Thursday, September 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedप्रो कबड्डी लीग स्पर्धेत तमिळ थलाईवाजची झुंज अपयशी; पाटणा पायरेट्स संघाचा...

प्रो कबड्डी लीग स्पर्धेत तमिळ थलाईवाजची झुंज अपयशी; पाटणा पायरेट्स संघाचा रोमहर्षक विजय

पुणे दिनांक १३ डिसेंबर २०२४: शेवटपर्यंत अटीतटीने झालेल्या सामन्यात तमिळ थलाईवाज संघाने पाटणा पायरेट्स संघाला चिवट लढत दिली. मात्र पाटणा संघाने हा सामना ४२-३८ असा जिंकला आणि प्रो कबड्डी लीग मध्ये आपले आव्हान राखले. पूर्वार्धात पाटणा संघाकडे २०-१५ अशी पाच गुणांची आघाडी होती.

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील बॅडमिंटन हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत तमिळ थलाईवाज संघाने यंदाच्या मोसमात आत्तापर्यंत झालेल्या १७ सामन्यांपैकी १० सामन्यांमध्ये पराभव पत्करला आहे. येथे त्यांना यु मुंबा संघाकडून दारुण पराभव स्वीकारावा लागला होता. फक्त सहा सामन्यांमध्ये त्यांनी विजय मिळवला आहे. पाटणा पायरेट्स विरुद्ध आतापर्यंत त्यांनी एकूण पंधरा सामने खेळले आहेत त्यापैकी फक्त चार सामन्यांमध्ये त्यांना विजय मिळवता आला आहे तर आठ सामन्यांमध्ये त्यांना पाटणा संघाने पराभूत केले आहे. त्यामुळेच आजच्या लढतीत पाटणा संघाचे वर्चस्व राहील अशी अपेक्षा होती. पाटणा संघाने नुकताच जयपूर पिंक पँथर्स संघाविरुद्ध विजय मिळवला आहे आणि या विजयामुळे त्यांच्या खेळाडूंचे मनोधैर्य उंचावले होते.

सामन्यात सुरुवातीपासून आघाडी घेतली की प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंवर दडपण येते ही रणनीती उपयोगात आणून पाटणा संघाने सुरुवातीपासूनच आघाडी मिळवली सामन्याच्या अकराव्या मिनिटालाच त्यांनी पहिला लोण चढविला‌. त्यावेळी त्यांनी १६-८ अशी आघाडी घेतली. तमिळ संघाने पिछाडी भरून काढण्याचा प्रयत्न केला मात्र त्यामध्ये त्यांना यश आले नाही मध्यंतराला पाटणा संघ पाच गुणांनी आघाडीवर होता.

उत्तरार्धातही पाटणा संघाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट सांघिक खेळ करीत आपली आघाडी दहा गुणांपर्यंत वाढविली. मात्र जिगरबाज तमिळ संघाच्या खेळाडूंनी पाटणा संघाची आघाडी कमी करण्यात यश मिळवले. शेवटची दहा मिनिटे बाकी असताना पाटणा संघ २९-२५ असा आघाडीवर होता. सामन्याच्या ३३ व्या मिनिटाला तमिळ संघाने लोण चढवीत सामन्यातील उत्कंठा वाढविली. अर्थात यावेळी देखील पाटणा संघाकडेच आघाडी होती. शेवटची पाच मिनिटे बाकी असताना पाटणा संघ ३६-३३ असा आघाडीवर होता.पाटणा संघाकडून सुपर दहा गुण नोंदविणारे देवांक व अयान यांनी उत्कृष्ट चढाया केल्या तर शुभम शिंदे यांनी महत्त्वाच्या क्षणी पकडी करीत संघास आघाडी मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. तमिळ संघाकडून मोईन शफागी, हिमांशू व सचिन यांनी खोलवर चढाया केल्या

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments