Saturday, August 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedटाटा मोटर्स फ्लीट एज डिजिटली ५ लाख व्‍यावसायिक वाहनांशी कनेक्‍ट झाले

टाटा मोटर्स फ्लीट एज डिजिटली ५ लाख व्‍यावसायिक वाहनांशी कनेक्‍ट झाले

मुंबई, २३ जानेवारी २०२४: टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्‍यावसायिक वाहन उत्‍पादक कंपनीने आज ५ लाख व्‍यावसायिक वाहनांना त्‍यांचा समर्पित कनेक्‍टेड वेईकल प्‍लॅटफॉर्म फ्लीट एजशी कनेक्‍ट होण्‍याची घोषणा केली. विशेषत: कार्यक्षम ताफा व्‍यवस्‍थापनासाठी डिझाइन करण्‍यात आलेले फ्लीट एज वेईकल अपटाइम वाढवण्‍यासाठी आणि रस्‍त्‍यावरील सुरक्षिततेमध्‍ये सुधारणा करण्‍यासाठी स्‍मार्ट तंत्रज्ञानांचा वापर करते. हे व्‍यासपीठ त्‍याच्‍याशी कनेक्‍ट करण्‍यात आलेल्‍या प्रत्‍येक वाहनाचे वेईकल स्‍टेटस्, हेल्‍थ, लोकेशन आणि ड्रायव्‍हर वर्तणूकीबाबत रिअल-टाइममध्‍ये माहिती देते. यामुळे वाहन मालक व ताफा व्‍यवस्‍थापक कार्यरत कार्यक्षमता वाढवण्‍यासाठी, लॉजिस्टिक्‍स खर्च कमी करण्‍यासाठी आणि फायदा वाढवण्‍यासाठी उत्तम निर्णय घेऊ शकतात.

 

हा महत्त्‍वपूर्ण टप्‍पा गाठण्‍याबाबत मत व्‍यक्‍त करत टाटा मोटर्स कमर्शियल वेईकल्‍सच्‍या डिजिटल व्‍यवसायाचे प्रमुख श्री. भरत भूषण म्‍हणाले, ”टाटा मोटर्स लॉजिस्टिक्‍स अधिक एकसंधी व कार्यक्षम करण्‍याप्रती कटिबद्ध आहे. फ्लीट एज प्रबळ मूल्‍य तत्त्व, डेटा-आधारित इंटेलिजन्‍स, रिअल-टाइम इनसाइट्स आणि स्‍मार्टर फ्लीट व्‍यवस्‍थापन सक्षम करणारे वेईकल प्रोग्‍नोसिस यांसह या प्रयत्‍नामध्‍ये खरे गेम चेंजर ठरले आहे. आमच्‍या लाखो ग्राहकांना फ्लीट एजच्‍या वापरामधून, तसेच वाढत्‍या कार्यरत कार्यक्षमता व त्‍यांच्‍या ट्रक्‍सच्‍या मालकीहक्‍काच्‍या कमी खर्चामधून मोठे फायदे मिळत आहेत. खरे सहयोगी म्‍हणून आम्‍ही आमच्‍या ग्राहकांसोबत काम करत त्‍यांचे व्‍यवसाय यशस्‍वी करण्‍याचा प्रयत्‍न करत आहोत.”

 

फ्लीट एज युजर-अनुकूल इंटरफेससह येते, ज्‍यामध्‍ये नियमितपणे वेईकल हेल्‍थवर देखरेख ठेवण्‍यासाठी आणि वेळेवर देखरेखीसाठी रेडी अलर्टससह वेईकल अपटाइम वाढवण्‍यासाठी वेईकलमध्‍ये प्री-इन्‍स्‍टॉल केलेल्‍या विविध सेन्‍सर्समधून मिळालेली माहिती पाहायला मिळते. हे वैशिष्‍ट्य इंधन बचत करणाऱ्या तंत्रांबाबत सल्‍ला देण्‍यासाठी आणि ड्रायव्हिंग वर्तणूकीवर देखरेख ठेवण्‍यासाठी ड्रायव्हिंग पद्धतींचे विश्‍लेषण देखील करते.

 

टाटा मोटर्सच्‍या सर्व व्‍यावसायिक ईव्‍ही, मध्‍यम व हेवी ट्रक्‍स आणि बसेसमध्‍ये ४जी सिम एम्‍बेड केलेले फ्लीट एज आहे. टेलिमॅटिक्‍स कंट्रोल युनिट (टीसीयू) एआयएस १४० प्रमाणित असण्‍यासह सुरक्षितता फंक्‍शन्‍स आहेत. अॅडवान्‍स्‍ड अल्‍गोरिदम्‍स विविध मूल्‍यवर्धित माहिती देण्‍यासाठी या स्‍मार्ट वेईकल्‍समधील डेटा इनपूट्सचे विविध घटकांवर विश्‍लेषण करतात. फ्लीट मालक व व्‍यवस्थापक त्‍यांच्‍या व्‍यवसाय गरजांनुसार सर्वोत्तम व योग्‍य निर्णय घेतात. ते फ्लीट एज व्‍यासपीठ सानुकूल करण्‍यासाठी त्‍यांच्‍या आवश्‍यकतांनुसार स्‍टॅण्‍डर्ड आणि अॅडवान्‍स सबस्क्रिप्‍शन योजनांमधून निवड करू शकतात

.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments