Thursday, September 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedश्री गुरुदत्तांची आरती ध्वनीमुद्रीकेचे अनावरण सृजनसभा तर्फे आयोजन : श्री वासुदेवानंद सरस्वती...

श्री गुरुदत्तांची आरती ध्वनीमुद्रीकेचे अनावरण सृजनसभा तर्फे आयोजन : श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी यांची रचना

पुणे : सृजनसभा तर्फे श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी यांची रचना असलेली अप्रचलित ‘श्री गुरुदत्तांची आरती’ या ध्वनीमुद्रीकेचे अनावरण नुकतेच झाले. होनराज मावळे यांची ही संगीतरचना असून सृजनसभेच्या कलाकारांनी याची प्रस्तुती दिली आहे.

बुधवार पेठेतील श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर समोरील प्रांगणात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र बलकवडे, कार्यकारी विश्वस्त ऍड. प्रताप परदेशी, विश्वस्त डॉ. पराग काळकर, युवराज गाडवे, आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे, प्रा. संगीता मावळे, होनराज मावळे आदी उपस्थित होते.

करितो प्रेमे तुज निरंजन, स्थिरवूनीया मन हे आरतीचे शब्द असून आरतीचा प्रधान स्वर मेहेर परळीकर यांचा आहे आणि श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हा उपक्रम केला आहे असे होनराज मावळे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षदा इनामदार यांनी केले. सई जोशी यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments