Thursday, September 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedपिंपरी -चिंचवड महापालिकेत संवर्ग व्यवस्थापन समिती..

पिंपरी -चिंचवड महापालिकेत संवर्ग व्यवस्थापन समिती..

पिंपरी, दि. १७ डिसेंबर २०२४ :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील पद किंवा संवर्ग व्यवस्थापनातील कार्यात्मक गरजा, संरचनात्मक, कार्मिक आणि प्रक्रियात्मक पैलू या विषयी अभ्यासपूर्ण माहितींचे पुनरावलोकन करण्यासाठी संवर्ग व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली.
शासन मंजूर सेवाप्रवेश नियमांमध्ये प्रशासकीय सेवा, लेखा सेवा, तांत्रिक सेवा, वैद्यकीय सेवा, निमवैद्यकीय सेवा, सार्वजनिक आरोग्य सेवा, अग्निशमन सेवा इत्यादी सेवांचे वर्गीकरण करण्यात आलेले आहेत. महापालिका संवर्ग तसेच वेतनश्रेणी पुनरावलोकनांच्या पद्धतीमध्ये गृहमूल्यांकन, मूलभूत बदल, दीर्घकालीन समस्या आणि नियोजन इ. गुणात्मक बदल घडवून आणण्याची गरज असते.
महापालिकेसाठी भविष्य काळामध्ये आवश्यक असलेल्या अथवा वर्तमानामध्ये अस्तित्वात असलेल्या पदांचे पुनरावलोकनामध्ये संवर्ग व्यवस्थापनाचे अनेक महत्त्वाचे घटक समाविष्ट असतात. त्यामध्ये मनुष्यबळ प्रक्षेपण, भरती नियोजन, प्रशिक्षण, प्रतिनियुक्ती आदी बाबींचा समावेश असतो. यामुळे सेवेला सतत बदलत असलेल्या संस्थात्मक गरजांशी पुन्हा जुळवून घेण्यास आणि कार्यात्मक गरजा व अधिकारी किंवा कर्मचा-यांच्या वैध आकांक्षा यांच्यातील सुसंगती टिकवून ठेवण्यास मदत होते. सध्याच्या काळात संवर्ग व्यवस्थापनाला योग्य ते महत्त्व दिले जात नाही किंवा ते प्रामुख्याने पदांचे उन्नतीकरण आणि घट करण्याच्या उद्देशाने हाती घेतले जाते. त्यामुळे कालांतराने पदव्यवस्थापन सेवेमध्ये गंभीर बिघाड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवर नव्याने पद निर्मिती करणे, पदांचे समायोजन व समावेशन करणे, पदे व्यपगत करणे, सेवानियमांच्या निकषामध्ये बदल करणे अथवा निकष ठरविणे, पदांच्या संवर्गाच्या जबाबदा-या व कर्तव्ये सुनिश्चित करणे सेवांच्या वर्गीकरणातील, पदांच्या, संवर्गाच्या व्यवस्थापनातील तुटींचे निदान करणे आवश्यक आहे. तसेच विविध संवर्गामध्ये पदोन्नती आणि नामनिर्देशनाव्दारे पदभरतीसाठी निश्चित केलेल्या प्रमाणांचे पालन व्हावे, अवाजवी वेतनश्रेणीतील वाढ व तफावती दुर करणे, अशा तृटींच्या पार्श्वभूमीवर सर्व सेवांसाठी पाच वर्षांसाठी मनुष्यबळाची गरज ठरवून प्रक्षेपण केले जावे तसेच आवश्यकता भासल्यास परिस्थितीनुसार मध्यंतर मूल्यांकन करणे आवश्यक आहे. पुनरावलोकनांतून संवर्ग व्यवस्थापनातील तुटी व प्रक्रियेतील कमकुवत दुवे उघड होणे देखील आवश्यक आहे. त्यासाठी महापालिकेच्या वतीने संवर्ग व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमार्फत महापालिका आस्थापनेवरील पद व संवर्ग व्यवस्थापनातील कार्यात्मक गरजा, संरचनात्मक कार्मिक आणि प्रक्रियात्मक पैलुंविषयी अभ्यासपुर्ण माहितीचे पुनरावलोकनाचे कार्य केले जाणार आहे.
या संवर्ग व्यवस्थापन समिती मध्ये अध्यक्ष म्हणून महापालिकेचे आयुक्त कार्यरत असणार आहे. तर सामान्य प्रशासन विभागाचे उपआयुक्त हे सदस्य सचिव असतील. यासोबतच अतिरिक्त आयुक्त १,२,३ , मुख्य लेखा परीक्षक, मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा संचालक, कायदा सल्लागार, महापालिकेच्या सर्व विभागाचे विभाग प्रमुख हे या समितीचे सदस्य असणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments