पुणे, ता. 27 : डीईएसच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड रीसर्च’च्या (आयएमडीआर) वतीने माजी विद्यार्थ्यांच्या जागतिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
आयएमडीआर. संग्रहालय, डॉ. पी. सी. शेजवलकर कॉर्नर, माजी विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन, छायाचित्रांचे प्रदर्शन, स्टार्टअप प्रदर्शन व स्पर्धा, कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे जाहिरात मोहिमा, शेतीमधील रोबोटिक्स, वाचनाच्या पद्धती, पर्यावरणपूरक वाहतूक, तंत्रज्ञानावर आधारित कचरा व्यवस्थापन, वनस्पतींचे प्रदर्शन आदी उपक्रमांचे त्यानिमित्ताने आयोजन करण्यात आले होते. संचालिका डॉ. शिखा जैन यांच्या मार्गदर्शनाखाली मेळावा संपन्न झाला. विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या 200 हून अधिक माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.


