Thursday, September 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedहिंदू सेवा महोत्सवाचे उद्घाटन आज (दि.१९) हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेचा पुढाकार ;...

हिंदू सेवा महोत्सवाचे उद्घाटन आज (दि.१९) हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेचा पुढाकार ; रा.स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे : हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेतर्फे हिंदू सेवा महोत्सवाचे आयोजन दिनांक १९ ते २२ डिसेंबर २०२४ दरम्यान पुण्यामध्ये करण्यात आले आहे. यामध्ये हिंदू संस्कृती, संस्कार आणि सेवा कार्याचे विराट दर्शन पुणेकरांना घडणार आहे. याकरिता स.प.महाविद्यालय मैदानावर भव्य मंडप उभारण्यात आले असून सर्व तयारी पूर्ण झाली आहे.

महोत्सवाचे उद्घाटन गुरुवार, दि. १९ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता रा.स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, प.पू.स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज, इस्कॉन चे गौरांग प्रभू, ज्योतिषरत्न जैन मुनी लाभेश विजय म.सा. यांच्या हस्ते होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील अनेक महत्वपूर्ण देवस्थाने, सामाजिक व धार्मिक संस्थांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. चार दिवसीय महोत्सवाला विनामूल्य प्रवेश असून पुणेकरांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

‘सफर ए शहादत’ मधून उलगडणार शिखांच्या त्यागाची कहाणी

महोत्सवात शीख समाजाच्या त्यागाची कहाणी सांगणारे ‘सफर ए शहादत’ हा साऊंड अँड लाईट शो गुरुवार, दि.१९ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ ते ९.३० यावेळेत होणार आहे. युनायटेड सिंग सभा फाऊंडेशन तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून महाराष्ट्र पंजाबी साहित्य अकादमी, महाराष्ट्र शासन यांचे सहकार्य मिळाले आहे. पंजाबी रंगमंच पाटियला यामध्ये सादरीकरण करणार असून माता गुजरी पासून गुरु तेगबहादूर जी, गुरु गोविंदसिंग, साहेबजादे व बंदा बहादुर यांच्यापर्यंत समाजबांधवांवर जे जे अत्याचार झाले, ते नाट्यस्वरूपात पाहायला मिळणार आहे. याकरिता पटियाला येथुन कलाकार पुण्यामध्ये आले आहेत.

————————————————

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments