राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर जिल्हा वाहतूक विभागाच्या वतीने प्रादेशिक परिवहन अधिकारी पिंपरी चिंचवड शहर तसेच उपायुक्त वाहतूक विभाग यांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदनात विनोद वरखडे यांनी म्हटले आहे की, प्रवासी घेण्यासाठी आणि सोडवण्यासाठी बस चालक, ट्रॅव्हल्स चालक कुठे ही आपली वाहने थांबवत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. त्यामुळे पिंपरी चिंचवड वाहतूक पोलीस आणि आरटीओ यांनी काही थांबे निश्चित केले आहेत, मात्र बस चालक व ट्रॅव्हल्स चालक प्रवासी घेण्यासाठी कुठेही थांबत आहेत, त्यामुळे अपघात मोठ्या प्रमाणात होत असून वाहतूक कोंडीत भर पडत आहे. दैनंदिन वाहतूकदारांना त्यांचा फटका बसतो. नागरिक आपल्या गावी ये-जा करण्यासाठी प्रामुख्याने खाजगी बस व ट्रॅव्हल्सचा वापर करतात.
निगडी, तळवडे, चिखली, भोसरीतून ट्रॅव्हल बस ये-जा करतात, ते करत असताना ते कुठेही आपली वाहने थांबवतात, त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन अपघात होतात. काही महिन्यापूर्वीच वाहतूक विभागाने बस व ट्रॅव्हल्स पिकअप आणि ड्रॉप निश्चित केले होते, तरीही ट्रॅव्हल्स व बस चालक प्रवासी घेण्यासाठी रस्त्यात कुठेही बस थांबवत असतात. त्यामुळे अपघातात वाढीस कारण ठरत आहे. तरी यावर त्वरित कारवाई करावी. अशी मागणी शहर अध्यक्ष राष्ट्रवादी वाहतूक सेल श्री. विनोद वरखडे यांनी पोलीस आयुक्त, वाहतूक व प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे केली आहे.
यावेळी पदवीधर सेल अध्यक्ष प्रदीप अवटी उपस्थित होते.
अपघाताला निमंत्रण देणाऱ्या बस व ट्रॅव्हल्स बेकायदेशीर थांब्यावर कारवाई करावी… विनोद वरखडे*
RELATED ARTICLES


