पुणे : ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट’चे आणि महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँण्ड ड्रगिस्ट असोसिएशन चे अध्यक्ष आणि केमिस्टरत्न जगन्नाथ शिंदे यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त ‘केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट’तर्फे बुधवार, दि. २२ जानेवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजता कर्वेनगर येथील महालक्ष्मी लॉन्स येथे सामूहिक विवाह समारंभाचे आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टचे सचिव अनिल बेलकर यांनी दिली.
संस्थेचे अध्यक्ष संदीप पारख, खजिनदार रोहित करपे आणि पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय शाह आदीनी कार्यक्रमाच्या आयोजनात सहभाग घेतला आहे. शिंदे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ जोडप्यांची लग्नगाठ बांधण्यात येणार आहे. या उपक्रमात गरीब आणि गरजू अशा ७५ जोडप्यांचा समावेश करण्यात आला आहे. या विवाह सोहळा प्रत्येकाच्या स्मरणात राहील, असा करण्यात येणार आहे.
अनिल बेलकर म्हणाले, केमिस्ट हृदय सम्राट आणि माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त पुण्यात सर्व तयारी पूर्ण झाली आहे. या सोहळ्यात त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि नवदाम्पत्यास आशीर्वाद देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. त्याच्यासोबत केंद्रीय नागरी विमानवाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा व युवक कल्याणमंत्री दत्ता भरणे, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ, अन्न व औषध मंत्री नरहरी झिरवळ, खासदर मेधा कुलकर्णी, श्रीरंग बारणे, आमदार हेमंत रासने, भीमराव तापकीर आदी उपस्थित राहणार आहेत.
अधिक माहितीसाठी – मो. 9028787058, 9028426345


