Wednesday, September 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedऔद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोरवाडी येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी...

औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोरवाडी येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी…

पिंपरी, दि. ३ जानेवारी २०२४ – स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात ज्ञानाच्या ज्योती पेटवून स्त्रीशिक्षणाचा मार्ग मोकळा करण्याचे काम ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी केले. शिक्षण हे प्रगतीचे माध्यम असून त्याद्वारे व्यक्तीचा सर्वांगीण विकास होण्यास मदत मिळते. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या या आदर्शांवर चालून शिक्षणाने स्वतःला सक्षम करून समाजात समानतेचा प्रकाश पसरविण्याचे ध्येय प्रत्येक स्त्रीने अंगी बाळगले पाहिजे, असे मत औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोरवाडीचे प्राचार्य शशिकांत पाटील यांनी व्यक्त केले.

औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोरवाडी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिला शिक्षण दिन उत्साहात साजरा करण्यात आला, त्यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य शशिकांत पाटील बोलत होते. या कार्यक्रमास मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कार्यालयीन अधिक्षक उमा दरवेश, गट निदेशिका शर्मिला काराबळे तसेच संस्थेतील प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

यावेळी संस्थेतील प्रशिक्षणार्थींनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्य व विचारांचा जागर केला. तसेच महापालिकेच्या वतीने प्रशिक्षणार्थींना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित पुस्तिका संग्रहाचे वाटप देखील करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments