मुंबई, भारत, १७ डिसेंबर २०२४: टाटा समूह आणि न्यूयॉर्क अकॅडेमी ऑफ सायन्सेसने मुंबईतील ऐतिहासिक ताज महाल पॅलेसमध्ये शुक्रवार, १३ डिसेंबर रोजी २०२४ च्या टाटा ट्रान्सफॉर्मेशन पुरस्कार विजेत्यांच्या सन्मानार्थ एका शानदार पुरस्कार समारोहाचे आणि भोजनाचे आयोजन करण्यात आले होते.
खाद्य सुरक्षा, सस्टेनेबिलिटी आणि आरोग्य सेवेमधील भारतासमोरील सर्वात गंभीर सामाजिक आव्हाने दूर करण्यासाठी यशस्वी तंत्रे विकसित करत असलेल्या, दूरदर्शी वैज्ञानिकांचा सन्मान आणि समर्थन करण्यासाठी २०२३ मध्ये टाटा ट्रान्सफॉर्मेशन पुरस्काराची सुरुवात करण्यात आली. या ठिकाणी हा समारंभ पहिल्यांदा आयोजित करण्यात आला.
आघाडीच्या तज्ञांचा समावेश असलेल्या एका आंतरराष्ट्रीय ज्युरीने भारतातील १८ राज्यांमधून आलेल्या १६९ प्रवेशिकांमधून २०२४ टाटा ट्रान्सफॉर्मेशन पुरस्कारासाठी या विजेत्यांची निवड केली आहे.
खाद्य सुरक्षा: सी आनंदरामकृष्णन, पीएचडी, सीएसआयआर – नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर इंटरडिसिप्लिनरी सायन्स अँड टेक्नोलॉजी. अनेक आवश्यक पोषक तत्त्वांनी परिपूर्ण अशी तांदुळाची एक जात तयार करण्यात यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. या तांदुळामध्ये मधुमेही रुग्णांसाठी सूक्ष्म पोषक तत्त्वांची कमतरता आणि रक्तातील ग्लुकोज व्यवस्थापनासाठी ग्लायसेमिक इंडेक्स (जीआय) कमी आहे. त्यांची फिल्म पाहण्यासाठी लिंक.
सस्टेनेबिलिटी: अमर्त्य मुखोपाध्याय, डी फिल, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी बॉम्बे: सोडियम (Na) आयन बॅटरी तंत्रज्ञानात विकास घडवून आणण्यासाठी काम करत आहेत. त्यांचा बॅटरी प्रोटोटाइप लिथियम (Li) आयन बॅटरीच्या तुलनेत जवळपास ३०% स्वस्त आहे आणि व्यापक तापमान रेन्जमध्ये काम करतो. त्यांचे डिझाईन हवा आणि पाण्यामध्ये स्थिर सोडियम-संक्रमण धातू ऑक्साईड कॅथोड आणि मिश्र धातूवर आधारित एनोड बनवून स्टोर करण्यासाठी सुरक्षित आहे. प्रो मुखोपाध्याय यांचा दृष्टिकोन उत्पादनावरील खर्च आणि पर्यावरणीय प्रभाव कमी करण्यासाठी विषारी सॉल्व्हन्ट्सच्या ऐवजी पाण्याचा उपयोग करावा हा आहे. त्यांची फिल्म पाहण्यासाठी लिंक.
आरोग्य सेवा: राघवन वरदराजन, पीएचडी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगलोर
खर्चात बचत करणारे आरएसव्ही व्हॅक्सिन विकसित करण्यासाठी काम करत आहेत, ज्यामुळे लसीकरण कार्यक्रमाची अधिक व्यापक अंमलबजावणी करता येईल. त्यांचे प्रगत वैज्ञानिक संशोधन अशी आव्हाने दूर करेल जी गेली अनेक दशके आरएसव्ही व्हॅक्सिनच्या विकासात अडथळा ठरत आहेत आणि आरएसव्ही संसर्गाविरोधात व्यापक, दीर्घकाळ टिकून राहील अशी सुरक्षा प्रदान करेल. त्यांची फिल्म पाहण्यासाठी लिंक.
