पुणे,4जानेवारी 2025: होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने आज डिसेंबर २०२४ महिन्यासाठी आपल्या विक्री आकडेवारीची घोषणा केली. डिसेंबर’२४ मध्ये कंपनीच्या एकूण ३,०८,०८३ युनिट्सची विक्री झाली. यामध्ये २,७०,९१९ युनिट्सची देशांतर्गत विक्री आणि निर्यात करण्यात आलेल्या ३७,१६४ युनिट्सचा समावेश आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, एचएमएसआयचे कॅलेंडर वर्ष २०२४ साठी होलसेल ५८,०१,४९८ युनिट्स राहिले, ज्यामध्ये कॅलेंडर वर्ष २०२३ च्या तुलनेत वार्षिक ३२ टक्क्यांची वाढ झाली. यामध्ये ५२,९२,९७६ युनिट्सची देशांतर्गत विक्री आणि निर्यात करण्यात आलेल्या ५,०८,५२२ युनिट्सचा समावेश आहे.
एचएमएसआयची कॅलेंडर वर्ष २०२४ ची ठळक वैशिष्ट्ये:
रेड विंग बिझनेसमध्ये नवीन ऑफरिंग्ज
इलेक्ट्रिक वेईकल्स: होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (एचएमएसआय) ने इलेक्ट्रिक वेईकल सेगमेंटमध्ये अॅक्टिव्हा ई: आणि क्यूसी१ लॉंच करत गतीशीलतेच्या नवीन युगामध्ये प्रवेश केला. या वेईकल्सकरिता बुकिंग्जना १ जानेवारी २०२५ पासून सुरूवात झाली आहे आणि डिलिव्हरीजना फेब्रुवारी २०२५ पासून सुरूवात होईल. या महिन्याच्या उत्तरार्धात भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो येथे या नवीन इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या किमती जाहीर करण्यात येतील.
ओबीडी२बी प्रमाणित उत्पादने: ग्राहकांना अधिक उत्साहित करण्यासाठी एचएमएसआयने अॅक्टिव्हा १२५, एसपी१२५, एसपी१६० आणि युनिकॉर्नचे ओबीडी२बी प्रमाणित मॉडेल्स लॉंच केले, ज्यामध्ये प्रगत वैशिष्ट्ये आहेत.
होंडाचा प्रीमियम मोटरसायकल बिझनेस ‘बिगविंग’
नवीन ऑफरिंग्ज: एचएमएसआयने नवीन ‘एनएक्स५००’ अॅडव्हेंचर टूरर लाँच केली. ‘न्यू एक्स-ओव्हर’वर आधारित एनएक्स५०० वादळी वारे असलेल्या रस्त्यापासून खडतर प्रदेश ते लांब अंतरापर्यंतच्या साहसी राइडिंगपर्यंत विविध प्रदेशांमध्ये उत्साहवर्धक अनुभव देण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे.
फ्लेक्स-फ्यूएल वेईकल: एचएमएसआयने नवीन सीबी३००एफ फ्लेक्स-फ्यूएल लाँच करत देशातील हरित गतीशीलता सोल्यूशन्समधील संक्रमणाच्या दिशेने मोठे पाऊल उचलले. सीबी३००एफ भारतातील पहिली ३००सीसी फ्लेक्स-फ्यूएल मोटरसायकल आहे.
व्यवसाय व ब्रँडचे महत्त्वपूर्ण टप्पे
नवीन असेम्ब्ली लाइन्स: ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला चालना देण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत एचएमएसआयने गुजरात राज्यामधील विठलपूर येथे आपल्या चौथ्या दुचाकी प्लांटमध्ये नवीन तिसऱ्या असेम्ब्ली लाइनचे उद्घाटन केले. कंपनीने सीकेडी (कम्प्लीटली नॉक्ड डाऊन) निर्यातींवर लक्ष केंद्रित करत मानेसर, गुरूग्राम (हरियाणा) येथील आपल्या ग्लोबल रिसोर्स फॅक्टरीमध्ये देखील नवीन अत्याधुनिक इंजिन असेम्ब्ली लाइनची भर केली.
व्यवसायातील महत्त्वपूर्ण टप्पे: एचएमएसआयने भारतात ६ कोटी देशांतर्गत विक्रीचा ऐतिहासिक टप्पा संपादित केला. जून २००१ मध्ये रिटेल कार्यसंचालनांना सुरूवात करत होंडा दोन दशकांहून अधिक काळापासून भारतातील ग्राहकांना उत्साहित करत आहे. तसेच, होंडाच्या १२५ सीसी मोटरसायकल्स ‘शाइन व एसपी१२५’ यांनी पूर्व भारतात ३० लाखांहून अधिक ग्राहकांचा टप्पा पार केला. कंपनीने दक्षिण भारतात अॅक्टिव्हासाठी १० दशलक्ष ग्राहकांचा टप्पा पार करण्याच्या उल्लेखनीय यशाची देखील घोषणा केली.
