Thursday, September 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुणे पुस्तक महोत्सवात पुण्यश्लोल अहिल्यादेवी होळकर, वंदे मातरम गीत, अभिजात मराठी यावरील...

पुणे पुस्तक महोत्सवात पुण्यश्लोल अहिल्यादेवी होळकर, वंदे मातरम गीत, अभिजात मराठी यावरील खास दालने

राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे आयोजित पुणे पुस्तक महोत्सवात मांडण्यात आलेली चार वैविध्यपूर्ण दालने लक्षवेधी ठरत आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याविषयी माहिती दालन, ‘वंदे मातरम्’ या गीतावर आधारित दालन, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचे दालन आणि ‘ब्लेड्स ऑफ ग्लोरी’ या क्रिकेटवर आधारित दालनाचा महोत्सवात समावेश असून, महोत्सवाला भेट देणारे पुणेकर या दालनांनाही भेट देत आहेत.

फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर पुणे पुस्तक महोत्सव सुरू झाला आहे. या महोत्सवातील पुस्तक प्रदर्शनात विविध भाषांतील पुस्तकांची सहाशेहून अधिक दालने आहेत. तसेच सांस्कृतिक कार्यक्रम, खाद्य पदार्थांची मेजवानी मिळत आहे. महोत्सवाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या महोत्सवात चार खास दालनांची मांडणी करण्यात आली आहे.

मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. त्या निमित्ताने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे पुस्तक महोत्सवात अभिजात भाषा दर्जा दालन करण्यात आले आहे. अभिजात भाषा म्हणजे काय, मराठी भाषेचा इतिहास, या दर्जामुळे काय होईल या बाबतची माहिती या दालनात देण्यात आली आहे. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या इतिहास विभागातर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३००व्या जन्मशताब्दीनिमित्त स्वतंत्र दालन करण्यात आले आहे. या दालनात अहिल्यादेवींनी मंदिर नूतनीकरण, हुंडाबंदी या बाबत केलेले कार्य, त्यांची प्रशासकीय कार्यशैली, होळकर घराण्याचा इतिहास, त्यांच्यावर लिहिले गेलेले ग्रंथ अशा माहिती देण्यात आली आहे.

भारत इतिहास संकलन समिती यांच्यातर्फे वंदे मातरम् या गीताच्या १५०व्या वर्षानिमित्त माहितीपूर्ण दालन करण्यात आले आहे. त्यात या गीताचा इतिहास, बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्यावर लिहिली गेलेली पुस्तके मांडण्यात आली आहे. क्रिकेटवर आधारित ‘ब्लेड्स ऑफ ग्लोरी’ या दालनामध्ये विस्डेनचे खंड, अनेक क्रिकेटपटूंवरील पुस्तके, ख्रिस गेल, एबी डिविलिअर्स, विराट कोहली, राहुल द्रविड, सचिव तेंडुलकर यांनी वापरलेल्या बॅट, सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, व्हिव रिचर्ड्स यांच्या जर्सी, छायाचित्रे पाहायसा मिळतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments