Saturday, August 15, 2026
Google search engine
HomeUncategorized-सखोल स्वच्छता अभियानातंर्गत ५० टन माती, कचरा गोळा

-सखोल स्वच्छता अभियानातंर्गत ५० टन माती, कचरा गोळा

पिंपरी, दि. १९ जानेवारी २०२४ :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील प्रमुख १७ रस्त्यांवर सखोल स्वच्छता अभियान राबविण्यास सुरूवात झाली आहे. या अभियाना अंतर्गत शुक्रवारी दि.१९ रोजी सकाळी निगडी ते दापोडी या मार्गाच्या दोन्ही बाजूला सखोल स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात तब्बल ५० टन माती, कचरा गोळा करण्यात आला. तसेच पाण्याने रस्ते दुभाजक धुवून काढण्यात आली. या अभियानात सुमारे १२०० कर्मचा-यांनी सहभाग घेतला अशी माहिती आरोग्य विभागाचे सहायक आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली.

 

 

 

पिंपरी चिंचवड शहरात आठ क्षेत्रीय कार्यालये असून ३२ प्रभाग आहेत. या सर्व प्रभागात सखोल स्वच्छता मोहिम राबविण्याचे राज्य सरकारने निर्देश दिले आहेत. त्याअनुषंगाने आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या निर्देशानुसार शहराच्या विविध भागातील रस्ते, चौकात स्वच्छता अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे.

 

 

 

याबाबत माहिती देताना सहायक आयुक्त यशवंत डांगे म्हणाले, शहरातील विविध रस्त्यांवर सखोल स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. शुक्रवारी सकाळी ७ ते १० या वेळेत निगडी ते दापोडी या मार्गावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यामध्ये तब्बल ५० टन कचरा, माती गोळा करून कचरा डेपोमध्ये डंपिंग केला आहे. या अभियानावेळी वाहतूक सुरळीत रहावी, यासाठी वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी सहकार्य केले.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments