पुणे,२२ जानेवारी 2025 : टोस्टमास्टर्स डिस्ट्रीक्ट 125 चा उपक्रम असलेल्या पुणे मराठी टोस्टमास्टर्स मंडळ तर्फे शनिवार,1 फेब्रुवारी 2025 रोजी सीओईपी भाऊ इन्स्टिट्युट,शिवाजीनगर येथे सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या मनातील कथा इतरांपर्यंत पोहचविण्यासाठी आणि एक नवी ओळख मिळवून देण्याच्या उद्दिष्टाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.याअंतर्गत 18 वर्षावरील कोणतीही व्यक्ती सहभागी होऊ शकते.प्रत्येकाने 3 ते 5 मिनिटांत आपल्या कथा प्रेक्षकांसमोर मराठी भाषेत मांडायच्या आहेत.
पुणे मराठी टोस्टमास्टर्स मंडळाच्या अध्यक्ष अर्चना पांडे म्हणाल्या की,आपले अनुभव,विचार आणि कल्पनांना शब्दांत गुंफून इतरांपर्यंत पोहचविण्याचे हे एक योग्य व्यासपीठ आहे. पुणे मराठी टोस्टमास्टर्स मंडळाचे मुख्य उद्दिष्ट आपले सार्वजनिक वक्तृत्व,संवाद कौशल्य आणि नेतृत्व कौशल्याला प्रोत्साहन देणे हे आहे.
यासाठी नोंदणी शुल्क रूपये 150 असून 26 जानेवारी 2025 पर्यंत नोंदणी सुरू राहील.
अधिक नोंदणीसाठी https://www.meraevents.com/event/pmtmc-storytelling-contest फॉर्म किंवा अर्चना – ८६२४०३१२४९, ज्योती – ७८३८६१३५०६ या क्रमांकावर संपर्क साधा.


