Thursday, September 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedप्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते अभिवादन...

प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते अभिवादन…

पिंपरी दि.१७ सप्टेबर २०२६ :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीत थोर समाजसुधारक, विचारवंत, लेखक आणि पत्रकार केशव सीताराम उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

 

यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, विधी समिती सभापती सुजाता बोराटे, शिक्षण समिती सभापती रविना अंघोळकर आणि महिला व बालकल्याण समिती सभापती राणीमाई पठारे,उप आयक्त अण्णा बोदडे,लेखाधिकारी दिपक गायकवाड,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,सामाजिक कार्यकर्ते मधूकर बच्चे यांच्यासह महानगरपालिकेचे विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

 

प्रबोधनकार ठाकरे यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजातील अनिष्ट रूढी, अंधश्रद्धा, जातीय विषमता आणि सामाजिक अन्यायाविरोधात प्रखर भूमिका मांडली. समाजात विवेक, समता, स्वाभिमान आणि परिवर्तनाची जाणीव निर्माण करण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य समर्पित केले. त्यांच्या निर्भीड विचारांनी आणि परखड लिखाणाने समाजप्रबोधनाला नवी दिशा मिळाली.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments