२०२४ हे वर्ष नॉन- बँकिंग फायनान्शियल कंपनीज (एनबीएफसी) क्षेत्रात झालेले बदल, नाविन्यपूर्णता आणि बाजारपेठेतील बदलांमुळे क्रांतीकारी ठरले. जागतिक पातळीवर अनिश्चितता असूनही भारताच्या अर्थव्यवस्थेने चिकाटी दाखवली आणि गृहक्षेत्र तसेच एमएसएमई क्षेत्र स्थिर राहिले. गोदरेज कॅपिटलचे प्रमुख मार्केटिंग अधिकारी नलिन जैन म्हणाले, ‘भारताची आर्थिक मूलभूत तत्वे मजबूत राहिली व त्यातून भारताची कठीण काळातही परिस्थितीनुसार बदलण्याची व विकास करण्याची क्षमता सिद्ध झाली.’
नलिन जैन यांनी २०२४ वर्षात एनबीएफसीमध्ये घडून आलेली क्रांती, महत्त्वाचे ट्रेंड्स, घडामोडी आणि या वर्षाचा रोख ठरवणारी नाविन्यपूर्णता याविषयी सखोल निरीक्षणे माडंली आहेत. ‘एनबीएफसीने एआय, एमएल आणि डेटा अनालिटिक्सचा स्वीकार करत त्याचा वापर ग्राहक सेवा उंचावण्यासाठी, जोखीम विश्लेषण सुधारण्यासाठी आणि नाविन्यपूर्ण आर्थिक उत्पादने तयार करण्यासाठी केला. ग्राहकांच्या अपेक्षा विकसित झाल्या तशी कस्टमाइज्ड आर्थिक उत्पादने आणि जलद कर्ज वितरण आवश्यक ठरले,’ असे नलिन म्हणाले. ‘त्याशिवाय आर्थिक संस्थांबरोबर भागिदारीचा विस्तार झाल्यामुळे एनबीएफसीला वेगाने विस्तार करणे, नव्या बाजारपेठांमध्ये- विशेषतः निम- शहरी आणि ग्रामीण भागात उतरणे शक्य झाले,’ असेही ते म्हणाले.
२०२५ मध्ये महागाई आणि व्याजाच्या वाढत्या दरांचे आव्हान असू शकते व त्यामुळे कर्जाची मागणी आणि परतफेडीच्या क्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र, दमदार आर्थिक पायाभूत मूल्ये, डिजिटल सेवांचा वाढता अवलंब आणि आर्थिक उत्पादनांविषयी वाढती जागरूकता हे घटक अनुकूल ठरतील.
गोदरेज कॅपिटलच्या २०२५ मधील योजनांविषयी नलिन म्हणाले, ‘उत्पादन श्रेणीमध्ये वैविध्यता आणण्यास आमचे सर्वोच्च प्राधान्य राहाणार असून ग्राहकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी नवी उत्पादने तयार करण्याची आमची योजना आहे. त्यासाठी आम्ही तंत्रज्ञान तसेच डिजिटल सुविधांचा विस्तार करण्यात गुंतवणूक करणार आहोत. त्यामुळे वैयक्तिक, प्रभावी आणि नाविन्यपूर्ण आर्थिक सेवा पुरवणे आम्हाला शक्य होणार आहे.’


