Tuesday, September 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedकर्करोगाचा सामना करण्‍यासाठी धोरणात्‍मक परोपकारी कार्य: विन्‍झो आणि टाटा मेमोरिअल हॉस्पिटलने...

कर्करोगाचा सामना करण्‍यासाठी धोरणात्‍मक परोपकारी कार्य: विन्‍झो आणि टाटा मेमोरिअल हॉस्पिटलने भारतातील पहिले जीन काऊंसलिंग केंद्र उभारण्‍यासाठी गुंतवणूक केली विन्‍झोच्‍या ‘प्‍ले टू प्रीव्‍हेंट कॅन्‍सर’ उपक्रमाच्‍या माध्‍यमातून प्‍लॅटफॉर्म व त्‍याचे वापरकर्ते भारतातील पहिल्‍या अनुवांशिक समुपदेशन व चाचणी प्रयोगशाळेप्रती योगदान देतात

पुणे, 6 जानेवारी 2025: विन्‍झोने अनुवांशिक समुपदेशनच्‍या माध्‍यमातून कर्करोगाच्‍या लव‍कर निदानासाठी, तसेच २०० दशलक्ष वापरकर्त्‍यांमध्‍ये कर्करोगाच्‍या लवकर निदानाच्‍या महत्त्वाबाबत जागरूकता निर्माण करण्‍यासाठी निधी उभारण्‍याकरिता ‘प्‍ले टू प्रीव्‍हेंट कॅन्‍सर’ उपक्रम लाँच केला. प्‍लॅटफॉर्मवरील ‘प्‍ले टू प्रीव्‍हेंट कॅन्‍सर’ तासाच्‍या माध्‍यमातून विन्‍झोने वापरकर्त्‍यांकडून निधी उभारला आणि त्‍यांच्‍या २०० टीम सदस्‍यांनी वापरकर्त्‍यांनी उभारलेल्या निधीइतकाच निधी उभारला, ज्‍यामुळे एकूण दान रक्‍कमेमध्‍ये वाढ झाली. ही रक्‍कम टाटा मेमोरिअल हॉस्पिटल येथील अॅडवान्‍स्‍ड सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँड एज्‍युकेशन इन कॅन्‍सर (एसीटीआरईसी)ला दान करण्‍यात आली आणि टाटा मेमोरिअल हॉस्पिटल येथील अनुवांशिक समुपदेशन टीमला प्रशिक्षित करण्‍यासाठी वापरण्‍यात येईल.

कर्करोग मृत्‍यूचे प्रमुख कारण बनले आहे, तसेच कर्करोगाच्‍या उपचारासाठी रूग्‍ण, यांचे केअरगिव्‍हर्स व कुटुंबांवर मोठ्या प्रमाणात भार पडतो. हे पाहता विन्‍झोने भारताच्‍या कर्करोगाचे लवकर निदान करण्‍याच्‍या क्षमता वाढवण्‍याला प्राधान्‍य दिले. २००० ते २०१९ दरम्‍यान जवळपास १३ दशलक्ष भारतीयांनी २३ प्रकारच्‍या कर्करोगांमुळे आपला जीव गमावला, हे प्रमाण सिंगापूरमधील आकारमानाच्‍या तुलनेत दुप्‍पट आहे. २०२२ मध्‍ये जागतिक स्‍तरावर (globally) २० दशलक्ष नवीन कर्करोग केसेस आणि ९.७ दशलक्ष मृत्‍यू आढळून आले. नवीन वार्षिक केसेसची आकडेवारी २०५० पर्यंत नवीन ३५ दशलक्ष केसेसपर्यंत वाढण्‍याची अपेक्षा आहे. पण, गेल्‍या २० वर्षांमध्‍ये कर्करोग प्रतिबंध, उपचार व पॅलिएटिव्‍ह केअरमध्‍ये लक्षणीय प्रगती दिसण्‍यात आली आहे. सर्वात प्रभावी हस्‍तक्षेप जेनेटिक काऊंसलिंगच्‍या रूपात दिसून आला आहे, जो कर्करोगाचा धोका प्रतिबंध व कमी करण्‍यासाठी महत्त्वपूर्ण टूल म्‍हणून झपाट्याने उदयास येत आहे. भारतातील सर्वात मोठे इंटरअॅक्टिव्‍ह सोशल गेमिंग प्‍लॅटफॉर्म विन्‍झो आणि टाटा मेमोरिअल हॉस्पिटल यांच्‍यामधील सहयोगाचा अनुवांशिक समुपदेशनच्‍या माध्‍यमातून कर्करोगाच्‍या वाढत्‍या धोक्‍याचे निराकरण करण्‍याचा मनसुबा आहे, ज्‍यामुळे कर्करोग होण्‍यास कारणीभूत ठरणाऱ्या अनुवांशिकतेबाबत अधिक माहिती मिळेल, तसेच भारतातील संभाव्‍य कर्करोग रूग्‍णांना लवकर निदान व उपचार करण्‍यास मदत होईल.

या उपक्रमाचा अनुवांशिक समुपदेशनासाठी कौशल्‍य विकासावर, तसेच जीन रिपोर्टिंग व तपासणी आणि कौटुंबिक समुपदेशानासंदर्भात महत्त्वपूर्ण हस्‍तक्षेपांना पाठिंबा देण्‍यावर फोकस आहे. अनुवांशिक समुपदेशनावरील स्किलिंग व प्रशिक्षणामधील ही गुंतवणूक कर्करोग प्रतिबंध, जागरूकता व लवकर निदानासंदर्भातील आव्‍हानांचे निराकरण करण्‍यावर मोठा प्रभाव निर्माण करण्‍याची शक्‍यता आहे. हा हस्‍तक्षेप टाटा मेमोरिअल हॉस्पिटल येथे देशातील कमी खर्चिक अनुवांशिक तपासणी लॅबच्‍या माध्‍यमातून अनुवांशिक समुपदेशन देण्‍याची भारताची क्षमता वाढवेल, ज्‍यामुळे विभिन्‍न सामाजिक-आर्थिक पार्श्‍वभूमींमधील अधिकाधिक भारतीयांना हा महत्त्वपूर्ण हस्‍तक्षेप उपलब्‍ध होईल.

टाटा मेमोरिअल हॉस्पिटल येथील कॅन्‍सर जेनेटिक्‍स क्लिनिक्‍स आणि कॅन्‍सर जेनेटिक्‍स/जीनोमिक्‍स लॅबचे प्रमुख डॉ. राजीव सरिन क्षमता निर्माण व स्किलिंगच्‍या महत्त्वावर भर देत म्‍हणाले, “मी विन्‍झो व त्‍यांच्‍या वापरकर्त्‍यांचे बहुमूल्‍य योगदानासाठी आभार व्‍यक्‍त करतो. जेनेटिक काऊंसलिंग प्रोफेशनल्‍ससाठी त्‍यांचा पाठिंबा कर्करोगासह निदान झालेल्‍या लाखो भारतीयांना मदत करण्‍यामध्‍ये महत्त्वाचा ठरेल. हे कॅन्‍सर जेनेटिक प्रोफेशनल्‍स कर्करोग्रस्‍त रूग्‍णांना वेळेवर, सांस्‍कृतिकदृष्‍ट्या संवेदनशील, वैयक्तिकृत आणि पुरावा-आधारित अनुवांशिक समुपदेशन देतील. उपकरण किंवा पायाभूत सुविधा अशा दान केलेल्‍या संसाधनांचा प्रभाव वाढवण्‍यासाठी उत्तमरित्‍या प्रशिक्षित, प्रेरित व्‍यावसायिकांच्‍या टीमची गरज आहे.”

कर्करोगासंदर्भात केअर घेताना कर्करोग्रस्‍त रूग्‍ण आणि त्‍यांच्‍या केअरगिव्‍हर्सच्‍या मानसिक आरोग्‍यावर देखील परिणाम होतो. डेटामधून (Data) निदर्शनास येते की, उपचाराचा किंवा आजार प्रगत होण्‍याचा कोणताही टप्‍पा असो जवळपास २० टक्‍के कर्करोगग्रस्‍त रूग्‍ण नैराशयाचा सामना करतात आणि १० टक्‍के रूग्‍णांना चिंता भेडसावते. याच डेटामधून निदर्शनास येते की, ३५ ते ४० टक्‍क्‍यांहून अधिक कर्करोगग्रस्‍त रूग्‍णांना निदान करण्‍यायोग्‍य मानसिक आजार आहेत, ज्‍यामध्‍ये न्‍यूरोसायकियाट्रिक मॅनिफेस्‍टेशन्‍स आणि तणाव-संबंधित, न्‍यूरोकॉग्निटिव्‍ह, समायोजन व सोमॅटिक लक्षण विकारांचा समावेश आहे. एकत्रित, ही आव्‍हाने विशेषत: निदानानंतर सुरूवातीच्‍या टप्‍प्‍यांमध्‍ये रूग्‍णांमध्‍ये आत्‍महत्‍या करण्‍याची शक्‍यता आणि एकटेपणामध्‍ये वाढ करतात.

विन्‍झोच्‍या प्‍लॅटफॉर्मवरील गेम्‍स आजाराशी संबंधित तणाव, चिंता व समाजापासून वेगळे राहण्‍याची भावना कमी करण्‍यासाठी उपचारात्‍मक टूल म्‍हणून सेवा देतात, मनोरंजनाच्‍या माध्‍यमातून अवधान विचलित करतात आणि कर्करोगग्रस्‍त रूग्‍णांमध्‍ये मानसिक क्षमता वाढवतात. विन्‍झोच्‍या प्‍लॅटफॉर्मवर असलेले कॅच्‍युअल सोशल गेम्‍स कर्करोगग्रस्‍त रूग्‍णांना गेम्‍स खेळत स्थितीशी सामना करण्‍याच्‍या पर्यायी पद्धतींचा शोध घेण्‍यास मार्ग देतात. हे गेम्‍स संज्ञानात्‍मक फायदे देतात, जसे अवधानावर नियंत्रण, संज्ञानात्‍मक स्थिरता आणि माहिती प्रकिया. यामुळे नैराग्‍य व चिंता अशा लक्षणांचे निराकरण होते. विन्‍झोच्‍या वापरकर्त्‍यांनी प्‍लॅटफॉर्मवरील गेम्‍सनी कर्करोगासाठी उपचार घेत असलेल्‍या आणि संबंधित मानसिक आरोग्‍य आव्‍हानांचा सामना करत असलेल्‍या रूग्‍णांचे कशाप्रकारे लक्ष वेधून घेतले आहे हे दाखवून दिले. त्‍यांनी उल्‍लेख केला आहे की यामुळे ते मोठ्या समुदायाचा भाग बनले आहेत आणि प्रत्‍यक्ष वेगळे राहत आपलेपणाची भावना दिली आहे. यामुळे त्‍यांची चिंता, नैराश्‍य व एकाकीपणाची भावना मोठ्या प्रमाणात कमी झाली. द बनियान अकॅडमी ऑफ लीडरशीप इन मेण्‍टल हेल्‍थ येथील सायण्टिस्‍ट नचिकेत मोर यांनी आरोग्‍यसेवामध्‍ये गेमिंगच्‍या क्षमतेला दाखवले. ते म्‍हणाले, “कर्करोगग्रस्‍त रूग्‍णांना अनेकदा मानसिक आरोग्‍यसंदर्भात मोठ्या आव्‍हानांचा सामना करावा लागतो, जवळपास ९० टक्‍के रूग्‍ण चिंताग्रस्‍त आहेत आणि अनेक वृद्ध व्‍यक्‍ती निदानानंतर एकटेपणाचा सामना करत आहेत. कर्करोगाविरोधातील लढ्यादरम्‍यान तुम्‍हाला दीर्घकाळापर्यंत मानसिक आरोग्‍यसंदर्भातील समस्‍यांचा सामना करावा लागू शकतो, याचा फक्‍त रूग्‍णांवर नाही तर त्‍यांच्‍या कुटुंबांच्‍या मानसिक आरोग्‍यावर देखील परिणाम होऊ शकतो. ऑनलाइन गेमिंग उदयोन्‍मुख, पण कमी वापरले जाणारे टूल आहे, जे मानसिक आरोग्‍य उत्तम ठेवते, उपचाराचे पालन करण्‍यास मदत करते आणि रूग्‍णांना सर्वसमावेशक व न घाबरवणाऱ्या पद्धतीने माहिती देते. कॅन्‍सर केअरमध्‍ये गेमिंगचा समावेश करत स्थिरतेला चालना देता येऊ शकते, रूग्‍णांना अधिक आधार देता येऊ शकतो आणि अधिक दयाळू आरोग्‍यसेवा यंत्रणा तयार करता येऊ शकते, ज्‍यामुळे रूग्‍णांना संकटाच्‍या काळात पाठिंबा देण्‍यास आणि नैराग्‍य, चिंता अशा दीर्घकालीन आव्‍हानांचे निराकरण करण्‍यास मोठा मार्ग मिळू शकतो.”

कॅन्‍सर सर्व्‍हायव्‍हर आणि विन्‍झोच्‍या युजरने आपला अनुभव सांगितला, “विन्‍झोच्‍या प्‍लॅटफॉर्मवरील गेमिंग माझ्यासाठी मोठा दिलासा होता. मी नर्व्हस झालो की व भारावून गेलो की काही मिनिटे गेम खेळायचो, ज्‍यामुळे चिंतांपेक्षा माझे डावपेच व गेमवर अधिक लक्ष केंद्रित व्‍हायचे. फक्‍त २ ते ३ मिनिटे चालणाऱ्या झटपट गेम्‍सनी माझ्यामध्‍ये सकारात्‍मक ऊर्जा निर्माण केली आणि मनापासून गेम्‍समध्‍ये गुंतून गेलो. कोडी सोडवायची असो किंवा आकडेवारीचे गेम्‍स खेळायचे असो या गेम्‍सनी माझे आजारामुळे निर्माण झालेल्‍या चिंतेकडे लक्ष विचलित केले आणि माझ्यामध्‍ये मानसिक कौशल्‍ये निर्माण केली, तसेच मला आव्‍हानातमक काळात प्रेरित व आशावादी राहण्‍यास मदत केली.”

==============================

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments