Thursday, September 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedपीओजीएस तर्फे दोन दिवसीय वार्षिक परिषदेचे आयोजन

पीओजीएस तर्फे दोन दिवसीय वार्षिक परिषदेचे आयोजन

पुणे, 18 डिसेंबर 2023 : पुणे ऑब्स्टेट्रिक ॲन्ड गायनेकोलॉजिकल सोसायटी (पीओजीएस) तर्फे हॉटेल शेरटन ग्रँड येथे 21 व 22 डिसेंबर 2024 रोजी 33 वी वार्षिक परिषद आणि असोसिएशन ऑफ महाराष्ट्र ऑब्स्टेट्रिक्स ॲन्ड गायनेकोलॉजिकल सोसायटीजच्या विविध समितींच्या सहकार्याने पर्ल्स ॲन्ड पिटफॉल्स इन एंडोस्कोपी ॲन्ड एआरटी, एंडोएआरटी या 6 व्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन दिवसीय परिषदेत प्रमुख बीजभाषण,सादरीकरणे,कार्यशाळा,शोधनिबंध,पोस्टर स्पर्धा,चर्चासत्रे आणि राष्ट्रीय स्तरावरील तज्ञांद्वारे चर्चा यांचा समावेश आहे. या परिषदेला 4 एमएमसी आणि 11 आयसीओजी गुणांसाठी प्रमाणन मिळाले आहे.

या परिषदेच्या उद्घाटन समारंभाला प्रसिध्द नाट्य व चित्रपट दिग्दर्शक डॉ.जब्बार पटेल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून फॉग्सीच्या प्रेसिडेंट इलेक्ट डॉ.सुनिता तांदुळवाडकर व असोसिएशन ऑफ महाराष्ट्र ऑब्स्टेट्रिक्स ॲन्ड गायनेकोलॉजिकल सोसायटीजचे अध्यक्ष डॉ.किरण कुर्तकोटी हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या परिषदेच्या आयोजन समितीमध्ये पीओजीएसच्या अध्यक्ष डॉ.आरती निमकर, मानद सचिव डॉ.मीनाक्षी देशपांडे,पीओजीएसच्या माजी अध्यक्ष व एंडोएआरटी 2024 च्या समन्वयक डॉ.मीनू अगरवाल आणि पीओजीएसचे वैद्यकीय सचिव व एंडोएआरटी 2024 चे समन्वयक डॉ.अमोल लुंकड यांचा समावेश आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments