पुणे : स्वानंद प्रतिष्ठानच्यावतीने स्वानंद व्याख्यानमालेचे आयोजन दिनांक १७ आणि १८ जानेवारी रोजी करण्यात आले आहे. सिंहगड रस्त्यावरील अभिरुची मॉल येथे दररोज सायंकाळी ६ ते ८ यावेळेत ही व्याख्यानमाला होणार आहे. अशी माहिती प्रतिष्ठानचे प्रकाश असलेकर यांनी दिली.
व्याख्यानमालेच्या पहिल्या सत्रात शुक्रवार, दिनांक १७ जानेवारी रोजी ‘भारत तिसरी अर्थव्यवस्था कशी होऊ शकते’ या विषयावर अर्थतज्ञ दीपक करंजीकर (मुंबई) यांचे व्याख्यान होणार आहे. यावेळी केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री माधुरी मिसाळ उपस्थित राहणार आहेत.
दुसऱ्या सत्रात शनिवार, दिनांक १८ जानेवारी रोजी ‘भारताची संरक्षण व्यवस्था व परराष्ट्र धोरण’ या विषयावर राज्याचे उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळणकर यांचे व्याख्यान होणार आहे. यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार भीमराव तापकीर उपस्थित राहणार आहेत.व्याख्यानमालेसाठी प्रवेश विनामूल्य असून पुणेकरांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


