भारतीय रिझर्व्ह बँकेकडे (“RBI”) नोंदणीकृत रिटेल केंद्रित नॉन डिपॉझीट घेणारी NBFC आणि RBI च्या स्केल-आधारित नियमांनुसार ‘NBFC-मिडल लेयर’ म्हणून वर्गीकृत वेरिटास फायनान्स लिमिटेडने प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) साठी सेबीकडे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) सादर केला आहे.
एक वैविध्यपूर्ण, रिटेलकेंद्री NBFC म्हणून कंपनी प्रामुख्याने सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (“MSMEs”) आणि स्वयंरोजगार असलेल्या व्यक्तींना लहान व्यवसाय कर्जे पुरविते आणि गेल्या काही वर्षांत त्यांनी आपला व्यवसाय गृहकर्जे आणि वापरलेल्या व्यावसायिक वाहनांच्या कर्जांपर्यंत वाढवला आहे.
पब्लिक ऑफर एकूण 2,800 कोटी रु. पर्यंत असून त्यामध्ये विक्री समभागधारकांकडून प्रति इक्विटी शेअर 10 रु. दर्शनी मूल्य यांसह 600 कोटी रु. पर्यंतचे इक्विटी शेअर्सचा फ्रेश इश्यू (“फ्रेश इश्यू”) आणि 2,200 कोटी रु. पर्यंतच्या इक्विटी शेअर्सची विक्रीसाठीची ऑफर (“ऑफर फॉर सेल”) समाविष्ट आहे. या पब्लिक ऑफर मध्ये पात्र कर्मचाऱ्यांकडून सबस्क्रिप्शनसाठी राखीव भाग (“कर्मचारी राखीव भाग”) समाविष्ट आहे.
कंपनीने निव्वळ उत्पन्नाचा उपयोग त्यांच्या पुढील कर्जासाठीच्या कंपनीच्या भविष्यातील व्यवसाय गरजांसाठी भांडवल आधार मजबूत करण्यासाठी प्रस्तावित केला आहे.
2,200 कोटी रु. च्या विक्रीसाठीच्या प्रस्तावामध्ये 550 कोटी रु. पर्यंतचे इक्विटी शेअर्स नॉरवेस्ट व्हेंचर पार्टनर्स X – मॉरिशस यांच्याद्वारे, 550 कोटी रु. केदारा कॅपिटल फंड || LLP द्वारे, 500 कोटी रु. ब्रिटिश इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंट plc द्वारे, 425 कोटी रु. लोक कॅपिटल ग्रोथ फंड द्वारे आणि 75 कोटी रु. ग्रोथ कॅटालिस्ट पार्टनर्स LLC द्वारे (एकत्रितपणे “इन्व्हेस्टर सेलिंग शेअरहोल्डर्स” म्हणजेच “गुंतवणूकदार विक्री समभागधारक” म्हणतात) आणि 36 कोटी रु. विद्या अरुलमनी द्वारे, 21 कोटी रु. पी. सुरेंद्र पै यांच्याद्वारे, 21 कोटी रु. सविता एस. पै यांच्याद्वारे, 14 कोटी रु. शीला पै कोले द्वारे आणि 8 कोटी रु. मोनेशा शरद गांधी यांच्या द्वारे (एकत्रितपणे “वैयक्तिक विक्री समभागधारक” आणि “इन्व्हेस्टर सेलिंग शेअरहोल्डर्स” सह “सेलिंग शेअरहोल्डर्स”) (“ऑफर फॉर सेल” आणि फ्रेश इश्यू सोबत एकत्रितपणे “ऑफर”) समाविष्ट आहेत.
कंपनी BRLM सोबत सल्लामसलत करून विशिष्ट सिक्युरिटीजची 120 कोटी रु. पर्यंतची प्री-IPO प्लेसमेंट करण्याचा विचार करू शकते. ती लागू असलेल्या कायद्यानुसार रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस ROC कडे (“प्री-आयपीओ प्लेसमेंट”) दाखल करण्यापूर्वी केली जाऊ शकते. प्रस्तावित प्री आयपीओ प्लेसमेंट केल्यास, त्यासाठीचा किंमतीचा निर्णय कंपनी आणि BRLM सोबत सल्लामसलत करून घेतला जाईल. प्री- आयपीओ प्लेसमेंट पूर्ण झाल्यास, प्री- आयपीओ प्लेसमेंटद्वारे उभारलेली रक्कम फ्रेश इश्यूतून वजा केली जाईल. यासाठी सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट्स (रेग्युलेशन) नियम, 1957 च्या सुधारित नियम 19(2)(b) चे पालन करणे आवश्यक आहे.
2015 मध्ये स्थापन झालेली वेरिटास फायनान्स ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कडे नोंदणीकृत, बिगर-ठेवी घेणारी बिगर बँकिंग वित्तीय कंपनी (“NBFC”) आहे आणि RBI च्या स्केल-आधारित नियमांनुसार ‘NBFC-मिडल लेयर’ म्हणून वर्गीकृत आहे. वैविध्यपूर्ण, रिटेल केंद्री NBFC म्हणून कंपनी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (“MSMEs”) आणि स्वयंरोजगार असलेल्या व्यक्तींना लहान व्यवसाय कर्जे पुरविते. गेल्या काही वर्षांत त्यांनी आपला व्यवसाय गृहकर्जे आणि वापरलेल्या व्यावसायिक वाहनांच्या कर्जांपर्यंत वाढवला आहे. CRISIL MI&A नुसार, 2022 ते 2024 या आर्थिक वर्षांदरम्यान कर्जे (AUM) वाढीच्या बाबतीत वेरिटास फायनान्स ही सर्वात जलद वाढणारी NBFC आहे. त्यांचा संयुक्त वार्षिक विकास दर (“CAGR”) 61.76% आहे. कंपनी अल्पसेवा मिळालेल्या वंचित आणि कमी बँकिंग असलेल्या MSMEs आणि व्यक्तींना कर्ज पुरवून त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करते.
आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, एचडीएफसी बँक लिमिटेड, जेफरीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड आणि नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड हे या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.
रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसद्वारे सादर केलेले इक्विटी शेअर्स स्टॉक एक्स्चेंजेसवर सूचीबद्ध होण्यासाठी प्रस्तावित असून त्यामध्ये BSE लिमिटेड (“BSE”) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“NSE”, BSE सोबत, “स्टॉक एक्स्चेंजेस”) समाविष्ट आहेत.डीआरएचपी लिंक: https://www.icicisecurities.com/Upload/ArticleAttachments/DRHP%20-%20Veritas%20Finance%20Limited.pdf


