Saturday, August 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedसहकारी बँकांमध्ये तरुणांचा सहभाग वाढविण्यासाठी कायदा करणार* *उपमुख्यमंत्री अजित पवार ;...

सहकारी बँकांमध्ये तरुणांचा सहभाग वाढविण्यासाठी कायदा करणार* *उपमुख्यमंत्री अजित पवार ; पुणे मर्चंटस को-ऑपरेटिव्ह बँक लि.च्या शतक महोत्सवी पदार्पण सोहळ्याचे आयोजन* 

 

 

पुणे : सहकारी क्षेत्रामध्ये जोपर्यंत एखाद्या व्यक्तीला लोक निवृत्त करत नाहीत, तोपर्यंत ती व्यक्ती पदाला चिकटून राहते. परंतु त्यामुळे तरुणांवर मात्र अन्याय होतो. तरुण या क्षेत्रामध्ये येत नाहीत. तरुण या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर येण्यासाठी केरळ राज्याच्या धर्तीवर सहकार युथ कायदा तयार करण्यात येईल आणि याबाबतचा विषय लवकरच महाराष्ट्र राज्य कॅबिनेट समोर मांडण्यात येईल, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

 

पुणे मर्चंटस को-ऑपरेटिव्ह बँक लि.च्या शतक महोत्सवी पदार्पण सोहळ्याचे आयोजन पर्वती जवळील मुक्तांगण इंग्लिश स्कूलच्या सभागृहात करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, आमदार सुनील टिंगरे, दीपक मानकर, दत्तात्रय धनकवडे, बँकेचे अध्यक्ष विजय ढेरे, उपाध्यक्ष सुधीर शेळके, अंकुश काकडे, रवींद्र रच्छा, हेमंत जगताप, योगीराज खिलारे, प्रसन्न जगताप, अजित खेसे, रावसाहेब खंडागळे, प्रदीप मिसाळ, उदय महाले, युवराज खेडकर राजन उडाणे, हेमा खात्री, प्रमिला कोंढरे आदी यावेळी उपस्थित होते. बँकेच्या शतक महोत्सवी वर्ष पदार्पणाच्या बोधचिन्हाचे यावेळी अनावरण करण्यात आले

 

अजित पवार म्हणाले, तरुण उद्योजक तयार करण्यासाठी सहकारी बँकांनी त्यांना सहकार्य केले पाहिजे. त्यासाठी तरुणांना सोयीस्कर पद्धतीने कर्ज वाटप केले पाहिजे. महाराष्ट्राची खरी प्रगती ही सहकार क्षेत्रामुळे झाली आहे. त्यामध्ये सहकारी बँकांचे मोठे योगदान आहे, परंतु सहकारी बँकिंग क्षेत्रामध्ये काही नतदृष्ट व्यक्तींमुळे इतर बँकांची बदनामी होते आणि त्यांचा परिणाम सर्व बँकांना भोगाव लागतो. सहकारी बँका खऱ्या अर्थाने पुणे शहराचीच नव्हे तर महाराष्ट्राची अर्थवाहिनी आहे, ही अर्थवाहिनी चांगल्या पद्धतीने सुरू राहावी, त्यासाठी राज्य सरकार सर्व प्रकारची मदत करेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. बँकेची आर्थिक परिस्थिती उत्तम ठेवल्याबद्दल त्यांनी संचालक मंडळाचे अभिनंदनही केले.

 

विद्याधर अनास्कर म्हणाले, आज स्मार्ट बँकिंगचे जग आहे. पारंपारिक आणि स्मार्ट बँकिंगचा मेळ योग्य प्रकारे घातला, तर सहकारी बँका आधुनिक बँकिंग क्षेत्रामध्ये टिकू शकतील. पुणे मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेने हे धोरण स्वीकारलेले आहे. संचालक मंडळामध्ये तरुणांचा सहभाग वाढवण्यासाठी तरुणांसाठी काही जागा राखीव ठेवल्या पाहिजेत, तरच बँकिंग क्षेत्रामध्ये आधुनिकता स्वीकारता येऊ शकेल.

 

दीपक मानकर म्हणाले, पुणे शहरातील सहकारी बँकांची अवस्था बिकट आहे. अशा परिस्थितीतही पुणे मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक चांगली प्रगती करत आहे, ही बँकेची कौतुक करण्यापात्र बाब आहे. वैयक्तिक स्वार्थापोटी सहकारी बँकिंग क्षेत्रातील काही व्यक्तींनी चुकीचे काम केले, परंतु पुणे मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक ही त्याला अपवाद आहे. त्यामुळेच पुणे मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेची भरभराट झाली आहे. याचा खातेदारांनाही फायदा होत आहे.

 

विजय ढेरे म्हणाले, बँकिंग क्षेत्रामध्ये स्पर्धा वाढत आहे, अशावेळी स्मार्ट बँकिंग सुरू करण्यासाठी सरकारी क्षेत्राने पुणे मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेला परवानगी द्यावी. सहकारी बँकिंग क्षेत्रामध्ये तरुणांच्या सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. मुठभर लोकांनी केलेल्या चुकांचा परिणाम संपूर्ण सहकार खात्याला भोगावे लागतो. परंतु अशा काळातही पुणे मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेचे सर्व व्यवहार हे पारदर्शक आहेत आणि त्याबाबत रिझर्व बँकेने पुणे मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेचे कौतुक केले आहे, याच पद्धतीने वाटचाल करून पुणे मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक अधिक प्रगती करू शकेल अशी ग्वाही त्यांनी दिली. अंकुश काकडे यांनी आभार मानल

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments