सलग सहाव्यांदा सर्वोत्कृष्ट पेटंट पोर्टफोलिओचा पुरस्कार तर चौथ्यांदा सर्वोत्कृष्ट ट्रेडमार्क पोर्टफोलिओ पुरस्कार
भारत, 20 डिसेंबर 2024 – कृषी क्षेत्रासाठी उपयोगी शाश्वत उत्पादने तसेच उपाययाकारक योजना अंमलात आणण्यासाठी जगप्रसिद्ध युपीएल कंपनीला भारतीय उद्योग परिसंघ (सीआयआय) आयोजित यंदाच्या इंडस्ट्रीअल आयपी २०२४ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारातील फार्मा आणि कृषी विज्ञान श्रेणीतील सर्वोत्कृष्ट पेटंट आणि ट्रेडमार्क पोर्टफोलिओ पुरस्काराने युपीएल कंपनीला गौरविले गेले. सलग सर्वोत्कृष्ट पेटंट पोर्टफोलिओ पुरस्कार मिळवण्याचे कंपनीचे हे सहावे वर्ष आहे. कंपनीला सर्वोत्कृष्ट ट्रेडमार्क पोर्टफोलिओ पुरस्कारानेही चौथ्यांदा सन्मानित करण्यात आले. कंपनीतील बौध्दिक संपदा (आयपी) व्यवस्थापनातील नावीन्यता आणि सर्वोत्कृष्ट सेवांची आयोजकांनी प्रशंसा केली.
कंपनीच्यावतीने युपीएलचे जागतिक आयपी प्रमुख डॉ. विशाल सोधा यांनी हा पुरस्कार स्विकारला. ‘‘आम्ही बौद्धिक संपदा व्यवस्थापनाचा पुरजोर पुरस्कार करतो. कंपनीने शेतक-यांचे हित लक्षात घेत नावीन्यतापूर्वक शाश्वत बदलांवर भर दिला आहे. या पुरस्कारानुरुप मिळालेल्या सन्मानामुळे आम्हांला कायमस्वरुपी नवकल्पनांची निर्मिती आणि संरक्षण करण्याची प्रेरणा मिळाली आहे. या कार्यामुळे आम्हांला शेतक-यांच्या तसेच विविध समूहे आणि ग्राहकांच्या गरजा पूर्ण करता येतील. युपीएल जगभरात सक्षम ब्रॅण्ड म्हणून उदयास येत असून, आपले वर्चस्व सिद्ध करत असल्याचा दाखला सातत्याने सन्मानपूर्वक मिळणा-या पेंटट आणि ट्रेडमार्क पोर्टफोलिओने मिळत आहे. हा सन्मान आम्हांला सीआयआयकडून लाभला. ’’ या शब्दांत डॉ. विशाल सोधा यांनी आपले आभार व्यक्त केले.
युपीएलच्या बौद्धिक संपदा व्यवस्थापनाला सर्व स्तरांतून प्रशंसा मिळाली आहे. सध्या युपीएल कंपनीचे अडीच हजारांहून अधिक पेटंट मंजूर झाले आहेत तर सुमारे ४ हजार ३०० पेटंट अर्ज प्रलंबित आहेत. कंपनीच्या ट्रेडमार्क पोर्टफोलिओमध्ये १७ हजारांहून अधिक ट्रेडमार्क नोंदणीकृत आहेत तर सुमारे १३ हजार अर्ज प्रलंबित आहेत. पेटंट आणि ट्रेडमार्क पोर्टफोलिओतील प्रगतीशील कार्यामुळे युपीएल कंपनी कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवत आहे. नावीन्यता आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने युपीएल कंपनी कृषी क्षेत्रातील कणखर नेतृत्व म्हणून उदयास येत आहे.
सीआयआय इंडस्ट्रीअल आयपी पुरस्कार हा मुख्यत्वे आयपी व्यवस्थापनाला गौरविण्यासाठी आयोजित केला जातो. आयपी क्षेत्राचे संरक्षण व्हावे, या क्षेत्रातील उद्योगव्यवसायांत भरभराहट व्हावी, आर्थिक विकास साधला जावा, या हेतूने सीआयआय इंडस्ट्रीअल आयपी पुरस्काराचे आयोजन केले जाते. सीआयआयने युपीएल कंपनीने शेतक-यांना नावीन्यतेच्या आधाराने उपलब्ध केलेल्या उपाययोजनांना प्रशंसा केली आहे. कंपनीच्या उपक्रमांतून अन्नपदार्थ प्रक्रियेतील महत्त्वाच्या आणि शाश्वत गरजा पूर्ण होत असल्याची प्रशंसाही करण्यात आली.


