Saturday, August 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedऑक्झिलो फिनसर्व्हचे भारतातील 10000 शाळा आणि शैक्षणिक संस्थांना 2028 पर्यंत निधी पुरविण्याचे...

ऑक्झिलो फिनसर्व्हचे भारतातील 10000 शाळा आणि शैक्षणिक संस्थांना 2028 पर्यंत निधी पुरविण्याचे उद्दिष्ट * ऑक्झिलो फिनसर्व्ह प्रा.लि.ही विद्यार्थी,शाळा आणि कॉलेजेसना शैक्षणिक वित्त पुरवठा करण्यावर लक्ष केंद्रित असलेली आघाडीची एनबीएफसी आहे.

पुणे,2४ जानेवारी २०२४ : ऑक्झिलो फिनसर्व्ह ने येत्या 5 वर्षात भारतभरात 10,000 शाळा व शैक्षणिक संस्थांना वित्त पुरवठा करण्याची आपली योजना जाहीर केली आहे.कंपनी शिक्षण संस्थांना क्षमता वाढविणे,विस्तारासाठी जमीन खरेदी करणे,सुविधा सुधारणे आणि उच्च किमतीच्या कर्जाच्या बदलासाठी वित्तपुरवठा या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी वित्त पुरवठा करेल.

 

भारतभरातील संपूर्ण शैक्षणिक परिसंस्थेला पाठिंबा देण्याच्या उद्देशाने प्री-स्कुल्स,के-12 शाळा,बोर्डिंग स्कुल्स,महाविद्यालये,व्यावसायिक शैक्षणिक संस्था,कौशल्य प्रशिक्षणावर आधारित संस्था,कोचिंग क्लासेस,स्कुल बस लोन आणि पुस्तक प्रकाशन,डिजिटल आशय ,आयटी सोल्युशन्स,स्टेशनरी पुरवठा, फर्निचर उत्पादन या क्षेत्रात असलेल्या शिक्षण आधारित एसएमई यांना ऑक्झिलो वित्तपुरवठा करेल.

 

एज्युकेशन इन्स्टिट्युशन लोन (ईआयएल) व्यवसायाबाबत बोलताना ऑक्झिलो फिनसर्व्ह चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी नीरज सक्सेना म्हणाले की,आम्ही मार्च 2018 मध्ये शैक्षणिक संस्थांना वित्त पुरवठा सुरू केला.परंतु पुढील काही वर्षात साथीच्या रोगामुळे आमच्या योजना मंदावल्या होत्या.मात्र आता सामान्य स्थितीत परतल्याने आम्ही आक्रमकपणे या विभागाचे कामकाज सुरू केले आहे.

 

 

ऑक्झिलो यापूर्वीच आंध्रप्रदेश,तेलंगणा,तमिळनाडू आणि कर्नाटक यासारख्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये अस्तित्वात आहे आणि महाराष्ट्र,मध्यप्रदेश,गुजरात,राजस्थान,उत्तर प्रदेश,ओडिसा,हरियाणा,झारखंड आणि छत्तीसगड यासारख्या महत्त्वाच्या राज्यांमध्ये टप्प्याटप्याने आपले कार्य मजबूत करेल.

 

शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी तसेच सध्याच्या सुविधांच्या आधुनिकीकरणासाठी ज्या शाळा त्यांच्या शैक्षणिक पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करू पाहत आहेत,अशांपर्यंत पोहचण्याचा ऑक्झिलोचे ध्येय आहे,असे नीरज सक्सेना पुढे म्हणाले.

 

आमचे ध्येय हे संपूर्ण भारतातील शैक्षणिक संस्थांच्या कर्जाच्या गरजा पूर्ण करणे आहे.आम्हाला आत्तापयर्ंंत उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला असून शाळा आणि इतर शैक्षणिक संस्थांच्या सर्वांगीण विकासात भागीदारी करण्यास आम्ही उत्सुक आहोत.या आर्थिक वर्षात दक्षिण,मध्य आणि पश्‍चिमेतील राज्यांमध्ये आमची उपस्थिती भक्कम केल्यानंतर पुढील आर्थिक वर्षात पूर्व आणि उत्तरेकडील राज्यांमध्ये विस्तार करू अशी माहिती एज्युकेशन इन्स्टिट्युशन लोन व्यवसायाचे मुख्य व्यवसाय अधिकारी नीरज शर्मा यांनी दिली.

 

आजवर ऑक्झिलो ने पायाभूत सुविधांचा विस्तार आणि भांडवलाच्या गरजांसाठी 165 हून अधिक शैक्षणिक संस्थांना वित्त पुरवठा केला आहे. ऑक्झिलो फिनसर्व्ह ने 31 हून अधिक देशांमधील 1250 विद्यापीठे आणि शिक्षण संस्थांमधील 10,000 हून अधिक इच्छुक विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज दिले आहे.

 

जुलै 2023 मध्ये कंपनीने विद्यमान भागधारक आयसीआयसीआय बँकेसह टाटा कॅपिटल ग्रोथ फंड II,ट्रायफेक्टा लीडर्स फंड -I आणि एक्स्पोनेन्शिया अपॉर्च्युनिटीज फंड -II यासारख्या फंडांच्या गटाच्या माध्यमातून 470 कोटी रूपये उभे केले.

 

आर्थिक वर्ष 2020-23 साठी कंपनीच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता (एयूएम) 52.7 टक्के (सीएजीआर) ने वाढली असून अंदाजे 2500 कोटी रूपयां

वर पोहचली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments