Thursday, September 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedपिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन....

पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन….

पिंपरी, दि. २० डिसेंबर २०२४ : अज्ञान, अंधश्रद्धा, अस्पृश्यता निर्मुलनासाठी आपले आयुष्य व्यतीत करणारे संत गाडगेबाबा हे विज्ञानवादी दृष्टीकोन असलेले थोर समाजसुधारक होते, त्यांनी भजन कीर्तनाच्या माध्यमातून लोकशिक्षणाद्वारे स्वच्छतेचे व शिक्षणाचे महत्व लहानथोरांना पटवून दिले. त्यांच्या व्यापक विचारांचा वारसा भावी पिढ्यांनी जोपासला पाहिजे असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले, त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमास उपआयुक्त अण्णा बोदडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, माजी नगरसदस्य बन्सी पारडे, मारुती भापकर, सामाजिक कार्यकर्ते नरेश कदम, सुनील अभंग, गजानन गवळी, विशाल जाधव, सुनील पवार, सतीश राऊत, किशोर रोकडे, राम शिंदे, संतोष गोतावळे, वैशाली राऊत, दयानंद अभंग, अशोक शिंदे, नाना सोनटक्के, बाळासाहेब वाघ आदी उपस्थित होते.

संत गाडगेबाबा यांचा जन्म अमरावती जिल्ह्यात झाला. त्यांनी भजन कीर्तनाच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करण्याचे काम केले. समाजप्रबोधन करण्यासाठी त्यांनी गावोगावी जाऊन लोकशिक्षणाचे कार्य केले, लोकांनी दिलेल्या देणगीतून अनाथांसाठी अनाथालये, आश्रम तसेच धर्मशाळा आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शाळा बांधल्या. संत गाडगेबाबा यांच्या नावाने सर्वत्र स्वच्छता अभियान राबविले जाते.

Previous article
Next article
झेटवर्क मॅन्युफॅक्चरिंगने 2023-24 मध्ये गाठले 17,564 कोटी रुपयांचे एकूण विक्री मूल्य 2023-24 (वर्ष समाप्त 31 मार्च 2024) मधील हायलाइट्स: ● झेटवर्कने 2024 मध्ये सुमारे $90 मिलियन उभारले, ज्यात खोसला व्हेंचर्स, राकेश गंगवाल, आणि बेली गिफोर्ड यांचा सहभाग होता. सध्याचे गुंतवणूकदार ग्रीनओक्स आणि अॅव्हेनीरही या फंडिंगमध्ये सहभागी झाले. ● या नवीन फंडिंग राउंडमुळे कंपनीचे मूल्य $3.1 बिलियनपर्यंत वाढले. ● एकूण ग्रॉस मर्चेंडाइज व्हॅल्यू (GMV) अर्थात, एकूण विक्री मूल्य 2023-24 मध्ये ₹17,564 कोटींवर पोहोचली. ● झेटवर्कचे ओपन ऑर्डर बुक 31 मार्च 2024 रोजी ₹12,839 कोटी होते. ● झेटवर्कने ₹191 कोटी (22.50 दशलक्ष डॉलर) समायोजित EBITDA ऑपरेशन्समधून नोंदविले.
RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments