पुणे, 27 डिसेंबर 2024: या वीकेंडला पुण्यातील लोकप्रिय लाइफस्टाईल डेस्टिनेशनमध्ये “विंटर फेस्ट” आयोजित करण्यात आला असून, ज्यामध्ये हिवाळ्याच्या या गारव्यात उत्सवाचा आनंद घेता येईल. हा एक खास उत्सव असणार असून, यावेळी त्यात हिवाळी पदार्थ, स्वादिष्ट खाद्यपदार्थ आणि आनंदाच्या वातावरणाने समृद्ध एक अविस्मरणीय अनुभव मिळेल. कुटुंब, मित्र आणि खाद्यप्रेमींसाठी हा महोत्सव पुण्यातील सर्वोत्तम हंगामी उत्सव ठरणार आहे.
या कार्यक्रमात चॉकलेटप्रेमींसाठी खास हॉट चॉकलेट स्टेशन आणि “विंटर फ्ली मार्केट” असणार आहे, जेथे अनोख्या भेटवस्तू व सणासुदीच्या खास वस्तूंची खरेदी केली जाऊ शकते. येथे भेट देणाऱ्यांना 25 हून अधिक हिवाळी आणि सणसुदीच्या खाद्यपदार्थांचा आनंद घेता येईल, तसेच त्यासोबत 15+ खास पेयांची चव चाखता येईल.
कार्यक्रमात सर्व वयोगटांतील गेस्ट्ससाठी इंटरअॅक्टिव्ह आणि आकर्षक कार्यशाळा व विविध उपक्रम आयोजित केले जातील. सणाच्या वातावरणात रंग भरताना, थीम असलेला फोटो बूथ आणि प्रॉप्ससह फोटो काढण्याची संधी दिली जाईल, तसेच डीजेच्या परफॉर्मन्समुळे सर्वांना उत्साही व नृत्याची मजा लुटता येईल.
तुम्हाला स्वादिष्ट पदार्थांचा आनंद घ्यायचा, अनोख्या वस्तू खरेदी करायच्या किंवा सणासुदीच्या आनंदात न्हाऊन निघायची इच्छा असेल, तर या कार्यक्रमात प्रत्येकासाठी काही खास आहे. या हिवाळ्यात कोपा मॉलच्या “विंटर फेस्ट”मध्ये सहभागी व्हा आणि आपल्या प्रियजनांसोबत अविस्मरणीय आठवणींचा पेटारा तयार करा.
ठिकाण: टेरेस
तारीख: शनिवार आणि रविवार, 28 – 29 डिसेंबर
वेळ: 04:00 पासून
KNOW MORE – https://things2.do/blogs/hot-chocolate-live-performances-flea-market-winterfest-2024-pune-is-all-we-need/