रस्ता सुरक्षा
भारतातील रस्ते सर्वांसाठी सुरक्षित करण्यासाठी एचएमएसआयने लहान मुले व प्रौढ व्यक्तींसाठी शाळा, महाविद्यालये आणि सरकारी संस्थांमध्ये रस्ता सुरक्षा जनजागृती मोहिमांचे आयोजन केले. हा उपक्रम देशभरातील १०० हून अधिक शहरांमध्ये राबवण्यात आला.
एचएमएसआयने त्यांचा सुरू असलेला प्रकल्प – आपल्या भावी पिढीसाठी मानसिकता विकासचा भाग म्हणून शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांसोबत विविध शहरांमध्ये आठ रोड सेफ्टी कन्वेंशन्सचे देखील आयोजन केले. यासह, कंपनीने एकूण ८५ लाखांहून अधिक भारतीय नागरिकांना रस्ता सुरक्षेच्या महत्त्वाबाबत जागरूक केले आहे.
कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी
सामाजिक-आर्थिक उत्थानासाठी प्रकल्प: होडा इंडिया फाऊंडेशन (एचआयएफ)ने आपला प्रमुख उपक्रम प्रोजेक्ट प्रगती सुरू ठेवला आहे, ज्याअंतर्गत फाऊंडेशन नवीन व विद्यमान जीडीएना सिद्धांत, सिम्युलेटर व व्यावहारिक प्रशिक्षण देते. एचआयएफने मिझोरम युथ कमिशन (एमवायसी) आणि व्हिजन फाऊंडेशनसेाबत सहयोगाने ‘प्रोजेक्ट बुनियाद – आत्मनिर्भरता का आधार’ लॉंच केला, ज्याचा समाजातील वंचित विभागांमधील बेरोजगार तरूणांना रोजगार देण्याचा मनसुबा आहे. एचआयएफने आपला ‘स्त्री सारथी… महिलांना स्वत:चा मार्ग घडवण्यास मार्गदर्शन’ महिला सक्षमीकरण उपक्रम सुरू केला आणि इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्च, कमल येथे महिला कॅब ड्रायव्हर्सना प्रशिक्षण दिले.
विद्यार्थ्यांसाठी औद्योगिक भेट: एचएमएसआयने मानेसर (हरियाणा) येथील आपल्या ग्लोबल रिसोर्स फॅक्टरीमध्ये तरूण विद्यार्थ्यांसाठी औद्योगिक भेटीचे आयोजन केले. या उपक्रमांतर्गत, कंपनीने कंपनीच्या उत्पादन केंद्राचे सादरीकरण व व्यावहारिक मार्गदर्शित टूर, तसेच आरोग्य, रस्ता सुरक्षा व मोटरस्पोर्ट्स या क्षेत्रांमध्ये एचएमएसआयच्या तज्ञांच्या सर्वसमावेशक सत्रांचे आयोजन केले.
जागतिक पर्यावरण दिन: एचएमएसआयने ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एन्व्हायरोन्मेंट मंथ साजरा केला. एन्व्हायरोन्मेंट मंथ साजरीकरणाचा भाग म्हणून एचएमएसआय भारतातील विविध प्रांतांमध्ये १ लाख झाडांची लागवड करत प्रेरणादायी उदाहरण स्थापित करत आहे.
मोटरस्पोर्ट्स
होंडा इंडिया टॅलेंट कप: अपवादात्मक रेसिंग क्षमता दाखवत मोहसीन परंबनने अव्व्ल स्थान पटकावले आणि २०२४ इडेमित्सू होंडा इंडियन टॅलेंट कप एनएसएफ२५०आर मध्ये यशस्वी ठरला.
एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीप: आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी छाप पाडत इडेमित्सू होंडा रेसिंग इंडियाचे केव्हिन क्विंटल आणि मोहसीन परंबन यांनी एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीप फिनालेमध्ये प्रवेश केला. इडेमित्सू होंडा रेसिंग इंडिया टीमने एशिया प्रॉडक्शन २५० सीसी (एपी२५०) क्लासमध्ये सीझनसाठी एकूण १३ पॉइण्ट्स प्राप्त केले.
मोटोजीपी: मोटोजीपी २०२४ चॅम्पियनशीपमध्ये रेप्सॉल होंडा टीम राइडर जोआन मिरने २१वे पोझिशन संपादित केले, तर त्याचा टीममेट लुसा मारिनीने २२वे पोझीशन पटकावले.
डकार रॅली: मॉन्स्टर एनर्जी होंडा टीम राइडर रिकी ब्रॅबेक सीआरएफ४५० रॅली फॅक्टरी बाइक राइड करत डकार रॅली २०२४ मध्ये २०२० पासून दुसऱ्यांदा एकूण मोटरसायकल श्रेणीमध्ये विजेता ठरला, जेथे एफआयएम वर्ल्ड रॅली-रेड चॅम्पियनशीपचा ओपनिंग राऊंड सौदी अरेबियामध्ये आयोजित करण्यात आला होता.
==============================


