतवणूक आणि वाढीबद्दल...

वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी रायझिंग राजस्थान समिटमध्ये राजस्थानमधील गुंतवणूक आणि वाढीबद्दल माहिती दिली

जयपूर, 9 डिसेंबर, 2024: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी आज राजस्थानला भारतातील छान ठिकाण म्हणून संबोधले आणि सांगितले की, शाश्वत विकासामुळे, प्रगतीमुळे राज्याच्या विकासात अनेक पटींनी वाढ होऊ शकते. रायझिंग राजस्थान समिटला संबोधित करताना श्री. अग्रवाल म्हणाले की, राजस्थानात तेल, वायू, पोटॅश, रॉक फॉस्फेट, शिसे, जस्त आणि चांदी यांसह मुबलक नैसर्गिक साधन संपत्ती आहे.

“जगातील सर्व यशस्वी देश जमिनीखालील साधन संपत्तीमुळे विकसित झाले आहेत. त्याच मार्गावर आपणही पुढे जायला हवे. येथे बांधकामासाठी आवश्यक असलेल्या दगडांचा इटलीपेक्षा तिप्पट साठा आहे. औद्योगिकदृष्ट्या विकसित राज्य असलेल्या गुजरातचा शेजारी असल्याने राजस्थानला त्याचा खूप फायदा होऊ शकतो, गुजरातमध्ये बंदरही आहे. येथे तेल, वायू, पोटॅश, रॉक फॉस्फेट, शिसे, जस्त, चांदी आहे. जर तुम्ही राजस्थानमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला लवकर नफा मिळेल,” असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.

आपल्या भाषणादरम्यान श्री. अग्रवाल यांनी घोषणा केली की, येत्या काही वर्षांत वेदांत राज्यात 1 लाख कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणूक करणार आहे. शेकडो एसएमईंना जमीन, कच्चा माल आणि ऊर्जा पुरवठा करणारी ना-नफा झिंक पार्क स्थापन करण्याची योजना त्यांनी जाहीर केली, ज्यामुळे सुमारे 500 नवीन उद्योगांच्या स्थापनेला चालना मिळेल.

वेदांताच्या मजबूत आणि दीर्घकालीन बांधिलकीने राजस्थानची औद्योगिक आणि आर्थिक वाढ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 2030 पर्यंत US$ 350 अब्ज अर्थव्यवस्था बनण्याच्या राजस्थानच्या महत्त्वाकांक्षेला ते बळ देत आहे. तसेच औद्योगिक नवकल्पनांसह धातू, खनिजांसाठी जागतिक केंद्र म्हणून त्याचे स्थान आणखी मजबूत करत आहे.

राजस्थानच्या वाढीमध्ये आपले योगदान अधोरेखित करत ते पुढे म्हणाले, “2002 पासून, आम्ही राजस्थानमध्ये ₹1 लाख कोटीहून अधिक गुंतवणूक केली आहे, 1 लाखांहून अधिक नोकऱ्या निर्माण केल्या आहेत आणि 5,000 हून अधिक कंपन्यांच्या वाढीस पाठिंबा दिला आहे. राजस्थानातील सर्वात मोठे करदाते असल्याचा आम्हाला अभिमान आहे. राष्ट्रीय तिजोरीत दरवर्षी ₹50,000 कोटींचे योगदान देत आहे. आगामी वर्षात हे योगदान तिप्पट करण्याचे आमचे ध्येय आहे.”

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments