**पुणे, दि. २४ (जिमाका वृत्तसेवा)** — विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेसाठी बालेवाडी येथील श्री छत्रपती शिवाजी क्रीडा संकुलात प्रवेश व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले आहे. मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांना क्रीडा संकुलाच्या मुख्य प्रवेशद्वारातून त्यांच्या वाहनांसह प्रवेश देण्यात येत आहे. तर उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांच्यासाठी राजवाडा गेटमधून प्रवेशाची व्यवस्था करण्यात आली आहे.
मतमोजणी प्रक्रियेदरम्यान विविध घटकांची ये-जा नियोजित पद्धतीने व्हावी आणि प्रवेश व्यवस्थेत सुसूत्रता राहावी, यासाठी स्वतंत्र प्रवेशमार्ग निश्चित करण्यात आले आहेत. मतमोजणी अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्य प्रवेशद्वारातून वाहनांसह प्रवेश दिला जात आहे. उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींना
राजवाडा गेटमधून प्रवेश देण्यात येत असून, त्यांची वाहने राजवाडा गेट ते बालेवाडी मेट्रो स्थानका दरम्यान सर्व्हिस रोडच्या बाजूला व्यवस्था करण्यात आली आहे.
मतमोजणी प्रक्रियेशी संबंधित अधिकारी, कर्मचारी, उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांनी निर्धारित प्रवेशद्वाराचा वापर करावा. प्रवेश व्यवस्थेसंदर्भातील सूचनांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.


