● अनेकविध नवीन सुविधांनी युक्त अशी योजना, ह्यामध्ये ग्राहकांना त्यांच्या गरजांच्या आधारावर व्यक्तिनुरूप निवृत्ती योजना देण्याची तरतूद आहे
● वाढत्या वार्षिकी प्रकारासह दरवर्षी उत्पन्न सहा टक्क्यांनी वाढवण्याचा पर्याय
● ग्राहकाच्या आर्थिक उद्दिष्टानुसार, रिटर्न ऑफ प्रीमियम अर्थात हप्त्या परताव्याच्या विस्तृत श्रेणीतून, हवा तो पर्याय निवडण्याची लवचिकता
नवी दिल्ली, जानेवारी २३, २०२४: मॅक्स लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने (‘मॅक्स लाइफ’/ ‘कंपनी’) स्मार्ट वेल्थ अॅन्युइटी गॅरंटीड पेन्शनल प्लान अर्थात स्वॅग पेन्शन प्लान (यूआयएन-१०४एन१३७व्ही०२) बाजारात आणला आहे. ही एक नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग व्यक्तिगत/समूहाधारित सामान्य वार्षिक बचत योजना आहे. नवीन युगातील ग्राहकांच्या विशिष्ट गरजांनुसार तयार करण्यात आलेली ‘स्वॅग पेन्शन प्लान’ निवृत्ती योजनांच्या कक्षा नव्याने मांडणारी, लवचिकतेला सुरक्षिततेची जोड देणारी आणि व्यक्ती व समूह दोघांना सारखीच व्यक्तिनुरूपता (पर्सनलायझेशन) देणारी योजना आहे.
शहरी भारतीयांमध्ये निवृत्तीबद्दल मोठी चिंता असल्याचे मॅक्स लाइफच्या इंडिया रिटायरमेंट इंडेक्स स्टडी ३.० मध्ये आढळले आहे. आपली बचत निवृत्तीनंतर फक्त दहा वर्षांतच कमी होत जाईल अशी चिंता पाचपैकी तीन जणांनी व्यक्त केली आहे. ह्या माहितीच्या आधारावर स्वॅग पेन्शन प्लान विकसित करण्यात आला आहे. ग्राहकांच्या जीवनशैलीला आवश्यक असे उत्पन्न आयुष्यभर मिळत राहावे अशी दमदार तरतूद ह्या योजनेत आहे. ही योजना केवळ ग्राहकाचेच नव्हे, तर त्याच्या/तिच्या जवळच्या व्यक्तींचे भवितव्यही सुरक्षित करते. ह्या अनन्यसाधारण उत्पादनामुळे ग्राहकांना स्वत:ची पॉलिसी स्वत: आखून घेण्याची, वार्षिक पर्यायांच्या वैविध्यपूर्ण श्रेणीतून आपल्याला हवा तो पर्याय निवडण्याची मुभा मिळते. त्याचबरोबर वाढत्या चलनवाढीशी (महागाईशी) जुळवून घेणारा* आणि व्यक्तीला हव्या त्या वेळेला उत्पन्न मिळवून देणारा लवचीक पर्याय ही योजना देते. शिवाय, ग्राहकांना रिटर्न ऑफ प्रीमियमच्या विस्तृत श्रेणीतून हवा ता पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्यही ह्या योजनेत आहे. त्यामुळे विशिष्ट आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्याच्या दृष्टीने ग्राहक विशिष्ट योजना निवडू शकतात.
मॅक्स लाइफचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत त्रिपाठी म्हणाले, “लोकसंख्येच्या रचनेत होत असलेल्या लक्षणीय बदलांचा विचार करता, भारतातील बहुसंख्या मनुष्यबळासाठी निवृत्तीच्या दृष्टीने आर्थिकदृष्ट्या सज्ज राहणे निर्णायक होत चालले आहे. स्मार्ट वेल्थ अॅन्युइटी गॅरंटीड पेन्शन प्लान-स्वॅग पेन्शन प्लान म्हणजे ग्राहकांच्या सातत्याने बदलत जाणाऱ्या गरजांची पूर्तता करणारी नवोन्मेषकारी उत्पादने आणण्याप्रती आमच्या बांधिलकीचे प्रतीक आहे. ह्या योजनेच्या कस्टमाइझ करण्याजोग्या सुविधांच्या व वैशिष्ट्यपूर्ण प्रकारांच्या माध्यमातून, व्यक्तीला आपला निवृत्तीचा प्रवास सक्रियपणे आखण्याची क्षमता प्राप्त होते तसेच आर्थिक सक्षमीकरणाच्या खंबीर भावनेसह आपल्या इच्छा पूर्ण करण्याचे सामर्थ्यही लाभते.”
स्वॅग पेन्शन प्लानमध्ये समाविष्ट बाबी (पॉलिसी नियम व अटींना अधीन) पुढीलप्रमाणे:
● ग्राहकाच्या निवृत्तीविषयक गरजांची पूर्तता करणाऱ्या वार्षिकता पर्यायांची विस्तृत श्रेणी
● वार्षिकीधारक जिवंत असल्यास त्याला/तिला किंवा अन्य परिस्थितीत त्याने/तिने नामांकित केलेल्या व्यक्तीला, दिल्या जाणाऱ्या आंशिक हप्ता परताव्याचे प्रमाण निवडण्याच्या लवचिकतेसह तत्काळ दिली जाणारी वार्षिकी (वार्षिक रक्कमः
● वाढत्या महागाईसाठी सज्ज राहण्याचा भाग म्हणून दरवर्षी सहा टक्क्यांपर्यंत वाढणारी वार्षिकता
● ७० वर्षे ते ८५ वर्षे ह्यांदरम्यानचे (पाच वर्षांच्या टप्प्यांमध्ये) ‘माइलस्टोन एज’ पूर्ण झाल्यास हप्त्याचा मुदतपूर्व परतावा
● प्रथम वार्षिकीधारकाचा मृत्यू झाल्यास जिवंत असलेल्या वार्षिकीधारकाला वार्षिकीचे निर्धारित प्रमाण मुदतीपूर्वी काढून घेण्याची मुभा
● ग्राहक लवकर नियोजन करून, पहिल्या महिन्यापासून ते १२ वर्षांपर्यंत, वार्षिकी पुढे ढकलू शकतात आणि त्यायोगे निवृत्तीच्या वेळी अधिक वार्षिकी मिळवू शकतात.
स्वॅग पेन्शन प्लान आजच्या ग्राहकाच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी परिश्रमपूर्वक विकसित केलेली योजना आहे. त्याद्वारे ग्राहकांना वार्षिकीचे पर्याय व कस्टमाइझ करण्याजोग्या सुविधांचा मेळ घालून दिला जातो. कंपनीच्या मोलाच्या ग्राहकांच्या वैविध्यपूर्ण व बदलत्या गरजांची पूर्तता करणारी नवोन्मेषकारी उत्पादने आणण्याप्रती आमची बांधिलकी ही योजना आणल्यामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
*केवळ वाढत्या तत्काळ वार्षिकता (इन्क्रीजिंग इमिजिएट अॅन्युइटी) प्रकारांत उपलब्ध.


