Thursday, September 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedश्रीराम कथा प्रेमयज्ञ सोहळा आजपासून (दि.१४)* *श्रीगौड ब्राह्मण समाज, श्री चारभुजानाथ...

श्रीराम कथा प्रेमयज्ञ सोहळा आजपासून (दि.१४)* *श्रीगौड ब्राह्मण समाज, श्री चारभुजानाथ मंदिर राम कथा समितीतर्फे आयोजन*

पुणे : श्रीगौड ब्राह्मण समाज, श्री चारभुजानाथ मंदिर रामकथा समितीतर्फे श्रीराम कथा प्रेम यज्ञ सोहळ्याचे आयोजन पुण्यामध्ये करण्यात आले आहे. दि. १४ ते २२ डिसेंबर दरम्यान दररोज दुपारी ३ ते सायंकाळी ७ यावेळेत चित्रकूट धाम, वर्धमान लॉन्स समोर, बिबवेवाडी कोंढवा रस्ता येथे रामकथा होणार आहे.

प्रेममूर्ती पूज्य संत श्री प्रेमभूषणजी महाराज यांचे कृपापात्र पूज्य राजनजी महाराज हे निरूपण करणार आहेत. सोहळ्याचा प्रारंभ शनिवारी (दि.१४) सकाळी १० वाजता आयोजित कलश यात्रेने होणार आहे. कलश यात्रा आईमाता मंदिर ते चित्रकूट धाम अशी काढण्यात येणार असून यामध्ये १ हजारहून अधिक महिला पारंपरिक वेशात सहभागी होणार आहेत.

श्रीराम कथा प्रेमयज्ञ सोहळ्यात श्रीराम कथा महिमा आणि शिव-पार्वती विवाह, श्रीराम जन्म उत्सव, श्री बाल लीला, श्री सीताराम विवाह महोत्सव, श्री केवट प्रेम, श्री राम मंगल यात्रा, श्री भरत चरित्र, श्री शबरी प्रेम, सुंदरकाण्ड आणि श्री राम राज्याभिषेक याविषयी पूज्य राजनजी महाराज हे निरूपण करणार आहेत. सोहळ्याकरिता प्रवेश विनामूल्य असून रामभक्तांनी मोठया संख्यने सहभागी व्हावे, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments