Saturday, August 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedमुंबईतील जिओ वर्ल्‍ड प्‍लाझा येथे सॅमसंग बीकेसी लाइफस्‍टाइल एक्‍स्‍पीरिअन्‍स स्‍टोअरचे उद्घाटन; एआय-सक्षम...

मुंबईतील जिओ वर्ल्‍ड प्‍लाझा येथे सॅमसंग बीकेसी लाइफस्‍टाइल एक्‍स्‍पीरिअन्‍स स्‍टोअरचे उद्घाटन; एआय-सक्षम कनेक्‍टेड डिवाईस अनुभवांचे प्रदर्शन

मुंबई, भारत – जानेवारी २३, २०२४ – सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स कंपनीने आज मुंबईतील नुकतेच उद्घाटन करण्‍यात आलेले रिटेल, लेजर व डायनिंगसाठी अल्‍ट्रा-लक्‍झरी परिसर जिओ वर्ल्‍ड प्‍लाझा मॉलमध्‍ये भारतातील त्‍यांच्‍या पहिल्‍या ऑनलाइन-टू-ऑफलाइन (ओ२ओ) लाइफस्‍टाइल स्‍टोअरचे उद्घाटन केले. असे करत कंपनीने भारतातील आपली कटिबद्धता अधिक दृढ केली आहे.

 

जिओ वर्ल्‍ड प्‍लाझामधील ८,००० चौरस फूट जागेवर पसरलेले सॅमसंग बीकेसी मुंबईतील मध्‍यवर्ती व्‍यवसाय हब वांद्रे कुर्ला कॉम्‍प्‍लेक्‍स येथे धोरणात्‍मकरित्‍या स्थित आहे आणि अद्वितीय क्‍यूरेटेड अनुभव वास्‍तविक जीवनातील स्थितींच्‍या माध्‍यमातून सॅमसंगच्‍या टॉप-ऑफ-द-लाइन प्रिमिअम उत्‍पादनांना दाखवेल. हे नवीन स्‍टोअर सॅमसंगच्‍या एआय इकोसिस्‍टमच्‍या क्षमतेचा फायदा घेत सॅमसंगच्‍या व्‍यापक प्रिमिअम पोर्टफोलिओला दाखवते, ज्‍यामध्‍ये स्‍मार्टफोन्‍स, टेलिव्हिजन्‍स, रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशिन्‍स आणि इतर उत्‍पादनांचा समावेश आहे.

 

प्रिमिअम ग्राहक व तंत्रज्ञानप्रेमींच्‍या गरजांची पूर्तता करत सॅमसंग बीकेसी एकाच छताखाली सॅमसंगचे आधुनिक एआय अनुभव देते, जसे ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स उत्‍पादनांसाठी ‘एआय फॉर ऑल’ आणि मोबाइल डिवाईसेससाठी ‘गॅलॅक्‍सी एआय’.

 

देशातील पहिल सॅमसंग ओ२ओ स्‍टोअर सॅमसंग बीकेसी रिटेल खरेदी अनुभवाला नव्‍या उंचीवर घेऊन जाईल आणि सर्वोत्तम ऑनलाइन व ऑफलाइन विश्‍वांना एकत्र आणत ग्राहकांसाठी नवीन शक्‍यता अनलॉक करेल. या रिटेल नाविन्‍यतेच्‍या माध्‍यमातून सॅमसंग बीकेसी स्‍टोअर ऑनलाइन सोयीसुविधेमध्‍ये वाढ करत आहे, जेथे ऑनलाइन डिजिटल कॅटलॉगमधून १,२०० हून अधिक निवडींसह उत्‍पादनांची व्‍यापक श्रेणी प्रदान करण्‍यात आली आहे. तसेच स्‍टोअरमध्‍ये कर्मचाऱ्यांकडून उत्तम साह्य देखील करण्‍यात येईल. याव्‍यतिरिक्‍त, ही उत्‍पादने मुंबईसह देशातील कोणत्‍याही भागांमध्‍ये वितरित करता येऊ शकतात.

 

तसेच, मुंबईतील ग्राहकांना Samsung.com/in वरून ऑनलाइन खरेदी करण्‍याचा आणि दोन तासांच्‍या आत सॅमसंग बीकेसी त्‍यांची उत्‍पादने पिक-अप करण्‍यासाठी जवळच असलेल्‍या स्‍टोअर सुविधेचा लाभ घेण्‍याचा पर्याय देखील आहे.

 

ग्राहकांसाठी खुले करण्‍यात आलेले सॅमसंग बीकेसी नवीन गॅलॅक्‍सी एस२४ सिरीज खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी प्रमुख अनुभवाला नव्‍या उंचीवर घेऊन जाईल. हे स्‍टोअर गॅलॅक्‍सी एस२४ स्‍पेशल एडिशन कलर पर्यायांसह त्‍यांच्‍या नवीन गॅलॅक्‍सी एआय स्‍मार्टफोनचे मोफत अद्वितीय जेन एआय सक्षम वैयक्तिकरण देखील देईल.

 

ग्राहक २३ जानेवारीपासून सॅमसंग बीकेसी येथे नवीन गॅलॅक्‍सी एस२४ सिरीजचा अनुभव घेण्‍यासह प्री-बुक करू शकतील.

 

”आज ग्राहक, विशेषत: जनरेशन झेड व मिलेनियल्‍स प्रिमिअम उत्‍पादने व अद्वितीय अनुभवांचा शोध घेत आहेत. त्‍यांची ब्रॅण्‍ड व त्‍यांच्‍या उत्‍पादनांसोबत परस्‍परसंवाद करण्‍याची, उत्‍पादनांचा अनुभव घेण्‍याची आणि अद्वितीय मनोरंजनाचा आनंद घेण्‍याची इच्‍छा आहे. हाच आनंद सॅमसंग बीकेसी देते. आम्‍ही आठ अद्वितीय झोन्‍समध्‍ये अभूतपूर्व अनुभव क्‍यूरेट केले आहेत, ज्‍यामध्‍ये विभागांमधील व्‍यक्‍तींना आनंदित करण्‍यासाठी आमच्‍या सर्व एआय अनुभवांचा समावेश आहे. येथे, ग्राहकांना आमच्‍या महागड्या कनेक्‍टेड डिवाईसेस इकोसिस्‍टमचा, तसेच आमच्‍या अत्‍याधुनिक तंत्रज्ञानाचा अनुभव मिळेल,” असे सॅमसंग साऊथवेस्‍ट एशियाचे अध्‍यक्ष व मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. जेबी पार्क म्‍हणाले.

 

ते पुढे म्‍हणाले, ”सॅमसंग बीकेसी लर्न @ सॅमसंग वर्कशॉप्‍सचे देखील आयोजन करेल, जेथे व्‍यक्‍तींच्‍या आवडींसह सॅमसंगचे इनोव्‍हेशन्‍स एकत्र येतील.”

 

सॅमसंग बीकेसी आठ अद्वितीय लाइफस्‍टाइल झोन्‍समध्‍ये विभागण्‍यात आले आहे, जे सॅमसंग उत्‍पादने व्‍यक्तिश: आणि सॅमसंगच्‍या कनेक्‍टेड मल्‍टी-डिवाईस इकोसिस्‍टमचा (स्‍मार्टथिंग्‍ज) भाग म्‍हणून ग्राहकांना देणाऱ्या सोयीसुविधांना दाखवेल. हे झोन्‍स गेमिंग व मनोरंजन ते कला आणि योगा ते कूकिंग व लॉण्‍ड्री व्‍यवस्‍थापन अशा विविध आवडींची पूर्तता करतात.

 

आठ लाइफस्‍टाइल झोन्‍स

 

हॉबी रूम – ग्राहक ८५-इंच ८के क्‍यूएलईडी टीव्‍ही आणि सॅमसंगच्‍या गेमिंग मॉनिटर्स व लॅपटॉप्‍सच्‍या प्रोफेशनल श्रेणीवर उत्‍साहवर्धक व सर्वोत्तम मोबाइल गेमिंग अनुभवाचा आनंद घेऊ शकतात.

 

होम ऑफिस – या झोनमध्‍ये मोठ्या स्क्रिन्‍स आणि स्‍मार्ट मॉनिटर्सचा वापर करत अत्‍याधुनिक होम ऑफिस सेटअपचा समावेश आहे. येथे मॉनिटरला गॅलॅक्‍सी बड्सशी कनेक्ट करता येऊ शकते किंवा गुगल मीटसह स्‍मार्ट मॉनिटरवर कॉल्‍स करता येऊ शकतात, ज्‍यामधून ‘विनाव्‍यत्‍यय वर्क फ्रॉम होम’ किंवा ‘बिग स्क्रिन कॉन्‍फरन्‍स कॉल’ अशा स्थिती दिसून येतात. ग्राहक आमचे मॉनिटर्स, टॅब्‍लेट्स, लॅपटॉप्‍स व स्‍मार्टफोन्‍स अशा विविध स्‍क्रिन्‍सवर विनासायास काम करत उच्‍च स्‍तरीय उत्‍पादकतेचा देखील अनुभव घेऊ शकतात.

 

होम अटेलियर – येथे, ग्राहक सॅमसंग तंत्रज्ञान घराला कशाप्रकारे आर्ट गॅलरी किंवा योगा स्‍टुडिओमध्‍ये बदलू शकते याचा अनुभव घेऊ शकतात. हा झोन ८के टीव्‍ही आणि स्क्रिनला कलाकृतीमध्‍ये बदलणारा टीव्‍ही द फ्रेम यासह आमच्‍या प्रिमिअम टेलिव्हिजन्‍सना दाखवतो. ग्राहक एआय-सक्षम स्‍मार्ट योगा मॅट देखील तपासू शकतात, जी टे‍लिव्हिजनला कनेक्‍टेड आहे आणि वापरकर्त्‍यांना त्‍यांच्‍या योगा पवित्रांबाबत रिअल टाइम अभिप्राय देते.

 

होम कॅफे – या झोनमध्‍ये ग्राहक आमचे सर्वोत्तम रेफ्रिजरेटर्स आणि व्‍हॅक्‍यूम क्‍लीनर्स पाहू शकतात. सर्वोत्तम रेफ्रिजरेटर्सचे रंग घराच्‍या कलर स्किमशी जुळण्‍याकरिता डिझाइन करता येऊ शकतात.

 

कनेक्‍टेड किचन – येथे, व्‍यावसायिक शेफ किचन ऑपरेट करतात आणि रिअल-टाइममध्‍ये आरोग्‍यदायी खाद्यपदार्थ कूक करतात. किचनमध्‍ये एआय-सक्षम रेफ्रिजरेट आहे, ज्‍यामध्‍ये विविध अद्वितीय वैशिष्‍ट्ये आहेत, जसे रेसिपी शिफारशी आणि रेफ्रिजरेटरच्‍या आत असलेल्‍या गोष्‍टींच्‍या आधारावर शॉपिंग यादी. या झोनमध्‍ये ग्राहक आरोग्‍यदायी खाद्यपदार्थ तयार करण्‍यासोबत त्‍यांचे व्‍यवस्‍थापन करण्‍यासाठी, तसेच प्रभावी व्हिजिटर मॅनेजमेंट म्‍हणून सॅमसंग उत्‍पादनांचा वापर करण्‍याच्‍या पद्धतींबाबत जाणून घेऊ शकतात.

 

इंटेलिजण्‍ट क्‍लोसेट – हा झोन आमच्‍या टॉप ऑफ द लाइन एआय-सक्षम वॉशिंग मशिन्‍स व ड्रायरला आणि स्‍मार्टफोनचा वापर करत लॉण्‍ड्री सेटिंग्‍जचे नियोजन व निवड करण्‍याच्‍या पद्धतींना दाखवतो. हा झोन स्‍मार्टथिंग्‍ज एआय एनर्जी मोडचा वापर करत ग्राहकांशी घरातील वीज व्‍यवस्‍थापनाबाबत संवाद देखील साधतो, त्‍यांना त्‍यांच्‍या घरांबाबत आणि प्रत्‍येक अप्‍लायन्‍सेसच्‍या वीज वापराबाबत माहिती सांगतो.

 

प्रायव्‍हेट सिनेमा – हे सॅमसंग प्रदान करणाऱ्या कनेक्‍टेड डिवाईस अनुभवाचे आणखी एक प्रात्‍यक्षिक आहे. येथे, ग्राहक अद्भुत ११०-इंच मायक्रोएलईडी टीव्‍हीचा अनुभव घेऊ शकतात. स्‍मार्टफोनच्‍या माध्‍यमातून स्‍मार्टथिंग्‍ज अॅपशी कनेक्‍ट होत घरातील पडदे, लाइट्स, साऊंडबार व एअर कंडिशनरवर नियंत्रण ठेवता येऊ शकते, ज्‍यामुळे रूम चित्रपटगृहामध्‍ये बदलून जाते.

 

मोबाइल झोन – हे स्‍टोअरचे केंद्र आहे, जे सॅमसंगचे प्रमुख गॅलॅक्‍सी डिवाईसेस – गॅलॅक्‍सी झेड सिरीज व गॅलॅक्‍सी एस सिरीज, नवीन गॅलॅक्‍सी एस२४ सिरीजस आमचे प्रमुख टॅब्‍लेट्स, लॅपटॉप्‍स व वीअरेबल्‍सना दाखवेल.

 

आठ झोन्‍समधील सर्व अनुभवांना एकत्रित करण्‍यासाठी सॅमसंग आपल्‍या लर्न @ सॅमसंग उपक्रमाचा भाग म्‍हणून बीकेसी डिजिअल आर्ट, फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी, फिटनेस आणि बेकिंग, कूकिंग, म्‍युझिक अशा ग्राहक आवडींसंदर्भात विविध इव्‍हेण्‍ट्स व वर्कशॉप्‍सचे देखील आयोजन करेल.

 

हा उपक्रम प्रभावक, कन्‍टेन्‍ट क्रिएटर्स आणि इतर तज्ञांसह वर्षभर सुरू राहिल, जे ग्राहकांना स्‍टोअरमध्‍ये उत्तम अनुभव आणि त्‍यांच्‍या आवडींसाठी डीआयवाय संधींच्‍या माध्‍यमातून सॅमसंग उत्‍पादने व त्‍यांच्‍या महागड्या कनेक्‍टेड डिवाईसेस इकोसिस्‍टमबाबत जाणून घेण्‍यास साह्य करतील.

 

उत्‍पादनांना सानुकूल करण्‍याची आवड असलेल्‍या जनरेशन झेड व मिलेनियल ग्राहकांसाठी स्‍टोअर मोबाइल, तसेच ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स उत्‍पादनांकरिता अद्वितीय पर्सनलायझेशन व कस्‍टमायझेशन पर्याय प्रदान करेल. क्रिएटर्स वर्कशॉपमध्‍ये ग्राहक स्‍वत:हून त्‍यांच्‍या स्‍मार्टफोन कव्‍हर्स सानुकूल करू शकतात. ते त्‍यांच्‍या खरेदी केलेल्‍या उत्‍पादनांमध्‍ये अॅक्‍सेसराइजची भर देखील करू शकतात, जसे त्‍यांच्‍या फोन कव्‍हर्सवर क्रिस्‍टल्‍ससह व्‍यक्‍तींच्‍या नावाच्‍या आद्याक्षरांची भर करू शकतात आणि त्‍यांच्‍या गॅलॅक्‍सी वॉचेसमध्‍ये उत्‍साहपूर्ण आकर्षकतेची भर करू शकतात. होम कॅफे झोनमध्‍ये ग्राहक त्‍यांच्‍या सर्वोत्तम रेफ्रिजरेटर्सच्‍या दरवाज्‍याच्‍या रंगाला त्‍यांच्‍या घरातील रंगसंगतीनुसार सानुकूल करू शकतात.

 

स्‍टोअरला भेट देणाऱ्या प्रिमिअम ग्राहकांना भारतात लाँच करण्‍यात येणाऱ्या जागतिक उत्‍पादनांचे प्रीव्‍ह्यू पाहण्‍याची संधी देखील मिळेल.

 

ग्राहकांसोबत दीर्घकालीन संबंध निर्माण करण्‍यासाठी स्टोअरमध्‍ये एकीकृत सेवा केंद्र देखील आहे, जेथे ते ऑनलाइन व ऑफलाइन अपॉइण्‍टमेंट्स घेऊ शकतात आणि त्‍यांच्‍या डिवाईसच्‍या सर्विससाठी पिकअप विनंती करू शकतात. स्‍टोअर ग्राहकांना एकाच दिवसात गॅलॅक्‍सी डिवाईसेसची दुरूस्‍ती आणि रिमोट असिस्‍टण्‍स सेवा देखील देईल.

 

दोन किंवा अधिक स्‍मार्टथिंग्‍ज सक्षम उत्‍पादने खरेदी करणाऱ्या सॅमसंग बीकेसी ग्राहकांना आमच्‍या भेट देणाऱ्या सर्विस इंजीनिअर्सकडून मोफत स्‍मार्टथिंग्‍ज सेट

अपसह उत्‍पादन इन्‍स्‍टॉलेशन सेवा देण्‍यात येईल.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments