Monday, September 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedपिंपरी- चिंचवड महापालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या जनसंवाद सभेत ९२ तक्रार वजा...

पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या जनसंवाद सभेत ९२ तक्रार वजा सूचना प्राप्त ….

पिंपरी, दि. १३ जानेवारी २०२५: पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयात आज जनसंवाद सभा पडली. आज झालेल्या जनसंवाद सभेत नागरिकांनी ९२ तक्रारी वजा सूचना मांडल्या.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी सर्व क्षेत्रीय कार्यालयात जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. त्यानुषंगाने आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या क्षेत्रीय कार्यालयात अनुक्रमे २६, ७, ७, ७, ४, १४, १५ आणि १२ अशा ९२ सूचना नागरिकांनी मांडल्या. महापालिकेच्या वतीने जनसंवाद सभेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या समन्वय अधिका-यांनी या जनसंवाद सभेचे अध्यक्षस्थान भूषविले.

आज झालेल्या जनसंवाद सभेत शहरातील अतिक्रमण हटवावे, ठिकठिकाणी चोकअप झालेली ड्रेनेज लाईन दुरुस्त करावी, पीएमपीएमएल बसस्टॉप वर वाचनालयाची व्यवस्था करावी, पाणीपुरवठा योग्य दाबाने करावा, शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजवावेत तसेच विविध भागात रस्ते तयार करावेत, अनधिकृत बांधकामांवर कारवाई करावी, सार्वजनिक स्वच्छतागृह स्वच्छ करावीत आदी सूचना नागरिकांनी मांडल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments