मुंबई, डिसेंबर १२, २०२४ – स्कोडा ऑटो इंडियाची पहिलीच सब-४-मीटर एसयूव्ही कायलॅकने बुकिंग्जना सुरूवात झाल्यापासून १० दिवसांमध्ये १०,००० बुकिंग्जसह मोठा टप्पा गाठला आहे. या मोठ्या प्रतिसादामधून भारतातील झपाट्याने विकसित होत असलेल्या एसयूव्ही बाजारपेठेमध्ये स्कोडाऑटो इंडियाच्या नवीन ऑफरिंगप्रती वाढती मागणी दिसून येते. या गतीला अधिक पुढे घेऊन जात स्कोडा ऑटो इंडिया भारतभरात ‘ड्रीम टूर’ला देखील सुरूवात करेल, जेथे कायलॅक प्रमुख शहरांमधील ग्राहकांशी कनेक्ट होईल. चाकण प्लांटपासून सुरूवात करत तीन कायलॅक एसयूव्ही ४३ दिवसांसाठी विविध मार्गांवर प्रवास करतील आणि देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचतील.
स्कोडा ऑटो इंडियाचे ब्रँड संचालक पीटर जनेबा म्हणाले, ”शोरूममध्ये कार नसताना देखील १० दिवसांमध्ये १०,००० बुकिंग्ज! आमच्यासाठी कायलॅक पूर्णत: नवीन सब-४ मीटर एसयूव्ही विभागातील पूर्णत: नवीन कार आहे. ग्राहकांना कायलॅकचा कोणताही अनुभव न देता या १०,००० बुकिंग्ज झाल्या आहेत, ज्यामधून स्कोडा ब्रँडवरील अद्वितीय विश्वास दिसून येतो आणि आम्हाला याचा खूप आनंद होत आहे. आम्हाला विश्वास आहे की, कायलॅक आम्हाला या उत्साहवर्धक उत्पादनाला झपाट्याने वाढत असलेल्या ‘फॅन्स ऑफ स्कोडा’साठी सादर करण्याची संधी देईल. आमचा ग्राहकांना कायलॅकची अद्वितीय वैशिष्ट्ये आणि आधुनिक डिझाइनशैलीचा प्रत्यक्ष अनुभव देत त्यांच्यासोबत दृढ संबंध निर्माण करण्याचा मनसुबा आहे.”
इंडिया ड्रीम टूर
१३ डिसेंबर २०२४ रोजी चाकण प्लांटपासून सुरूवात करत तीन स्कोडा कायलॅक एसयूव्ही देशव्यापी टूरला सुरूवात करतील आणि तीन मार्गांवर जवळपास ७० शहरांपर्यंत प्रवास करतील. प्रत्येक मार्गावर विभिन्न प्रांताला एक्स्प्लोअर करण्यात येईल आणि एसयूव्ही विशिष्ट दिशांमध्ये प्रवास करत २५ जानेवारी २०२५ रोजी प्लांटमध्ये परत येतील. पश्चिम-दक्षिण मार्गामध्ये पुणे, कोल्हापूर, पणजी, मंगळुरू, म्हैसूर, बेंगळुरू आणि हैदराबाद अशा शहरांचा समावेश असेल. पश्चिम-उत्तर मार्गामध्ये मुंबई, सुरत, वडोदरा, अहमदाबाद आणि दिल्ली यांसारख्या शहरांचा समावेश असेल, तर तिसऱ्या मार्गामध्ये पुण्याकडून पूर्वेकडे जात नाशिक, नागपूर आणि कोलकाता अशा शहरांपर्यंत प्रवास करण्यात येईल.
प्रत्येक थांब्यावरील प्रमुख सार्वजनिक स्थिर डिस्प्ले ग्राहकांना स्कोडा कायलॅकचा प्रत्यक्ष अनुभव देतील. एसयूव्ही २७ जानेवारी २०२५ पर्यंत डिलरशिप्समध्ये ऑफिशियल आगमानापूर्वी अभ्यागतांना या एसयूव्हीची मॉडर्न सॉलिड डिझाइन आणि इतर वैशिष्ट्ये पाहायला मिळतील. हा उपक्रम ग्राहकांना प्रत्यक्ष कायलॅकच्या सर्वोत्तमतेचा अनुभव घेण्याची उत्तम संधी देतो, तसेच स्कोडा ऑटो इंडियाच्या लाइनअपमधील नवीन वेईकलबाबत उत्साह निर्माण करतो.


