🚩🚩🚩🚩
*गीता जयंती चे औचित्य साधून सर्वगुणसंपन्न व सेवाभावी नांदेड सिटी मध्ये रविवार दि. १५ डिसेंबर रोजी सामूहिक संपूर्ण भगवद् गीता पठण सोहळा सुमारे २५० बंधू भगिनींच्या उपस्थितीत उत्साहाने साजरा झाला*.
*नांदेड सिटी तील १२ सोसायट्या मधील गीताध्यायी जनांचे एकत्रिकरण करून अशा कार्यक्रमाची संकल्पना व संयोजन करून गेल्या वर्षापासून गीता पठण आयोजन केले जाते*
*नांदेड सिटीत विधायक कामे, सेवा कार्य करणाऱ्या सेवाभावी स्वयंसेवकांच्या सहकार्याने हे आयोजन केले जाते*
*या कार्यक्रमाचे आयोजन प्रमुख सौ अर्चना कौलगुड, सौ मुग्धा पाटील, तसेच सौ गौतमी कुलकर्णी, सुषमा वाघ काकू , संध्या पिजन, मीनाताई देशमुख, कु रागिणी लगड, सौ शिल्पा वैद्य, सौ स्नेहल श्रीकृष्ण गोरे, सौ आशा प्रकाश गोरे, सौ वृषाली दिक्षित, सौ शिला गोवर्धन या महिलांनी केले*
*या शिवाय नांदेड सिटी आसावरी आनंदी कट्ट्याचे सर्वश्री मिलींद दीक्षित, श्रीकृष्ण गोरे, आनंद गलगली, सुधाकर गाडे, चंद्रकांत गोडबोले, आशुतोष भावे, अरविंद कुलकर्णी, कैलास बांगर, अशोक कौलगुड, नितीन फडणीस, वर्धमान भालेराव, सतीश पाटील, माधवराव जोशी, श्रीकांत कुलकर्णी, अंबादास चन्ना, दयाराम जोशी, शशिकांत मंत्री, विजय वर्मा, या जेष्ठ बंधूंचे सहकार्य लाभले*
*एक पवित्र, आखीव रेखीव शिस्तबद्घ असा संपूर्ण गीता पठणाचा हा देखणा कार्यक्रम संपन्न झाला*
*संध्या पिजन यांनी , कार्यक्रमस्थळी सकाळी लवकर येऊन सुंदरशी स्वागताची रांगोळी काढली*
*तसेच महिनाभर आधीपासून गूगल फॅार्म्स द्वारे नाव नोंदणी करण्यात आली त्यास गीताध्यायी बंधू-भगिनींनी उत्तम प्रतिसाद दिला*
*भगवान श्रीकृष्णाची सुंदर सुबक मूर्ती , समई, भारत मातेची सुंदर प्रतिमा यांचे सुवासिक चाफ्याच्या फुलांनी मान्यवरांच्या हस्ते पूजन झाले* .
*गीता धर्म मंडळ, पुणे येथील प्रमुख विनया ताई मेहेंदळे, नांदेड सिटी तील आई आधार केंद्रांच्या संस्थापिका डॉ सौ अपर्णा गुप्ते, आनंदी ओल्ड एज चे संचालक श्री प्रविण दुगाणे, ब्रह्माकुमारी नांदेड सिटी सेंटरच्या ललीता दीदी ; ज्येष्ठ ,पत्रकार आणि जेष्ठ स्वयंसेवक श्री प्रकाश गोरे काका या मान्यवरांच्या हस्ते पूजन झाले*.
*स्टेजवर संपूर्ण गीता कंठस्थ पाठांतर असलेल्या व शृंगेरी शंकराचार्यांचा आशीर्वाद लाभलेल्या सौ जयश्री खंडेपारकर, सौ मेधा देवधर, सौ ज्योत्स्ना चिपळूणकर व सौ शोभना वाणी यांनी सुस्पष्ट व लयबद्ध पठण सादर केले . त्याच लयीत सर्वांनी सुंदर सामुहिक पठण म्हटले*
*ॐनमो भगवते वासुदेवाय हा मंत्रजप, गीता प्रार्थना, गीता अध्याय १ ते १८ संपूर्ण पठण, गीता महात्म्य, “घरोघरी गीता जाउ दे” हे गीत व गीतेची आरती अशा अनुक्रमाने पठण झाले*.
*कार्यक्रमाचे शेवटी बुंदी व पुलाव असे प्रसाद पॅकेट्स सर्वांना देण्यात आले.*
*कार्यक्रम वेळेत सुरु झाला सर्वांनी मंगल वेष धारण केला होता. गीता मुखोग्दत असलेल्यांनी केशरी व इतर सर्वांनी पांढरी व मोतिया रंगाची वस्त्रे परिधान केली होती . सर्वांचे गंध नाम टिळा व अत्तर लावून स्वागत केले . गीता प्रेसची संपूर्ण गीता पठणाची पुस्तके वाचनास व स्वागतमूल्यासहित उपलब्ध केलेली होती . शिवाय सर्वांना खुर्च्यांची आसन व्यवस्था होती*.
*पठणास बहुसंख्य तरुण आणि जेष्ठ महिला तसेच जेष्ठ नागरिक असूनही वेळेचे नियोजन अप्रतिम होते*.
*यासारखे कार्यक्रम एक नवी उभारी देतात. संपूर्ण मानवजातीला मिळालेले ,गीतेचे तत्वज्ञान ही भारतीय संस्कृतीची एक अनमोल देणगी आहे . आपण सर्व तिच्या ऋणात राहणे पसंत करूया*
*कार्यक्रमाचे प्रमुख संयोजन भारतीय स्त्री शक्ती जागरण नांदेड सिटीच्या प्रमुख सौ अर्चना अशोक कौलगुड, सौ मुग्धा सतीश पाटील आणि नांदेड सिटी सेवा प्रमुख श्री मिलींद दीक्षित यांनी केले*