टाटा सन्सचे माजी ब्रँड कस्टोडियन श्री हरीश भट्ट या समारंभाचे प्रेजेंटर होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार प्रोफेसर अजय कुमार सूद आणि पाहुणे व्याख्याते जागतिक आरोग्य संघटनेचे माजी प्रमुख वैज्ञानिक डॉ सौम्या स्वामीनाथन यांची प्रमुख भाषणे झाली. इतर विशेष पाहुण्यांमध्ये टाटा ट्रस्टचे अध्यक्ष श्री नोएल टाटा आणि नेदरलँडमध्ये न्येनरोड बिझनेस युनिव्हर्सिटीमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारचे प्रोफेसर आणि आंतरराष्ट्रीय सल्लागार बोर्डाचे अध्यक्ष प्रोफेसर डेसिरी वॅन गॉर्प आणि यूएसमधील कार्नेगी मेलन युनिव्हर्सिटीचे एआय पायनियर डॉ राज रेड्डी हे होते.
उदघाटनपर भाषणामध्ये टाटा सन्सचे बोर्डाचे अध्यक्ष श्री एन चंद्रशेखरन यांनी सांगितले, “तंत्रज्ञान-प्रथम भविष्यामध्ये, भारताला मोठ्या समस्यांचे निवारण करण्यासाठी दृष्टी बदलण्याची गरज आहे, टाटा ट्रान्सफॉर्मेशन पुरस्काराचा उद्देश हाच आहे – भारतभर संशोधन प्रयोगशाळांमध्ये विकसित करण्यात आलेल्या यशस्वी नावीन्यांना मान्यता देणे आणि त्यांचे समर्थन करणे, अशा नवीन गोष्टी ज्या भारतातील समस्यांचे निवारण करण्यासाठी व्यापक स्तरावर उपयोगासाठी तयार आहेत.”
न्यूयॉर्क अकॅडेमी ऑफ सायन्सेसचे प्रेसिडेंट आणि सीईओ प्रोफेसर निकोलस बी डर्क्स यांनी सांगितले, “भारतातील सर्वात गंभीर आव्हाने दूर करण्यासाठी अभिनव उपाययोजनांचे कॅटॅलिस्ट म्हणून कार्यरत, टाटा सन्ससोबत ही अनोखी भागीदारी कायम ठेवताना आम्हाला खूप आनंद होत आहे. हा पुरस्कार भारतातील सर्वात उत्कृष्ट वैज्ञानिकांना सन्मानित करून भारतातील सर्वात महत्त्वपूर्ण सामाजिक गरजांवर प्रकाश टाकतो. हे वैज्ञानिक असे आहेत जे वास्तविक परिवर्तन घडवून आणू इच्छितात आणि भारताला जागतिक नेता बनवण्यामध्ये मदत करत आहेत.” प्रोफेसर डर्क्स यांनी ज्युरीचे देखील कौतुक केले, या ज्युरींमध्ये पाच खंडांमधील जगभरात प्रसिद्ध संघटना आणि शैक्षणिक संस्थांमधील विख्यात वैज्ञानिक, डॉक्टर, तंत्रज्ञान तज्ञ आणि इंजिनीयर यांचा समावेश आहे. त्यांनी या प्रोग्रामची अम्बॅसॅडर म्हणून काम करत असलेल्या या पुरस्काराच्या वैज्ञानिक सल्लागार परिषदेच्या भूमिकेचे देखील कौतुक केले.
प्रभावी नावीन्याला प्रोत्साहन देणाऱ्या आणि उत्तम परिणाम देणाऱ्या संशोधनाच्या अंमलबजावणीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने, प्रत्येक विजेत्याला २ कोटी रुपयांची पुरस्कार रक्कम आणि टाटा ट्रान्सफॉर्मेशन पुरस्कार पदकाने सन्मानित केले गेले.
टाटाच्या चीफ इकॉनॉमिस्ट रूपा पुरुषोत्तम यांनी या समारंभात समारोपाचे भाषण केले.
एक दिवस आधी टाटा समूहाने आपले मुख्यालय बॉम्बे हाऊसमध्ये एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते, यामध्ये मागील वर्षीचे विजेते सहभागी झाले होते. २०२३ च्या विजेत्यांनी मागील वर्षी पुरस्कार जिंकल्यानंतर झालेली त्यांची वैज्ञानिक प्रगती आणि नवीन सहयोगाविषयी माहिती दिली.


